Home » अयोध्येच्या रामलेलेत कलाकारांचा बोलबाला

अयोध्येच्या रामलेलेत कलाकारांचा बोलबाला

by Team Gajawaja
0 comment
Ram Leela
Share

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही प्रभू श्रीरामांच्या अयोध्यानगरीमध्ये रामलीला मोठ्या उत्साहात होणार आहे. यावर्षी रामलीलामध्ये माता सितेची भूमिका ही मिस युनिव्हर्स इंडिया 2024 रिया सिंघा करणार आहे. तर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत वेद सागर दिसणार आहेत. शिवाय दिल्लीचे भाजप खासदार मनोज तिवारी 'बली'च्या भूमिकेत दिसणार आहेत, तरगोरखपूरचे खासदार रविकिशन ' सुग्रीव'च्या भूमिकेत दिसणार आहेत. हीरामलीला 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान अयोध्येत होणार आहे. दरवर्षी ही रामलीला बघण्यासाठी लाखो रामभक्त येतात. प्रभू श्रीरामांच्या अयोध्येत दरवर्षी मोठ्या उत्सहात रामलीला साजरी होते. अत्यंत भव्यदिव्य अशी ही रामलीला बघण्यासाठी देशभरातून रामभक्त येतात. (Ram Leela)

यावर्षी ही रामलीला 3 ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. यात सीता मातेची भूमिका मिस युनिव्हर्स इंडिया 2024 रिया सिंघा करणार आहे. खासदार मनोज तिवारी बालीच्या भूमिकेत तर खासदार रवी किशन सुग्रीवच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय या रामलीला मध्ये 42 हून अधिक बॉलिवूड कलाकार सहभागी होणार आहेत. रामलीला संस्थापक अध्यक्ष सुभाष मलिक आणि सरचिटणीस शुभम मलिक यांनी यावेळची रामलीला पूर्वीचे रेकॉर्ड मोडेल, अशी आशा व्यक्त केली आहे. यावेळी रामलीला संपूर्ण अयोध्येतून बघता येणार आहे. त्यासाठी थेट प्रक्षेपणाची सुविधाही करण्यात आली आहे. याशिवाय भारतासह जगाच्या कुठल्याही कोप-यातून रामलीला लाईव्ह बघता येणार आहे. गेल्यावर्षी या ऑनलाईन सुविधेच्या मार्फत 36 कोटी भाविकांना रामलीला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पाहिली होती. यावेळी हा आकडा 50 कोटींवर जाण्याची शक्यता आहे. (National News)

यावर्षीच्या रामलीला मध्ये मिस युनिव्हर्स इंडिया रिया सिंघा माता सीतेच्या भूमिकेत असून मिस युनिव्हर्स इंडिया सीतेची भूमिका साकारण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे रिया सिंघाही उत्साहात आहे. रिया सांगते, हे वर्ष माझ्यासाठी अनेक अर्थांनी खास आहे. भगवान श्रीरामांच्या आशीर्वादाने मला अयोध्येतील जगातील सर्वातमोठ्या रामलीलेत सीतेची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. हा अनुभव भावूक करणारा असल्याचे रियानं सांगितले. या रामलीलामध्ये यावेळी एकूण 42 चित्रपट कलाकार वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. याशिवाय अयोध्येतील 20 स्थानिक कलाकार वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. यंदाच्या रामलीला मध्ये प्रेक्षकांना राजकारण, चित्रपट आणि संस्कृतीचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. यावर्षी प्रभू श्री रामांच्या भूमिकेत वेद सागर असतील. तर अभिनेत्री भाग्यश्री 'वेदवती'च्याभूमिकेत दिसणार आहे. (Ram Leela)

माता वेदवती ही जी हिंदू पौराणिक कथांमध्ये देवी सीतेचा पूर्वजन्म मानली जाते. याशिवाय पद्मश्री मालिनी अवस्थी'शबरी 'च्या भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेत्री रितू शिवपुरी सीताजींची आई सुनयना यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अमिता नांगिया ही अभिनेत्री 'मंदोदरी 'च्या भूमिकेत दिसणार आहे. पायल गोगा कपूर शूर्पणखेच्या भूमिकेत दिसणार आहे. आई कौशल्या आणि आई पार्वती या भूमिकेत अंजली शुक्ला दिसणार आहे. इतर प्रमुख पात्रांमध्ये राजा दशरथच्या भूमिकेत रझा मुराद, राजा जनकच्या भूमिकेत राकेश बेदी, भगवान शंकराच्या भूमिकेत बिंदू दारा सिंह, मेघनाथच्या भूमिकेत रुबी चौहान, लक्ष्मणच्या भूमिकेत अनिमेष मिधा दिसणार आहेत. टेलिव्हिजनच्या लोकप्रियतेशी निगडित कलाकारही या रामलीलेत मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. रामलीला हे महाकाव्य रामायणाचे पारंपारिक प्रदर्शन आहे. रामलीला मध्ये गाणी, कथन, गायन आणि संवाद यांचा समावेश असतो. दरवर्षी शरद ऋतूतील दसऱ्याच्या सणाच्या वेळी संपूर्ण उत्तर भारतात रामलीला आयोजित केली जाते. (National News)

======

हे देखील वाचा : रामायण विश्वविद्यालय

======

रामलीला मुख्यतः अयोध्या, रामनगर, बनारस,वृंदावन, अल्मोडा, सत्ना आणि मधुबनी येथे रंगते. भारता व्यतिरिक्त बाली,जावा, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, लाओस, फिजी, दक्षिण आफ्रिका, कॅनडा आणि सुरीनाम या देशातही रामलीला होतात. कानपूरमधील रामलीलेची परंपरासचेंडीचे राजा क्षत्रु सिंह यांनी सुरू केली होती. आणखी एक वैशिष्टपूर्ण गोष्ट म्हणजे, दिल्लीतील प्रसिद्ध रामलीला औरंगजेबाच्या वारसांनी कर्ज घेऊन सुरू केली होती. अयोध्येत होणा-या रामलीलाचे वेगळे महत्त्व आहे. नवरात्रीच्या काळात होणारी ही रामलीला बघण्यासाठी भारत भरातून भाविक येतात. रामलीलामध्ये रामजन्म ते रावणाचा वध अशा घटना असतात. ते पाहतांना प्रेक्षक अत्यंत भावूक होतात. प्रभू श्रीरामांच्या नावांचा जयघोषानं ते कलाकारांना दाद देतात. (Ram Leela)

सई बने.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.