देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकताच विज्ञान भवनात पुरस्कार वितरण समारोहातील ११ स्पेशल मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार, २०२३ प्रदान केला. सर्व पुरस्कार्त्यी मुलं येत्या २४ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही भेट घेणार आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहे का राष्ट्रीय बाल पुरस्काराची सुरुवात कधी झाली होती? तसेच या पुरस्कारासाठी कशा पद्धतीने मुलांची निवड केली जाते? याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात. (Rashtriya Bal Puraskar)
१९९६ मध्ये झाली होती सुरुवात
१९९६ मध्ये उत्कृ्ष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने याची सुरुवात केली होती. या पुरस्कारावेळी मुलांना पदकासह रोख रक्कम ही दिली जाते. २०१८ पासून या पुरस्काराचे नाव बदलत ‘बाल शक्ती पुरस्कार’ असे ठेवले गेले आहे. यामध्ये शौर्यात्मक काम करणाऱ्या मुलांचा समावेश करण्यात आला.
कोणाला मिळतो राष्ट्रीय बाल पुरस्कार?
-राष्ट्रीय बाल पुरस्कार महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून दिला जातो. हा पुरस्कार कोणत्या मुलांना मिळणार त्यासाठी मंत्रालयाची एक गाइडलाइन ही आहे.
-हा पुरस्कार त्या मुलांना दिला जातो जे भारतीय नागरिक आणि भारतात राहतात. अशातच मुलांचे वय ५ वर्षापेक्षा अधिक आणि कमीत कमी १८ वर्षांपेक्षा कमी असावे.
कोणत्या श्रेणीनुसार दिला जातो पुरस्कार?
-इनोवेशन
विज्ञान आणि सामाजिक विज्ञानमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना. त्यांच्या इवोनेशनमुळे व्यक्तीसह जीव-जंतु आणि पर्यावरावर कोणताही प्रभाव पडला आहे.
-सामाजिक कार्य
बाल विवाह, लैंगिक शोषण, दारु यासारख्या सामाजिक गोष्टींच्या विरोधात समाजाला प्रेरित केले किंवा संघठित केले असेल.
-शिक्षण
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावार सात्याने कामगिरी केली असेल.
-खेळ
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरार खेळात सातत्याने कामगिरी केली असेल (Rashtriya Bal Puraskar)
-आर्ट्स अॅन्ड कल्चर
म्युझिक, डांन्स, पेंटिंग किंवा आर्ट्स आणि कल्चर संबंधित अन्य विभागात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी केली असेल.
-शौर्य
आपला जीव जोखमित टाकून निस्वार्थ सेवा करणाऱ्या मुलांचा समावेश असतो. अशी मुलं जी प्राकृतिक किंवा मानव निर्मित कोणत्याही स्थितीत शौर्याचे काम करतात. किंवा अशी मुलं जी कोणत्याही धोक्याच्या स्थितीत आपली बुद्धिमत्ता आणि मानसिक शक्तीचा वापर करतात.
हे देखील वाचा- जगभरातील सर्वच देशात महिला, सैन्यात महत्त्वाची भूमिका बजावणार
पुरस्कार मिळवणाऱ्यांमध्ये ११ मुलं आणि ५ मुलींचा समावेश
यंदाच्या वर्षात पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार देशातील सर्व क्षेत्रातील निवडल्या गेलेल्या ११ मुलांना कला आणि संस्कृतीमध्ये ४, शौर्यासाठी, नावीन्यपूर्णतेसाठी २, समाज सेवेसाठी १ आणि खेळासाठी ३ पुरस्कार दिले जात आहेत. महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, यंदाच्या वर्षात पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवणाऱ्या एकूण ११ मुलांपैकी ६ मुले आणि ५ मुलींचा समावेश आहे.