Home » जनतेसाठी खुले होणार शिमला मधील १७३ वर्ष जुने राष्ट्रपती भवन

जनतेसाठी खुले होणार शिमला मधील १७३ वर्ष जुने राष्ट्रपती भवन

by Team Gajawaja
0 comment
Rashtrapati Niwas Shimla
Share

हिमाचल प्रदेशातील शिमला येथे असणारे राष्ट्रपती निवासासंदर्भात एक मोठा निर्णय समोर आला आहे. त्यानुसार येत्या २३ एप्रिल २०२३ पासून ते सर्वसामान्य लोकांसाठी खुले केले जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपती मुर्मू या आपल्या शिमला येथील प्रवासादरम्यान अधिकृत रुपात हे खुले करणार आहे. याची माहिती राष्ट्रपतींचे अतिरिक्त सचीव डॉ. राकेश गुप्ता यांनी दिली. भारताच्या नागरिकांना ते पाहण्यासाठी ५० रुपयांचा शुल्क द्यावा लागणार आहे. तर परदेशातील नागरिकांसाठी हाच शुल्क २५० रुपये आहे. ही ऐतिहासिक वास्तू १७३ जुनी आहे. तर याच बद्दल आपण जाणून घेऊयात.(Rashtrapati Niwas Shimla)

रिट्रीटच्या नावाने ओळखले जाते राष्ट्रपती भवन
शिमला पासून १५ किमी स्थित असलेल्या मशोबराच्या डोंगरावर राष्ट्रपती भवन उभारण्यात आले आहे. मशोबरा पर्यटकांमध्ये फार लोकप्रिय आहे, राष्ट्रपती भवन शिमलाला रिट्रिट इमारत असे म्हटले जाते. या ऐतिसाहिक वास्तूची निर्मिती १८५० मध्ये शिमला मधील मेडिकल सुपरिन्टेंडेंट यांनी केली होती. हे भवन ८०० फूट उंचीवर बनवण्यात आले आहे. या भवनाची खासियत अशी की, दाज्जी भितींसह लाकडाच्या पायाने ते उभारण्यात आले आहे.

रिट्रिट इमारत १०६२८ स्क्वेअर फूटवर विस्तारले आहे. याला लॉर्ड विलियमने कोटिच्या राजाकडून लीजवर घेतले होते. त्यांनी लीजवर देतेवेळी काही अटी समोर ठेवल्या होत्या. अट अशी होती की, शिमला आणि मशोबरा गावातील दोन रस्ते हे जनतेसाठी खुले असावे. येथील कोणतेही झाडं तोडले जाणार नाही आणि ना ही गुरांना मारले जाईळ. १८८६ मध्ये कोटिच्या राजाने ते पुन्हा आपल्याकडे घेतले. पण १८९५ मध्ये वायरसाय यांनी यावर ताबा मिळवला. स्वातंत्र्यानंतर त्याचे राष्ट्रपती भवनात रुपांतर करण्यात आले.

फार कमी लोकांना माहिती आहे की, दिल्लीत असलेल्या राष्ट्रपती भवनाव्यतिरिक्त देशात दोन राष्ट्रपती भवन आहेत. शिमला मधील मशोबराच्या डोंगरावर उभारण्यात आलेले हे त्यापैकीच एक आहे. या व्यतिरिक्त तिसरे राष्ट्रपती भवन हैरदाबाद येथे आहे. दरम्यान नवी दिल्ली आणि हैदराबादचे राष्ट्रपती भवन सामान्यांसाठी यापूर्वी सुद्धा खुले केले होते.(Rashtrapati Niwas Shimla)

हे देखील वाचा- ‘राणी की वाव’ला भारतीय वास्तुशास्त्राचा चमत्कार!

डोंगरावर देवरादार झाडांमध्ये वसलेले शिमला मधील या राष्ट्रपती भवनासंबंधित काही मृत्यू सुद्धा पहायला मिळणार आहेत. या व्यतिरिक्त त्यांच्यासाठीचा डाइनिंग हॉल अन्य कलाकृती सुद्धा असणार आहेत. येथे बगीचे, ट्युलिप गार्डन आणि सजावटींच्या फुलांची सुंदरता ही जनतेला आपल्या कॅमेऱ्यात टीपता येणार आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.