Home » Rammudra : जगातल्या 30 देशांमध्ये राममुद्रा वापरतात, भारतात का नाही ?

Rammudra : जगातल्या 30 देशांमध्ये राममुद्रा वापरतात, भारतात का नाही ?

by Team Gajawaja
0 comment
Rammudra
Share

जगामधील 30 देशांमध्ये राममुद्रा वापरली जाते. मात्र या 30 देशांमध्ये भारताचा समावेश नाही. ही राममुद्रा भारतातही चलन म्हणून वापरावी, अशी मागणी महाकुंभमध्ये करण्यात येत आहे. मुळात राममुद्रा नावाचे चलन आहे, याची माहिती कोणाला आहे? ज्या देशात प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला, ज्या देशात प्रभू रामांचे भव्य मंदिर आहे, अशा देशातच राममुद्रा म्हणजे, काय आणि त्याचा वापर कसा होतो, याची पुरेशी माहिती नाही. आता कुंभमेळ्यात राममुद्रा भारतामध्ये चलन म्हणून स्विकारावी अशी मागणी झाली आणि ही राममुद्रा असते तरी कशी याची शोधाशोध सुरु झाली आहे. (Rammudra)

प्रयागराज येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यात हिंदू राष्ट्र आणि सनातन बोर्डाचा मेळावा नुकताच झाला. या मेळाव्यात महर्षि महेश योगी यांच्या संस्थेनं चालू केलेल्या आणि 30 देशांमध्ये चलनात असणा-या राममुद्रेचा वापर भारतातही सुरु करावा अशी मागणी करण्यात आली. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग होते, तेव्हाही अशी मागणी कऱण्यात आली होती. हा वाद मोठा झाल्यावर आरबीआयनं यात मध्यस्थी करत, देशात दोन प्रकारचे चलन चालू शकत नाही, असे स्पष्टीकरण दिले होते. (Information)

आता महाकुंभमध्ये पुन्हा याच राममुद्रेचा उल्लेख कऱण्यात आला आहे. ज्या देशांमध्ये ही राममुद्रा चालते, तिथे या चलनाला रॅम असे म्हटले जाते. विशेष म्हणजे, नेदरलँड्समधील डच दुकानांमध्ये एका रॅम चलनाच्या बदल्यात 10 युरो मिळतात. प्रभू रामचंद्रांचे छायाचित्र असलेल्या या राममुद्रेची सुरुवात कशी झाली, यामागे रंजक कथा आहे. (Rammudra)

‘द ग्लोबल कंट्री ऑफ वर्ल्ड पीस’ या संस्थेने हे राममुद्रा चलन तयार केले आहे. यामागे महर्षि महेश योगी यांचा पुढाकार आहे. जबलपूर येथे जन्म झालेल्या महर्षी महेश योगी यांनी अलौकिक ध्यानपद्धती विकसित केली. भौतिकशास्त्राचे अभ्यासक म्हणूनही त्यांची ओळख होती. या अलौकिक ध्यान पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी जगभर दौरे केले. नेदरलँडमध्ये महर्षि महेश योगी यांचे मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. त्यांच्याच महर्षि इन्स्टिट्यूटचा प्रयागराज येथील अरैल येथे मोठा आश्रम आहे. महर्षि महेश योगी यांनी ही राममुद्रा सुरु केली. जगभर रुपया, डॉलर यांच्यासाठी स्पर्धा लागली आहे. या रुपया आणि डॉलरच्या नावासारखेच देवाचे नाव घेतले तर सर्वांचेच कल्याण होईल, याच कल्पनेतून महर्षि महेश योगी यांनी राममुद्रा चलन सुरु केले. (Information)

यातून रामनामाचा जपही आपसूक होईल, असा त्यांचा उद्देश होता. त्यातूनच ऑक्टोबर 2002 मध्ये महर्षि योगींची संघटना, ग्लोबल कंट्री ऑफ वर्ल्ड पीसने राममुद्रा चलन सुरु केले. या चलनात, 1,5 आणि 10 रुपयांच्या नोटा आहेत. या नोटांवर भगवान श्री रामांचे छायाचित्र असून नोटांवर रामराज्य असे लिहिलेले आहे. नोटांबरोबरच राममुद्रा चलनाचे नाणेही आहे. या नाण्यांवर कामधेनू गायीसह कल्पवृक्षाचे चित्र बघायला मिळते. आता द ग्लोबल कंट्री ऑफ वर्ल्ड पीस या संघटनेनं हे चलन, भारतात लागू करावे अशी नव्यानं मागणी केली आहे.(Rammudra)

============

हे देखील वाचा : Antarctica Continent : आता अंटार्क्टिकाच्या मालकीसाठी लढाई

============

राममुद्रा चलन हॉलंड आणि जर्मनीसह 30 देशांमध्ये वापरले जात असल्याची माहिती आहे. एका राम चलनाचे मुल्य 10 डॉलर्स इतके आहे. मात्र नेदरलँड्सच्या सरकारी बँकेने राम चलन कधीही कायदेशीर आहे, असे स्पष्ट केलेले नाही. शिवाय जागतिक बँकेनेही राममुद्रा या चलनाला मान्यता दिलेली नाही. मात्र हे चलन नेदरलँड्समधील व्लोड्रॉप आणि आयोवामधील, महर्षि वैदिक सिटीमध्ये वापरले जात असल्याची माहिती आहे. (Rammudra)

जेव्हा या आश्रमातील सदस्य आश्रमातून अन्य ठिकाणी जातात, तेव्हा चलन डॉलर्समध्ये बदलण्यात येते. ग्लोबल कंट्री ऑफ वर्ल्ड पीस या संघटनेच्या माध्यमातूनच महाकुंभमध्ये सनातन बार्डाचा मेळावा घेण्यात आला. येथेच राममुद्रेचा मुद्दा पुन्हा एकदा उठवण्यात आला आहे. या संस्थेचे मुख्यालय हॉलंड येथे आहे. तिथे या संस्थेची 160 अब्ज डॉलर्सहून अधिक मालमत्ता असल्याची माहिती आहे. महाकुंभमध्ये या संस्थेच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते, महाकुंभ अधिक सहज, सुलभ व्हावे यासाठी कार्यरत आहेत.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.