Home » ‘या’ गोष्टीमुळे रणवीर ठरतोय फ्लॉप…

‘या’ गोष्टीमुळे रणवीर ठरतोय फ्लॉप…

by Team Gajawaja
0 comment
Ranveer Singh
Share

डिसेंबर महिन्यात रोहित शेट्टीचा सर्कस हा चित्रपट आला आणि कधी गेला हे कळलच नाही.  या चित्रपटानं रोहीत शेट्टीला जसा फटका दिला तसाच फटका बसलाय तो रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) ग्राफला. कारण रणवीर सिंगचे एकापाठोपाठ एक चित्रपट फ्लॉप होत आहेत. चित्रविचित्र फॅशन आणि न्यूड फोटोसेशन वगळता गेल्यावर्षी रणवीर सिंगच्या नावाला प्रसिद्धी मिळाली नाही.  त्यामुळेच रणवीर सिंगवर फ्लॉप सिंगचा शिक्का केआरकेनं मारला आहे. एवढंच बोलून केआरके गप्प नाही बसलाय तर रणवीरला सुशांत सिंगचा शाप लागलाय असं वक्तव्यही त्यानं केलंय. 

केआरके उर्फ ​​कमाल आर खान हा पुन्हा चर्चेत आला आहे. यावेळी त्यानं रणवीर सिंगला (Ranveer Singh) टार्गेट केलं आहे. आता तर सर्कस फ्लॉप झाल्यावर रणवीर सिंगला(Ranveer Singh) मोठा फटका बसला आहे. रणवीरचे एकापाठोपाठ होणारे हे फ्लॉप चित्रपट म्हणजे सुशांतचा शाप असल्याचे केआरके सोशल मिडीयावर ट्विट केले आहे. यामागे कारण सांगताना केआरकेनं  सुशांतला रामलीलामध्ये काम मिळणार होते. मात्र रणवीरने हा चित्रपट सुशांतकडून स्वतःकडे घेतला. असा दावाच केआरकेनं केला आहे. ‘गोलियों की रासलीला और रामलीला’ या चित्रपटात सुशांत सिंगच्या नावाला दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी पहिली पसंती दिली होती. मात्र एवढं मोठं बॅनर सुशांत सिंहच्या नावावर गेल्यामुळे बॉलिवूडच्या ठराविक चौकटीत खळबळ उडाली.  यशराज फिल्म्ससोबतच्या केलेल्या करारात त्याला अडकवण्यात आले, आणि हा चित्रपट सुशांतच्या हातातून गेला.  केआरकेच्या म्हणण्यानुसार, सुशांतला रामलीला हा चित्रपट मिळाला असता तर रणवीरला आता जो स्टारडम आहे, ते सुशांतच्या नावावर जमा झाले असते.  

केआरकेचा दावा काही का असेना, पण रणवीरच्या (Ranveer Singh) मागे सध्या फ्लॉपचे लेबल लागले आहे. रणवीर सिंगला (Ranveer Singh) गोलियों की रासलीला आणि रामलीला या चित्रपटातून रातोरात प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटानंतर त्याला बाजीराव मस्तानी आणि पद्मावत सारखे चित्रपट मिळाले. या दोन चित्रपटांनंतरच रणवीर (Ranveer Singh) यशाच्या शिखरावर पोहोचला. या चित्रपटांनंतर रणवीर आणि दीपिकाची जोडीही हिट ठरली.

याच दरम्यान सुशांतसिंग त्याच्या करीअरसाठी धडपडत होता. सुशांत हा बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक होता. त्याने आपल्या करिअरची सुरुवात पवित्र रिश्ता या टीव्ही मालिकेतून केली. त्यानंतर 2013 मध्ये ‘काय पो चे’ या चित्रपटातून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.  त्याने आपल्या कारकिर्दीत डझनभर चित्रपटांमध्ये काम केले आहे ज्यात पीके, एम एस धोनी, डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी, छिछोरे आणि सोनचिरिया या चित्रपटांचा समावेश आहे.  दिल बेचारा हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.  सुशांतला मिळणारे यश हे बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरले होते.  कुठलीही पार्श्वभूमी नसलेला सुशांत स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या  मनात कायमचे घर करुन बसला.  14 जून 2020 रोजी वांद्रे येथील घरी सुशांत रहस्यमयरीत्या मृतावस्थेत सापडला.   हा त्याच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता.  आजही सुशांतचे चाहते त्याला विसरु शकले नाहीत.  

=========

हे देखील वाचा : मोठी बहिण स्टार आणि आईसुद्धा अभिनेत्री, तरीही डांन्सबार मध्ये काम करुन चालवले घर

=========

मात्र सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या मृत्यूला अप्रत्यक्षरित्या कारणीभूत झालेल्या बॉलिवूडवर कायम टिका करण्यात आली आहे. यात रणवीर सिंगचाही समावेश आहे. या दोघांचेही करिअर समांतर सुरु होते. पण रणवीरला त्याच्या बॉलिवूडमधील संबंधामुळे चांगले चित्रपट मिळत गेले.  2010 मध्ये बॅंड बाजा बारात या चित्रपटामधून रणवीर सिंग बॉलिवूडमध्ये आला. पण अगदी मोजके चित्रपट वगळता त्याच्या चित्रपटांना बॉक्स ऑफीसवर यश मिळाले नाही.  पद्मवत, बाजीराव मस्तानी, 83, गल्ली बॉय, रामलीला हे ठराविक चित्रपट ठरले. मात्र लेडीज वर्सेस रिकी बहल, बॉम्बे टॉकीज, बेफिक्रे, जयेशभाई जोरदार हे त्याचे चित्रपट जादू दाखवू शकले नाही.  आता आलेला सर्कस तर सुपरफ्लॉप ठरलाय.  त्यामुळेच रणवीरच्या (Ranveer Singh) आगामी चित्रपटांबाबतही साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. आता नव्या वर्षात  रॉकी और रानी हा त्याचा आलिया सोबतचा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. रणवीरच्या (Ranveer Singh) सर्व आशा या चित्रपटावर आहेत.  अन्यथा गेल्या वर्षात फक्त चित्रविचित्र कपडे आणि न्यूड फोटोशूट यामुळेच त्याला प्रसिद्धी मिळवता आली होती. मात्र आता त्याच्याकडचे प्रोजेक्ट कार्तिक आर्यनच्या नावावर जमा होत असल्याचीही चर्चा आहे. एकूण कपड्यांच्या चित्रविचित्र फॅशन सोडून रणवीरनं आपल्या करिअरकडे लक्ष देण्याची गरज नक्कीच आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.