Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा नुकताच पार पडला. त्यानंतर सर्वसामान्य भाविकांना रामललांचे दर्शन करण्यासाठी मंदिर खुले करून देण्यात आले आहे. राम मंदिराची भव्यता पाहण्यासाठी सध्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे. पण तुम्हाला माहितेय का, अयोध्येतील राम मंदिराव्यतिरिक्त भारतातही प्रभू श्रीरामांची काही मंदिरे आहेत. याबद्दलच जाणून घेऊया अधिक….
सीता रामचंद्र स्वामी मंदिर, तेलंगणा
तेलंगणामधील भद्रादी कोठागुडेम येथील भद्राचलममध्ये सीता रामचंद्र स्वामी मंदिर आहे. हे देशातील सर्वाधिक प्राचीन मंदिर असून याचा थेट संबंध रामायणाच्या काळाशी असल्याचे मानले जाते. या मंदिराला ‘दक्षिणेतील अयोध्या’ असेही म्हटले जाते.
राम राजा मंदिर, मध्यप्रदेश
मध्यप्रदेशातील ओरछा येथील राम राजा मंदिर एकमेव असे मंदिर आहे जे भगवान राम राजाच्या रुपात विराजमान झालेले दिसून येतात. प्रभू श्रीरामांना रोज गार्ड ऑफ ऑनरही दिला जातो. या मंदिरात भगवान राम यांच्यासह माता सीता, लक्ष्मण, हनुमान आणि देवी दुर्गा, सुग्रीव्ह आणि जामवंत यांची देखील पूजा केली जाते.
राम तीरथ मंदिर, पंजाब
पंजाबमधील अमृतसर येथील राम तीरथ मंदिराचा संबंध रामायणाच्या काळाशी मानला गेला आहे. या मंदिराबद्दल कथा भगवान राम यांचे पुत्र लव आणि कुश यांच्याशी संबंधित आहे. असे मानले जाते की, हे ते स्थान आहे जेथे महर्षी वाल्मिकी यांनी माता सीतेला आश्रय दिला होता. (Ram Mandir)
त्रिप्रयार श्रीराम मंदिर, केरळ
केरळातील त्रिशूर जिल्ह्यातील करुवन्नूर नदीच्या तटावर श्री रामास्वामी मंदिर आहे. येथे भगवान राम यांची सहा फूट उंचीची मूर्ती आहे. या मंदिराच्या परिसरात भगवान शंकर, गणपती आणि श्रीकृष्ण यांच्याही मूर्ती आहेत.
आणखी वाचा :