भारतातील दक्षिण राज्य असलेल्या तमिळनाडूत एक परिसर आहे तो म्हणजे पंबन द्वीप. दुसऱ्या बाजूला श्रीलंका हा देश आहे. या मध्ये समुद्र आणि मन्नारची खाडी आहे. भारतातील पंबन द्वीप आणि श्रीलंकेला जोडणाऱ्या जुन्या पुलाला रामसेतू असे म्हटले जाते. या पुलाच्या आजूबाजूला असलेली दगडं ही तरंगतात. मोठी मोठी दगडं पाण्यावर अशी कशी तरंगू शकतात यामुळे लोकांना नेहमीच आर्श्चय वाटते. काही लोकांची अशी मान्यता आहे की, ही श्रीरामाची कृपा आहे. महाकाव्य रामायणाच्या मते, सीतेला लंकेचा राजा रावण याच्या तावडीतून सोडवण्यासाठी भगवान श्रीराम यांना जेव्हा लंकेत जायचे होते तेव्हा त्यांनी सुग्रीवच्या वानर सेनेच्या मदतीने हा पुल तयार केला होता. सॅटेलाइट फोटोंमधून तो कशा पद्धतीने बांधला गेला आहे ते दिसून येते. मात्र आता तो पाण्याच्या खाली काही फूट दबला गेला आहे. (Ram Setu Stones)
रामायणात लिहिले आहे की, दगडं ही पाण्यावर तरंगत रहावीत म्हणून त्यांच्यावर श्रीराम असे लिहिले आहे. भगवानाचे नाव लिहिल्याच्या कारणास्तवच ही दगडं पाण्यावर तरंगू लागली आणि त्यावेळी कोणत्याही चूना किंवा अन्य दगडांचा वापर न करता ऐवढा मोठा पुल उभारला गेला. रामायणाच्या मते, सुग्रीवची वानर सेना आणि भगवान श्रीराम याच पुलाने लंकेत गेले आणि त्यांनी रावणाचा पराभव करुन सीतेला त्याच्या तावडीतून मुक्त केले. याच कारणामुळे या पुलाला हिंदू धर्मात फार पवित्र मानले जाते.

जवळजवळ ५० किमी लांब असलेला हा पुल नेहमीच त्याच्या संरचेनेमुळे चर्चेत असतो. कारण त्याच्या आजूबाजूचा समुद्र हा फार उथळ पाण्याचा आहे. असे म्हटले जाते की, १४८० पर्यंत हा पुल पाण्याच्या वर होता. वैज्ञानिकांच्या मते, हा पुल चुन्याची दगडं, ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेले दगडं आम कोरल रीफ पासून बनवण्यात आला आहे. याच कारणास्तव जहाज हे या मार्गांनी जात नाहीत.
का तरंगतात रामसेतूचे दगडं?
रामसेतुच्या दगडांसंदर्भात अभ्यास केल्यानंतर असे कळले की, ही दगडं आतमधून पोकळ आहेत. याचे वजन अत्यंत कमी आहे. याच कारणामुळे ते पाण्याचा जोर कितीही असला ते खाली बुडत नाहीत आणि तरंगतात.
अशा प्रकारचे तरंगणारे दगडं ही न्युझीलँन्ड, फिजी, वनुताउ, न्यू सेलेडोनिया आणि क्विन्सलँन्ड येथे आढळतात. भारतातील काही डोंगराळ राज्यात ही असे दगडं आढळतात. या दगडांमागील विज्ञान ऐवढेच आहे की, ते आतमधून पोकळ असल्याने पाण्यावर तरंगतात. या दगडांमध्ये ९० टक्के हवा असते. या दगडांना Pumice Stone नावाने ओळखले जाते. (Ram Setu Stones)
हे देखील वाचा- देशातील 52 शक्तीपीठांपैकी एक मंदिर म्हणजे ‘दंतेश्वरी मंदिर’
Pumice Stone कसे निर्माण होतात?
ज्वालामुखीच्या उद्रेकातून जो लावा बाहेर पडतो आणि तो थंड झाल्यानंतर त्याचे Pumice Stone मध्ये रुपांतर होते. खुप तापमान आणि उच्च दाबाच्या कारणास्तव ज्वालामुखीतून खुप वेगाने लावा बाहेर पडतो. याचे तापमान जवळजवळ १५०० डिग्री सेल्सियस असते. ऐवढा गरम लावा जेव्हा हवा किंवा समुद्राच्या पाण्यात पडतो तेव्हा तो कोल्ड शॉकच्या स्थितीत निर्माण होतो. या स्थितीत गरम लावाच्या आतमध्ये हवा भरली जाते आणि लगेच तो थंड होतो. ही हवा लावामध्ये राहते आणि लहानलहान बबल तयार करते. हे बबल मिळून एक मोठा दगडं तयार होतो. आतमध्ये हवा भरली गेल्याने त्यांचे वजन अत्यंत कमी होते.