भावा बहिणीच्या प्रेमळ नात्याचा सण म्हणजेच ‘रक्षाबंधन’. श्रावण महिना लागला की, वेध लागतात ते रक्षाबंधनाचे. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा बहीण भावांच्या नात्याचा सण साजरा केला जातो. येत्या ९ ऑगस्ट रोजी भारतभर रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिला आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधनाचा सण अगदी तोंडावर आला आहे. यंदाचे रक्षाबंधन काही शुभ योगांमुळे खूपच खास ठरणार आहे. आज आपण याच शुभ योगांविषयी आणि रक्षाबंधनाच्या काही नियमांबद्दल माहिती जाणून घेऊया. (Marathi News)
९ ऑगस्ट रोजी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुरू होणार असून, हा शुभ मुहूर्त दुपारी १ वाजून २० मिनिटांपर्यंत असेल. या वेळेच्या दरम्यान भावाच्या हातावर राखी बांधता येणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक शुभ मुहूर्त देखील जुळून येत आहेत. या दिवशी शोभन योग असून, हा योग १० ऑगस्ट रोजी रात्री २ वाजून १५ मिनिटांनी संपेल. त्यानंतर ब्रह्म मुहूर्त सुरू होणार असून, हे ब्रह्म मुहूर्त ४.२२ ते ५:०४ मिनिटांपर्यंत असेल. तर अभिजित मुहूर्त दुपारी १२ वाजून १७ मिनिटांपासून ते १२ वाजून ५३ मिनिटांपर्यंत असेल. या काळातही बहीण भावाला राखी बांधू शकते. अशा प्रकारचे सर्व मुहूर्त गेल्या ९० वर्षात पहिल्यांदाच येत असल्याचे सांगितले जात आहे. (Rakshabandhan)
रक्षाबंधनाची आणि राखीची खास माहिती
– भावासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी राखी निवडताना कच्चा धागा, रेशीम इत्यादींनी बनवलेली राखी निवडावी. प्लास्टिकची राखी वापरू नये. तपकिरी आणि काळ्या रंगाची राखी देखील भावाला बांधू नये. सध्या बाजारात सोन्या-चांदीच्या राख्याही उपलब्ध होतात त्या देखील बांधलेल्या चालतात.
– राखी बांधताना भावाचे तोंड पूर्वेकडे आणि बहिणीचे तोंड पश्चिमेकडे असावे ही बाब लक्षात ठेवा. या दोन दिशा भाऊ आणि बहिणीसाठी सर्वोत्तम मानल्या जातात. (Top Marathi News)
– नेहमी भावाच्या उजव्या हाताला राखी बांधावी. उजव्या हाताचा संबंध कर्माशी आहे. त्यामुळे या हातावर राखी बांधणे शुभ मानले जाते. पूर्वाभिमुख बसलेल्या भावाच्या कपाळावर कुंकू, अक्षत लावल्यानंतर त्याचे औक्षण करून मग त्याच्या उजव्या हाताला राखी बांधावी.
– शक्य असल्यास राखी बांधताना ‘येन बद्धो बलि राजा, दानवेन्द्रो महाबल:। तेन त्वाम् प्रतिबद्धनामि, रक्षे माचल माचल:।।’ या मंत्राचा जप करा. या मंत्राचा अर्थ असा आहे की ‘मी तुझ्या मनगटावर तोच पवित्र धागा बांधतो जो परम दयाळू राजा बळीला बांधला होता, जो तुझे सदैव संकटांपासून रक्षण करेल. (Latest Marathi Headline)
– कोणाला भाऊ नसेल तर अशा महिलांनी, कडुनिंब, वड, आवळा, केळी, शमी आणि तुळशीला राखी बांधणे चांगले मानले जाते. आवळा, कडुनिंब आणि बरग हे त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे निवासस्थान मानले जाते. या झाडांना राखी बांधल्यास त्रिदेव प्रसन्न होतात. याशिवाय आपण चुलत भावाला राखी बांधणे शुभ राहील.
– भावाला राखी बांधण्याआधी देवाला राखी बांधावी. राखी बांधताना नेहमी भावाला त्याचे डोके झाकण्यास सांगावे. त्याने डोक्यावर रुमाल किंवा टोपी घालणे आवश्यक आहे. शिवाय राखी बांधताना तिला तीन गाठी माराव्या. या तीन गाठी त्रिदेवांचे प्रतीक आहेत. (Top Trending News)
– हिंदू धर्मात काळा रंग अशुभ मानला जातो. वास्तुशास्त्रात तो नकारात्मकतेशी संबंधित आहे. म्हणून, रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ-बहिणींनी काळे कपडे घालू नयेत.
– फक्त भाऊ-बहिणीतच नाही तर गुरू आणि शिष्यातही रक्षाबंधन साजरी करु शकतात. शिष्य गुरूला राखी बांधू शकतात. पुजारी यजमानाला रक्षासूत्र बांधू शकतो. भक्त त्यांच्या देवाला रक्षासूत्र बांधू शकतात. राजा आपल्या सैनिकांना. स्वार त्यांच्या वाहनाला रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधू शकतात. (Social News)
=========
हे देखील वाचा : Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधनावेळी राखी बांधताना दोरीला तीन गाठच का मारतात?
Narali Purnima : जाणून घ्या नारळी पौर्णिमा सणाचे महत्व
Rakshabandhan : भावा बहिणीचे प्रेमळ नाते अधोरेखित करणारे ‘रक्षाबंधन’
============
– राखी बांधली गेल्यानंतर ती त्या दिवशी किमान २४ तास बांधून ठेवा. एक दिवस झाल्यावर ती राखी काढावी. अनेक ठिकाणी लोक रक्षाबंधनापासून जन्माष्टमीपर्यंत राखी बांधतात. काही ठिकणी राखी पोळ्याच्या दिवशी काढली जाते.
– राखी काढल्यानंतर राखीचे विसर्जन करा. ती राखी तुम्ही एका पेटीत ठेवू शकता किंवा देवाच्या झाडावर बांधू शकता. (Top Stories)
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics