Home » रणबीर आणि आलियाच्या लग्नानंतर समोर आला त्यांचा तब्ब्ल १८ वर्ष जुना सुंदर फोटो 

रणबीर आणि आलियाच्या लग्नानंतर समोर आला त्यांचा तब्ब्ल १८ वर्ष जुना सुंदर फोटो 

by Team Gajawaja
0 comment
ranbir kapoor and alia bhatt first photo
Share

१४ एप्रिल रोजी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे बॉलिवूडमधील सर्वात मोठे आणि भव्य असे लग्न संपन्न झाले. मागील अनेक महिन्यांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा इंडस्ट्रीमध्ये आणि मीडियामध्ये चालू होत्या. अतिशय खासगी आणि मोजक्या लोकांच्या उपस्थित धुमधडाक्यात त्यांनी लग्न केले. रणबीर आणि आलिया हे दोघेही बॉलिवूडमधील अतिशय नावाजलेल्या अशा कपूर आणि भट्ट घरातील मुलं. या दोन्ही खानदानाने बॉलिवूडमध्ये अनेक दशकं उत्तम काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. जरी अजूनपर्यंत त्यांनी सोबत काम केले नसले तरी एकाच इंडस्ट्रीमध्येच असल्याने आलिया आणि रणबीर अनेकदा एकत्र आले. रणबीर आणि आलिया यांच्या लग्नानंतर आता त्याचा १८ वर्ष जुना एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (ranbir kapoor and alia bhatt first photo)

आलिया भट्टने तिच्या यूट्यूब चॅनेलवर गंगुबाई काठियावाडी सिनेमाच्या प्रमोशनचा एक व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये तिच्या फॅन्सने तिचा आणि रणबीरचा एक जुना फोटो पहिला. आलियाने तिच्या घरातील फोटो शोकेसचा देखील एक शॉट यात घेतला होता. या शॉटमध्ये तिचा आणि रणबीरचा फोटो दिसला. हा फोटो आजपर्यंत कोणीच पाहिला नव्हता. आलियाकडे असणारा हा फोटो रणबीर आणि तिच्या पहिल्या भेटीच्या वेळेचा आहे. (ranbir kapoor and alia bhatt first photo)

 

एका मुलाखतीमध्ये आलियाने सांगितले की, ती संजय लीला भन्साळी यांच्या बंद पडलेल्या ‘बालिकावधू’ हा सिनेमासाठी स्क्रीन टेस्ट द्यायला गेली होती. तेव्हा ती ११ वर्षांची होती. तिथे तिचे रणबीरसोबत काही शॉट्स घेतले गेले. तेव्हा रणबीर संजय लीला भन्साळी यांना ‘ब्लॅक’ सिनेमासाठी सहायक म्हणून काम करत होता. त्यावेळेस घेतलेल्या शॉट्समधील एक शॉट फोटो फ्रेमच्या रूपात संजय लीला भन्साळी यांनी आलियाला भेट केला आहे. (ranbir kapoor and alia bhatt first photo)

आलियाने यूट्यूब चॅनेलवर शेअर केलेला प्रमोशनचा व्हिडिओ आलियाने नंतर काढून टाकला. मात्र तोपर्यंत तिच्या फॅन्सने त्या फोटोचे स्क्रिनशॉट घेतले होते. सध्या तेच स्क्रिनशॉट सोशल मीडियावर चांगेलच व्हायरल झाले आहेत. या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये पुढे रणबीर दिसत असून साडी नेसलेल्या आलियाने त्याच्या खांद्यावर डोके ठेवलेले दिसत आहे. (ranbir kapoor and alia bhatt first photo)

=======

हे देखील वाचा – स्वतःच्या हिंमतीवर पहिला सिनेमा मिळवण्यासाठी विवेक ओबेरॉयने केला मोठा संघर्ष; व्यावसायिक, वैयक्तिक आयुष्यात आले अनेक कटू अनुभव 

=======
लवकरच आलिया आणि रणबीर अयान मुखर्जी यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात एकत्र दिसणार असून, हा सिनेमा याचवर्षी प्रदर्शित होणार आहे. आलिया आणि रणबीरसोबत या सिनेमात अमिताभ बच्चन आणि मोनी रॉय देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या आलिया ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे तर रणबीर कपूर ‘एनिमल’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. (ranbir kapoor and alia bhatt first photo)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.