भारतातील दिग्गज उद्योगपती असणाऱ्या रतन टाटा यांचे दुःखद निधन झाले. टाटा यांनी आपल्या उद्योग व्यवसायासोबतच आपल्या सामाजिक कार्यामुळे आणि आपल्या प्रेमळ वागणुकीमुळे स्वतःची एक वेगळीच प्रतिमा तयार केळी होती. रतन टाटा माहित नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. अतिशय विलक्षण बुद्धिचातुर्य असलेल्या रतन टाटा यांनी आपल्या हुशारीच्या जोरावर टाटा उद्योग समूहाला आभाळाएवढ्या उंचीवर नेऊन ठेवले. आजच्या घडीला ‘टाटा’ हे नाव कोणत्या उद्योगात नाही असे नाहीच होणार. लहान, मोठ्या सर्वच उद्योगांमध्ये टाटा यांनी आपला ठसा उमटवला. मिठापासून ते विमानापर्यंत सर्वच क्षेत्रात टाटा हे नाव आघाडीवर आहे. चला जाणून घेऊया टाटा यांच्या व्यवसायांबद्दल.
टाटा समूह कंज्यूमर एंड रिटेल सेक्टरमध्ये चहा, मीठ, टाटा केमिकल्स, व्होल्टास, टायटन, क्रोमा ब्रँड, ज्युडिओ, तनिष्क ज्वेलरी, टाटा संपन्न ब्रँडमध्ये डाळी मसाले इत्यादी, घड्याळे आदी अनेक गोष्टींचा समावेश आहे.
टाटा समूह आयटी सेक्टरमध्ये देखील आघाडीवर आहे. ते देशातील सर्वात मोठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चालवतात. ही कंपनी भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये पसरलेली आहे. याशिवाय Tata Elxsi ही डिझाइन आणि टेक्नॉलॉजी पुरवणाऱ्या जगातील टॉपच्या कंपन्यांमध्ये आहे.
टाटा ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्येही खूप प्रसिद्ध आहे. देशातील नव्हे तर जगातील आलिशान आणि लक्झरियस गाड्यांपैकी अनेक गाड्या टाटा मोटर्सच्या आहेत. सामान्यांना नागरिकांना परवडणाऱ्या नॅनो कारपासून ते जग्वार आणि लँड रोव्हरसारख्या मोठ्या आलिशान आणि महाग गाड्या टाटा मोटर्सच्या आहेत.
टाटा समूह हॉटेल इंडस्ट्रीमध्ये देखील सक्रिय आहे. १९०३ मध्ये टाटाने ताजमहाल हॉटेलची स्थापना केली. आतापर्यंत ते ट्रॅव्हल, हॉस्पिटॅलिटी आणि टूरिझ्म सेक्टरमध्येही चांगलेच स्थिरावले आहेत. इंडियन हॉटेल्स कंपनी (IHCL) आणि एअर इंडिया एअरलाइन्स देखील टाटाच्या मालकीच्या आहेत.
टाटा इंडस्ट्री ही टेलिकॉम आणि मीडिया सेक्टरमध्ये देखील आघाडीवर आहे. टाटा कम्युनिकेशन्स, टाटा स्काय आणि टाटा टेलिसर्व्हिसेस अशा टाटाच्या कंपन्या सध्या टॉपवर आहेत.
यासोबतच ट्रेडिंग आणि इन्वेस्टमेंट सेक्टरमध्ये टाटा इंटरनॅशनल, टाटा इंडस्ट्रीज आणि एनबीएफएस टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्प या कंपन्या सध्या इतर कंपन्यांना जोरदार टक्कर देत आहेत. एवढेच नाही तर टाटा विमा क्षेत्रातही काम करत आहे.
स्टील आणि इन्फ्रास्ट्रक्टर सेक्टरमध्येही टाटा टॉपवर आहेत. टाटा पॉवर, टाटा हाऊसिंग, टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स, टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रातही टाटा समूह कार्यरत आहे.