अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याला पुढच्या वर्षी एक वर्ष होत आहे. राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेपासून अयोध्यानगरी फक्त भारताच्या नव्हे तर जगाच्या केंद्रस्थानी आली आहे. अयोध्येत अहोरात्र प्रभू श्री रामांच्या भक्तांची गर्दी आहे. एक-एक दिवसाला लाखभर भाविक अयोध्येत येत आहेत. यामुळे अयोध्येत रोज नवनव्या सुविधा होत आहेत. यामुळे अयोध्या धार्मिक पर्यटनाची राजधानीही झाली आहे. अयोध्येत येत असलेल्या या भाविकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. ती म्हणजे, जेव्हा 22 जानेवारीला या सोहळ्याला वर्ष होत असतांना प्रभू श्री रामांच्या मंदिरात आणखी एक प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. प्रभू रामांच्या अयोध्येतील मंदिराचा पहिला टप्पा 22 जानेवारी 2024 रोजी खुला करण्यात आला होता. मात्र हा सर्व परिसर अतिशय भव्यदिव्य असून त्याचे काम सुरु आहे. (Ram Temple In Ayodhya)
या राममंदिराच्या दुस-या मजल्यावर संपूर्ण रामदरबार उभारण्यात येत आहे. या रामदरबारात येत्या वर्षात प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार असल्याची माहिती आहे. 22 जानेवारी 2025 रोजी राममंदिराला वर्ष होत असतांना अयोध्येत मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचवेळी रामंदिराचा दुसरा टप्पा खुला कऱण्यात येणार आहे. यावेळी भाविकांना प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतल्यावर त्यांचा भव्य रामदरबारही पहाता येणार आहे. 22 जानेवारी 2025 रोजी होणा-या या समारंभासाठी आता अयोध्येत तयारी सुरु झाली आहे. (Ram Temple In Ayodhya)
22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत भव्य अशा मंदिरात भगवान राम विराजमान झाले आहेत. ही प्रभू श्रीरामांची मुर्ती बालरुपात आहे. प्रभू श्रीरामांच्या या मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर संपूर्ण अयोध्येचा चेहरामोहरा बदलला आहे. भगवान रामांची अयोध्या पर्यटनाची राजधानी झाली आहे. अयोध्येत 1 लाखाहून अधिक पर्यटक आणि भाविक येत असून त्यांच्यासाठी अनेक हॉटेल उभी राहिली आहेत. शिवाय या पर्यटकांच्या निवासस्थानासाठी स्थानिकांच्या सहाय्यानं होम स्टे सुविधाही करण्यात आली आहे. यामुळे अयोध्येत मोठ्या प्रमाणात उद्योगाची निर्मिती होत आहे. पण प्रभू श्री रामांचे मंदिर हे यापेक्षाही अधिक भव्यदिव्य असणर आहे. त्याचा फक्त एक टप्पा भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. आणखी दोन टप्प्यात राम मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येत आहे. त्यातील दुसरा टप्पा 22 जानेवारी 2025 रोजी खुला होईल. यामुळे अयोध्येत येणा-या भाविकांची संख्या दुपट्टीनं वाढण्याची शक्यता आहे. (Ram Temple In Ayodhya)
अयोध्येतील राम मंदिराचा परिसर अतिशय भव्य आहेत. यात मुख्य प्रभू श्री रामांचे मंदिर असणार आहे. त्यासोबत आणखी 18 मंदिरे असून ती मंदिरेही वास्तुकलेचा अद्वितीय नमुना ठरणार आहेत. शिवाय राम मंदिर तीन मजल्याचे आहे. त्याच्या पहिल्या मजल्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. दुसऱ्या मजल्यावरील बांधकाम वेगाने सुरू आहे. राम मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर राम दरबाराची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी राजस्थानातील जयपूरमध्येही पांढऱ्या संगमरवरी दगडापासून राम दरबाराच्या मूर्ती बनवल्या जात आहेत. राम दरबारातील मुर्तींची उंची 4.5 फूट असणार आहे. त्यामध्ये ज्यामध्ये प्रभू श्री राम, माता सीता, लक्ष्मण, हनुमान, भरत आणि शत्रुघ्न यांच्या मूर्तींचाही समावेश आहे. याच सर्व रामदरबाराचा अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी 2025 रोजी होत आहे. इमारत बांधकाम समितीचे अध्यक्ष निपेंद्र मिश्रा यांनी ही माहिती दिली आहे. यावर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राम दरबारचे सर्व काम पूर्ण होणार आहे. (Ram Temple In Ayodhya)
==============
हे देखील वाचा : नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ रंग
===============
यानंतर राम दरबाराचा अभिषेक करण्याचा निर्णय घेण्यात येईल. मात्र ही तारीख 22 जानेवारी 2025 असण्याची शक्यता आहे. कारण यावेळी मोठ्या संख्येनं भाविक अयोध्येत येणार आहेत. शिवाय राम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या वर्षपूर्तीमुळे अयोध्येत मोठा समारंभही याचवेळी होणार आहे. अशाच मंगलमय वातावरणात राम मंदिराचा पुढचा टप्पा भाविकांसाठी खुला करण्याचा मंदिर समितीचा निर्णय आहे. यासाठीही आता मुहुर्त काढण्यात येत आहे. राम मंदिराचा अभिषेक सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12:15 वाजता सुरू झाला आणि 12:45 वाजता समाप्त झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सोहळ्यासाठी 11 दिवसांचा विशेष उपवास केला होता. कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनी प्रभू श्री रामांची मुर्ती साकारली आहे. या कार्यक्रमासाठी भारत आणि परदेशातील 7000 हून अधिक पाहुण्यांना आमंत्रित केले होते. आता येत्या वर्षातही असाच भव्यदिव्य कार्यक्रम होणार का याची प्रतीक्षा भाविकांना आहे. (Ram Temple In Ayodhya)
सई बने