Home » माणसांमध्ये जन्माला आलेला ‘देवमाणूस’

माणसांमध्ये जन्माला आलेला ‘देवमाणूस’

by Team Gajawaja
0 comment
Ratan Naval Tata
Share

त्यांना चित्र काढायला आवडायचं, त्यांना जेट प्लेन उडवायला आवडायचं, त्यांना आवडायचं गरीबांच्या डोळ्यात येणारे अश्रु पुसायला, त्यांचं दु:ख समजून घेऊन त्यांना मदत करायला. त्यांनी अनेक मोठं मोठ्या कंपन्या उभ्या केल्या, त्यासोबत ते उभा करत गेले एक प्रगत भारत. रतन टाटा यांना फक्त एक बिझनेस मॅन म्हणणं हे खूप चुकीचं ठरेलं, त्यांना आपण माणसांमध्ये जन्माला आलेला देवमाणूस म्हणूया. ज्यांनी माणसांना स्वत:तली माणुसकी जिवंत ठेवायला शिकवलं. ९ ऑक्टोबर २०२४ भारत देश ही तारीख कधीच विसरणार नाही कारण, याच दिवशी रतन टाटांचं निधन झालं. (Ratan Naval Tata)

७ ऑक्टोबर २०२४ सगळीकडे बातम्या येऊ लागल्या की, रतन टाटा यांचं स्वास्थ्य बिघडल्यामुळे मुंबईमधील ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. पण ही बातमी अफवा असल्याची रतन टाटा यांनी स्वत: ट्वीट करून माहिती दिली. “मी पूर्णपणे ठीक असून फक्त रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात आलो आहे, काळजी करण्याचं कारण नाही,” आणि मग फक्त २ दिवसांनी बातमी आली पद्मविभूषण, पद्मभूषण देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचं ८६ व्या वर्षी निधन. अनेक लोकं ही सुद्धा अफवा असेल म्हणून पुन्हा रतन टाटांच्या ट्वीटची वाट पाहत होते, पण दुर्दैवाने हे सत्य आहे. (Todays Latest Updates)

२८ डिसेंबर १९३७ रोजी रतन टाटा यांचा जन्म झाला. एका श्रीमंत कुटुंबात जन्म झाला असला तरी त्यांचं बालपण फारसं चांगलं नव्हतं. ते १० वर्षांचे असताना त्यांचे वडील नवल टाटा आणि आई सूनी टाटा यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. म्हणून रतन टाटा हे जेएन पेटिट पारसी या अनाथ आश्रमात गेले. नंतर त्यांची आजी नवजाबाई टाटा यांनी त्यांना दत्तक घेतलं. भारतात आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी ते 1959 मध्ये कॉर्नेल विद्यापीठात गेले. 1962 मध्ये भारतात परतण्यापूर्वी त्यांनी लॉस एंजेलिसमध्ये जोन्स आणि इमन्ससोबत काम केलं आहे. त्यांच्या आजीची तब्येत बिघडल्यामुळे ते भारतात आले. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटांचा नातू परदेशात अशा पद्धतीने धडपड करतोय हे पाहून जे.आर.डी. टाटांनी टाटा उद्योगसमूहामध्ये येण्याचं निमंत्रण दिलं आणि १९६२ साली रतन टाटा, टाटा समूहात दाखल झाले. कंपनीच्या परंपरेनुसार त्यांना सुरुवातीला विविध कंपन्यांमध्ये काम करण्यास सांगण्यात आलं. (Ratan Naval Tata)

जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीपाशी काम त्यांनी केलं. रतन टाटायांनाही कंपनीच्या कामातील बारकावे शिकायचे होते, त्यामुळे त्या कारखान्यात जे काही होत होते ते त्यांनी केले. आपल्या वागण्या-बोलण्याने आणि कामामुळे ते मजूर आणि अधिकाऱ्यांमध्ये लोकप्रिय झाले. मग १९७१ मध्ये त्यांच्याकडे टाटा समूहातील नेल्को या कंपनीची धुरा सोपविण्यात आली. तेव्हा ही कंपनी तोट्यात चालणारी कंपनी होती. रेडिओ आणि टेलिव्हिजनचं उत्पादन करणारी ही कंपनी होती. रतन टाटा यांनी या कंपनीची धुरा संभाळल्यानंतर घाट्यात चालणारीही कंपनी तीन वर्षांमध्ये स्वत:च्या पायावर उभी राहिली. पण मंदी आणि आणीबाणी मुळे पुढे ही कंपनी बंद पडली. त्यांनी या अपयशाचा अनुभव भविष्यातल्या यशासाठी लक्षात ठेवला. (Todays Latest Updates)

