Ratan Tata Birthday: देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे फक्त एक यशस्वी व्यावसायिकच नव्हे तर मोठ्या मानाने मदत करणारे आणि आपल्या कर्मचाऱ्यांना परिवाराप्रमाणे वागवणाऱ्या व्यक्तीच्या रुपात ओळखले जातात. त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी शब्द ही अपुरे पडतील. पण नेहमीच जेव्हा ते कधी समोर येतात तेव्हा त्यांच्या बद्दलचा आदर हा प्रत्येकाच्या मनात आणि चेहऱ्यावर कायम दिसून येतो. अशातच बऱ्याच जणांना प्रश्न ही पडतो की, ऐवढ्या मोठ्या मनाचे रतन टाटा यांनी अद्याप लग्न का नाही केले? त्यांनी कधी कोणावर प्रेम केले होते तर ते यशस्वी का नाही झाले? अशा विविध चर्चा नेहमीच सोशल मीडियात सुरु असतात. यावरच रतन टाटा यांनी उत्तर ही दिले आहे. त्यांनी ह्युमन्स ऑफ बॉम्बे यांच्यासोबत आपल्या लव्हस्टोरीसह आपल्या आयुष्यातील काही खास क्षणांना ही शेअर केले आहे.
जेव्हा आईच्या दुसऱ्या लग्नावरुन खुप काही ऐकावे लागले
त्यांनी असे म्हटले की, माझे लहानपण खुप सुंदर होते. जसा-जसा मी मोठा झालो आणि भावंड ही मोठी झाली, तेव्हा दोघांना आमच्या आई-वडिलांच्या घटस्फोटाला सामोरे जावे लागले. तो असा काळ होता जेव्हा घटस्फोट हा एक सामान्य गोष्ट नव्हती.
अशा काळात आमच्या आजीने आमची काळजी घेतली. जेव्हा माझ्या आईचे पुन्हा लग्न झाले तेव्हा शाळेतील मुलं काही विचित्र पद्धतीने बोलायचे. आम्हाला त्रास द्यायचे. पण आजीने या सर्वांपासून कसे दूर रहावे यासाठी धैर्य दिले. तिने नेहमीच सांगितले की, आपण शांत कसे रहावे. आपल्याला प्रत्येक क्षणासाठी आपली प्रतिष्ठा फार महत्वाची असते आणि ती कायम ठेवावी लागते.
वडिलांपासून ही विभक्त
रतन टाटा यांनी आपल्या वडिलांसोबत झालेल्या मतभेदांबद्दल ही सांगितले. त्यांनी म्हटले की, मला नेहमीच वायलिन शिकायचे होते. पण वडिलांना मी पियानो शिकावे असे वाटायचे. मला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जायचे होते. पण त्यांना मी ब्रिटेन मध्ये जाऊन शिक्षण घ्यावे असे वाटायचे. मला आर्किटेक्ट बनायचे होते पण वडिलांनी नेहमीच तु इंजिनिअर का नाही होत आहेस असे विचारायचे. (Ratan Tata Birthday)
या मतभेदांनंतर ही रतन टाटा यांची एक इच्छा पूर्ण झाली ती म्हणजे अमेरिकेत जाणे. ते शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. तेथील कॉर्ने युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला. रतन टाटाने याचे श्रेय आपल्या आजीला दिले. ते म्हणतात, मी प्रवेश इंजिनिअरींगसाठी घेतला होता. पण नंतर मी डिग्री आर्किटेक्चरची घेतली. अभ्यासानंतर लॉस एंजेलिस येथे नोकरी करण्यास सुरुवात केली. तेथे जवळजवळ दोन वर्ष काम केले.
हे देखील वाचा- विक्रम किर्लोस्कर कोण होते ज्यांनी Toyota ला भारतात आणले
जेव्हा प्रेम झाले…
रतन टाटा यांनी असे म्हटले की, तो खुप सुंदर काळ होता. माझ्याकडे गाडी होती, नोकरी होती. नोकरीवर प्रेम ही होते. त्याच शहरात मला माझ्या आवडीची मुलगी ही भेटली आणि प्रेम झाले. मला तिच्याशी लग्न करायचे होते. तेव्हाच मी भारतात परतण्याचा निर्णय घेतला कारण आजीची प्रकृती काही ठीक नव्हती. मी भारतात परण्यापूर्वी असा विचार केला की, ती मुलगी सुद्धा माझ्यासोबत भारतात येईल का? पण १९६२ मध्ये भारत-चीन मध्ये झालेल्या लढाईनंतर त्या मुलीच्या आई-वडिलांना ती भारतात जावी असे वाटत नव्हते. अशातच आमचे नाते तुटले.