YouTube Content Guidelines सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म युट्यूबकडून ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ चा एक एपिसोडचा कंटेट हटवला आहे. ज्यामध्ये पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाने अर्वाच्य शब्दांत काही विधाने केली आहेत. यावरुनच वाद निर्माण झाला आहे. इंफॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीकडून मिळालेल्या नोटीसनंतर युट्यूबने व्हिडीओ हटवण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल ह्यूमन राइट्स कमिशनचे मेंबर प्रियांक कानूनगो यांनी देखील युट्यूबवरुन व्हिडीओ हटवण्याची मागणी केली होती. जाणून घेऊया नक्की युट्यूबवरुन व्हिडीओ कधी हटवला जातो याबद्दल सविस्तर…
नक्की काय आहे प्रकरण?
रणवीर अलाहाबादियाच्या बीयरबाइसेप्स चॅनलवर 10.5 मिलियन सब्सक्राइब्सर्स आणि इंस्टाग्रामवर 4.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ मध्ये एका प्रश्नावरुन वाद निर्माण झाला आहे. यामध्ये असे म्हटले होते की, “तुम्ही तुमच्या आई-वडिलांना आयुष्यभर संबंध ठेवताना पाहणे पसंत कराल की यामध्ये एकदा तरी तुम्हाला सहभागी होऊन कायमचे बंद करायला आवडेल?” याच प्रश्नावरुन युझर्स संतप्त झाले असून व्हिडीओ हटवण्याची मागणी करत त्याबद्दल रिपोर्ट्स करण्यास सुरुवात झाली.
![YouTube](https://gajawaja.in/wp-content/uploads/2022/10/YouTube-Ads-1.jpg)
YouTube
युट्यूब कम्युनिटी गाइडलाइन
युट्यूबच्या कम्युनिटी गाइलाइननुसार, लागू करण्यात आलेल्या नियम आणि अटींचे पालन न केल्यास व्हिडीओ कंटेट हटवला जातो. याशिवाय चॅनलही डिलीट केला जाऊ शकते. ज्यामध्ये तुम्ही द्वेष निर्माण करणारी भाषा, एखाद्याचे शोषण, हृदय पिळवटून टाकणारा एखादा कंटेट किंवा एखाद्याची बदनामी करण्याच्या हेतूने तयार केलेला कंटेट प्लॅटफॉर्मवरुन हटवला जाऊ शकतो.
=======================================================================================================
हेही वाचा :
Ranveer Allahbadia वादात अडकलेला रणवीर अलाहाबादिया आहे तरी कोण?
Interstellar : आपण ‘ब्लॅक होल’मध्ये जिवंत राहू शकतो का ?
=======================================================================================================
युट्यूबवरुन कधी डिलीट केला जातो कंटेट?
युट्यूब तुमचा कंटेट वरील काही कारणांमुळे हटवू शकतो. यामध्ये सर्वाधिक मोठे कारण म्हणजे कॉपीराइट आहे. तुमच्या एखाद्या व्हिडीओवर कॉपीराइट लावल्यास व्हिडीओ हटवला जातो. एखाद्याच्या मर्जीशिवाय त्याचा कंटेट वापरण्यास बंदी आहे. युट्यूबच्या गाइडलाइन्सचे उल्लंघन केल्यास व्हिडीओसमोर व्हिडीओ डिलीटेड असे दाखवले जाते. याचा अर्थ असा होतो की, व्हिडीओ युट्यूब कम्युनिटीचे उल्लंघन केले आहे. (YouTube Content Guidelines)
युट्यूबकडून चॅनल डिलीट केले जाऊ शकते
कॉपीराइटचा इश्यू निर्माण झाल्यास युट्यूबकडून व्हिडीओ हटवला जातो. याशिवाय तुमच्या अकाउंटवर कॉपीराइटच्या पहिल्या स्ट्राइकच्या 90 दिवसांमध्ये दुसरा स्ट्राइकही आल्यास दोन आठवड्यांपर्यंत प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ अपलोड करण्याची परवानगी दिली जात नाही. एवढेच नव्हे पहिल्या स्ट्राइकच्या 90 दिवसांमध्ये तिसराही स्ट्राइक आल्यास तुमचा चॅनल युट्यूबवरुन कायमचा हटवला जातो.