१९९१ मध्ये जे. आर. डी. टाटांनी टाटा उद्योगसमूहाचे सर्व सूत्र रतन टाटा यांच्या हाती सोपवले. त्यानंतर टाटा समूहाचा यशाचा आलेख वर वर जात गेला. भारताची स्वत:ची अशी चारचाकी गाडी रतन टाटा यांनी बनवली. ती होती टाटा इंडिका. त्यानंतर १९९९ मध्ये टाटा मोटर्स घाट्यात सुरु होते. तेव्हा टाटा मोटर्सने आपलं पॅसेंजर कार डिव्हिजन अमेरिकन कार कंपनी फोर्डला विकण्याचा विचार केला होता. १९९९ त्या संदर्भात बैठकीत फोर्डचे चेअरमन बिल फोर्ड यांनी रतन टाटा यांचा अपमान केला होता. “कार बनवणे ही तुमचं काम नाही, जर तुम्हाला याची माहिती नसेल तर तुम्ही त्याचा व्यवसाय सुरू करायला नको होता. हा सौदा करून आपण टाटांवर उपकार करणार असल्याचे फोर्ड यांनी म्हटलं होतं. पण वेळ बदलतेच. (Ratan Naval Tata)

२००८ हा जागतिक मंदीचा काळ होता. अमेरिकन कंपनी फोर्ड दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती. फोर्डने त्याचे दोन कारब्रॅंड लँड रोव्हर आणि ज्गवार विकायला काढले. पण मंदीचा काळ असल्याने कोणचं हे कारब्रॅंड विकत घेण्यासाठी पुढे येतं नव्हतं. तेव्हा रतन टाटा यांनी हे दोन कार ब्रॅंड विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी फोर्डचे चेअरमन बिल फोर्ड म्हणाले होते की, हे ब्रँड विकत घेऊन तुम्ही आमच्यावर मोठा उपकार करत आहे. पुढे टाटांनी मिडलक्लास लोकांच स्वत:ची कार घेण्याचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी टाटा नॅनो लॉंच केली. म्हणजे एकीकडे १ कोटींच्या घरात कार विकणारं टाटा मोटर्स आता सामान्य लोकांसाठी १ लाखाची कार सुद्धा विकत होत. स्वत:चा फायदा न बघता सामान्य लोकांसाठी त्यांच्या गरजापूर्ण करण्यासाठी झटणारा जगातला हा एकमेव Business Man असावा. (Todays Latest Updates)

======

हे देखील वाचा :  जाणून घ्या रतन टाटांची कारकीर्द

======

जगभरात १०० पेक्षा जास्त देशांमध्ये स्वत:च्या कंपन्या असणाऱ्या या माणसाचं रतन टाटांचा फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत उल्लेख नाही असा प्रश्न सर्वानाच पडतो. कारण टाटा समूहाचं ६६% प्रॉफिट हे चॅरिटेबल ट्रस्टसना दान दिलं जातं. ३०,००० पेक्षा जास्त कॅन्सर रुग्णांना दरवर्षी जगण्याचं बळ टाटा मेॉमरिअल हॉस्पिटल मार्फत मिळतं. माणुसकी जगातून संपली आहे असं वाटण्याच्या काळात रतन टाटा यांनी मुक प्राण्यांसाठी देशातील सर्वात मोठं हॉस्पिटल उभारलं. त्यांनी दिलेलीही माणुसकीची शिकवण पुढे शिकवण आपण अविरत पुढे नेऊया. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचं नाव नसलं तरी लोकांच्या मनात जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून रतन टाटा यांचचं नाव कायम राहिलं. अशा या देवमाणसाला गाजावाजातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. (Ratan Naval Tata)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.