Home » Rama Raghoba Rane : परमवीर चक्र जिंकणारा पहिला मराठी माणूस!

Rama Raghoba Rane : परमवीर चक्र जिंकणारा पहिला मराठी माणूस!

by Team Gajawaja
0 comment
Ram Raghoba Rane | Top Marathi Headlines
Share

8 एप्रिल 1948, जम्मू-काश्मीरमधलं नौशेरा सेक्टर. भारत-पाकमध्ये पहिलं युद्ध जोरदार सुरू होतं. जे या दोन देशांमधलं पहिलं युद्ध होतं. पाकिस्तानने ताब्यात घेतलेलं नौशेरा भारतीय सेनेनं परत मिळवलं होतं, पण आता पुढचं लक्ष्य होतं राजौरी. ज्याच्यावर पाकिस्तानने पाठवलेल्या कबाली सैनिकांनी कब्जा केला होता. पण राजौरीपर्यंत पोहचण्यात मोठा प्रॉब्लेम होता. पाकिस्तानी कबालींनी रस्त्यावर मोठमोठे रोड ब्लॉक्स उभारले होते, लँड माईन्स पेरले होते. वरून मोर्टार आणि मशीनगनचा मारा. टँक पुढे सरकू शकत नव्हते, सैनिक अडकले होते. अशा बिकट परिस्थितीत एक 30 वर्षांचा तरुण, रामा राघोबा राणे, आपल्या 37 व्या असॉल्ट फील्ड कंपनीच्या छोट्या टीमसोबत मैदानात उतरला. आणि मग जे काही घडलं, ते इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं! रामा राघोबा राणे यांच्या टीमने काय केलं? हे जाणून घेऊ. (Rama Raghoba Rane)

रामा राघोबा राणे, मूळ कर्नाटकातल्या हावेरी गावचे. 26 जून 1918 ला एका साध्या पोलिस कर्मचाऱ्याच्या घरी जन्मलेल्या रामांच्या रक्तात लहानपणापासूनच देशभक्ती होती. वयाच्या १२ व्या वर्षी १९३० मध्ये त्यांनी गांधीजींचा असहयोग आंदोलन पाहिलं. या आंदोलनानं ते इतके प्रभावित झाले की त्यांनी त्यात सहभागी व्हायचं ठरवलं. पण वडिलांना हे मान्य नव्हतं. म्हणून त्यांनी राणेंना गावाकडे पाठवलं. पण राणेंचं मन? ते देशासाठी धडपडत राहिलं. 1940 मध्ये, वयाच्या 22 व्या वर्षी, राणे ब्रिटिश इंडियन आर्मीत दाखल झाले. (Top Stories)

Ram Raghoba Rane

8 एप्रिल 1948 च्या दिवशी, चौथी डोगरा बटालियन राजौरीकडे निघाली होती. भारतीय सैन्याने बरवाली रिजवरून पाकिस्तानांना हुसकावून लावलं होतं, पण पुढे रस्ता बंद होता. लँड माईन्स, रोड ब्लॉक्स, आणि वरून शत्रूचा सतत मारा. टँक पुढे सरकू शकत नव्हते, सैनिक अडकले होते. तेव्हा राणे आपल्या छोट्या टीमसह पुढे आले आणि त्यांनी एक प्लॅन आखला “रस्ता बनवायचा मग भले शत्रू कितीही हल्ला करो!” आणि त्यांची टीम रस्त्यावर उतरली. लँड माईन्स काढायला सुरुवात केली, रोड ब्लॉक्स हटवायला लागले. पण इतक्यात पाकिस्तान्यांनी मोर्टार डागायला सुरुवात केली. या हल्ल्यात राणेंच्या टीममधले दोन जवान शहीद झाले आणि पाच जखमी झाले. आणि स्वतः राणे? तेही जखमी झाले. पण राणे थांबणाऱ्यापैकी नव्हते. “जखम झाली तरी चालेल, पण मिशन पूर्ण करायचं!” असा निर्धार करून ते पुढे सरकले. (Rama Raghoba Rane)

संध्याकाळपर्यंत त्यांनी इतके लँड माईन्स काढले की टँकना पुढे जायला जागा मिळाली. पण रस्ता अजूनही टँकसाठी तयार नव्हता. राणेंनी रात्रभर काम केलं. रस्ता रुंद केला, तो टॅंक जाऊ शकेल असा बनवला. दुसऱ्या दिवशी, 9 एप्रिलला, पुन्हा 12 तास न थांबता ते काम करत राहिले. शत्रूचे हल्ले सुरूच होते. मोर्टार, मशीनगन, पण राणे आणि त्यांची टीम डगमगली नाही. जिथे रस्ता खराब होता, तिथे डायव्हर्जन बनवलं, जिथे लँड माईन्स होते ते शोधून काढले, राणेंच्या या धाडसामुळे चौथी डोगरा बटालियन 13 किलोमीटर पुढे सरकली. (Top Stories)

=================

हे देखील वाचा : Govind Ballabh Pant : यूपीचा पहिला मुख्यमंत्री मराठी होता… 

=================

आणि 10 एप्रिल, पहाटे. राणे पुन्हा कामाला लागले. अवघ्या दोन तासांत त्यांनी मोठा रस्ता साफ केला. पण शत्रू थांबले नव्हते. उंचावरून ते सतत हल्ले करत होते. राणेंनी मग एक जबरदस्त आयडिया केली. एका टँकच्या मागे लपून त्यांनी रोड ब्लॉकला स्फोटक लावलं आणि तो उडवला! हे सगळं त्यांनी रात्रीच्या अंधारात केलं. 11 एप्रिलला, राणे आणि त्यांची टीम 17 तास न थांबता चिंगासपर्यंत पोहोचली, म्हणजे नौशेरा आणि राजौरीच्या मधला रस्ता. हा रस्ता म्हणजे जुना मुगलकालीन मार्ग होता. राणेंच्या मेहनतीमुळे भारतीय सेना राजौरीपर्यंत पोहोचली. या चार दिवसांत 500 हून जास्त पाकिस्तानी सैनिक मारले गेले, हजारो जखमी झाले. (Rama Raghoba Rane)

राणेंचं हे धाडस पाहून सगळ्यांचं मन थक्क झालं. 21 जून 1950 ला, त्यांना भारताचा सर्वोच्च सैनिकी सन्मान, परमवीर चक्र, प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते फक्त सेकंड लेफ्टनंट होते. नंतर 1954 ला कॅप्टन आणि 1968 मध्ये मेजर पदावरून ते निवृत्त झाले. 1994 मध्ये पुण्यातल्या कमांड हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं. पण त्यांची कहाणी? ती आजही अनेकांना माहिती नाही. ही कहाणी तुम्हाला कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा!

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.