Home » Rakshabandhan : जाणून घ्या रक्षाबंधनाची तारीख, शुभवेळ आणि या सणाचे महत्व

Rakshabandhan : जाणून घ्या रक्षाबंधनाची तारीख, शुभवेळ आणि या सणाचे महत्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Rakshabandhan
Share

श्रावण महिना म्हणजे सणांचा राजा. या संपूर्ण महिन्यात रोजच एखादा लहान मोठा सण साजरा केला जातो. दीप अमावास्यापासून सणांना जी सुरुवात होते ती अनंत चतुर्दशीपर्यंत चालूच असते. श्रावणात नागपंचमी झाल्यानंतर सगळ्यांनाच वेध लागतात ते रक्षाबंधनाचा. श्रावण महिन्यात पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिला तिचे कायम रक्षण करण्याचे वचन देतो. आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक नात्याला समर्पित एक सण साजरा केला जातो. तास भाव बहिणीचे सुंदर नाते दर्शवणारा सण म्हणजे ‘रक्षाबंधन’. (Rakshabandhan)

हिंदू संस्कृतीमध्ये रक्षाबंधन सणाला मोठे महत्व आहे. मुख्य म्हणजे हा सण देवीदेवतांच्या काळापासून साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते. रक्षाबंधन सणाच्या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी देतो. २०२५ मध्ये हा सण कोणत्या दिवशी साजरा केला जाईल, राखी बांधाची शुभ वेळ, या सणाची नेमकी तारीख काय आणि रक्षाबंधनाची माहिती जाणून घेऊया. (Marathi News)

पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला रक्षाबंधन साजरे केली जाते. यंदा पौर्णिमा तिथी ८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजून १२ मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, ९ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजून २१ मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे. मात्र, उदय तिथीनुसार, ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. ९ ऑगस्ट रोजी पहाटे ५:३५ वाजेपासून ते दुपारी १:२४ वाजेपर्यंत रक्षाबंधनाचा सण साजरा करण्याचा शुभ मुहूर्त आहे. या मुहूर्तावर राखी बांधणे अतिशय शुभ असणार आहे. तर अभिजीत मुहूर्त दुपारी १२:०० वाजेपासून ते दुपारी १२:५३ वाजेदरम्यान आहे. या काळात राखी बांधणे अधिक शुभ मानले जाते. (Todays Marathi Headline)

=========

Chaturthi : यंदा २१ वर्षांनी श्रावणात आला अंगारकी चतुर्थीचा योग

=========

Rakshabandhan

शास्त्रानुसार, भद्र काळात रक्षाबंधन साजरा करणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे या काळात भावाला राखी बांधू नये. मात्र, यंदा रक्षाबंधन काळात भद्राचे सावट नसणार आहे. त्यामुळे दिवसभर कधीही राखी बांधली तरी चालणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाला बांधलेली राखी २४ तासांनंतर काढू शकता. किंवा जन्माष्टमीच्या दिवशीही राखी काढलेली चालते. काही लोक रक्षासूत्र म्हणून जोपर्यंत राखी निघत नाही तोपर्यंत हातातून काढत नाहीत. तर अनेकांकडे पोळ्याच्या दिवशी बांधलेली राखी काढली जाते. (Top Trending News)

रक्षाबंधनाचा इतिहास
पुराणकथेनुसार, राजा बळी हा भगवान विष्णूचा खूप मोठा भक्त होता. एकदा विष्णू देवांना प्रसन्न करण्यासाठी त्याने यज्ञ केला. आपल्या भक्ताची परीक्षा घेण्यासाठी भगवान विष्णूंनी वामनाचे रुप घेतले आणि ब्राम्हणाच्या वेशात ते बळीराजाकडे भिक्षा मागण्यासाठी पोहोचले. वामन रुपातील विष्णूंनी तीन पावलांची भूमी दान म्हणून देण्यात यावी अशी इच्छा बळीराजाकडे केली. वामनाची ही इच्छा बळीराजाने मान्य केली. (Social Updates)

वामनाने पहिल्या पावलामध्ये संपूर्ण भूमी व्यापली तर दुसऱ्या पावलामध्ये संपूर्ण आकाश व्यापून टाकले. नंतर वामनाने विचारलं की मी आता माझं तिसरं पाऊल कुठे ठेऊ? तेव्हा बळीराजाने स्वत:चं मस्तक पुढे केलं आणि म्हटलं की तिसरं पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा. राजाची ही भक्ती पाहून वामन रुपातील विष्णूने त्याला पाताळ लोकांचा राजा बनवले. सोबतच बळीराजाने हेसुद्धा वरदान मागितले की तुम्ही माझ्यासोबत पाताळ लोकांमध्येच रहावे. (Top Marathi News)

हे सगळं घडत असताना लक्ष्मी माता मात्र भगवान विष्णू वेळेत न परतल्यामुळे चिंतित होती. तिने एका गरीब महिलेचा वेश घेतला आणि बळीराजाकडे जाऊन तिने त्याला राखी बांधली. राखीच्या बदल्यात राजाने काहीही मागण्यास सांगितले. तेव्हा लक्ष्मीदेवीने खऱ्या रुपात परत येत भगवान विष्णूला पुन्हा पाठवण्याची विनंती केली. राखीचा मान ठेवत राजाने भगवान विष्णूला लक्ष्मीसोबत पुन्हा पाठवलं. (Marathi Trending News)

Rakshabandhan

महाभारत काळातील रक्षाबंधन
मान्यतेनुसार महाभारताच्या युद्धापूर्वी एकदा भगवान श्रीकृष्ण यांच्या बोटाला इजा झाली आणि त्यातून रक्तस्त्राव होत होता. तिथे असलेल्या द्रौपदीने ते पाहिले आणि लगेच आपल्या साडीचा तुकडा फाडत श्रीकृष्णाच्या बोटाला बांधला. ज्यानंतर श्रीकृष्णाने द्रौपदीला प्रत्येक संकटातून वाचवण्याचे वचन दिले. याच वचनाचा मान ठेवत द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी श्रीकृष्ण तिच्या मदतीला धावून आला. तेव्हापासून रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधते. (Latest Marathi Headline)

रक्षाबंधनाशी संबंधित महाभारतात आणखी एक कथा सांगितली जाते. ज्यानुसार, महाभारताच्या युद्धादरम्यान जेव्हा युधिष्ठिरने भगवान कृष्णाला विचारलं की मी सगळ्या संकटांना कशाप्रकारे पार करु शकतो तेव्हा श्रीकृष्णाने युधिष्ठिरला सांगितलं की, “तू तुझ्या सर्व सैनिकांना रक्षासूत्र बांध. युधिष्ठिरने असंच केलं आणि पूर्ण सेनेतील सर्व सैनिकांना रक्षासूत्र बांधले गेले. (Marathi Top News)

मुघल काळाशी संबंधित कथा
देशात एकेकाळी राजपूत हे मुस्लिम आक्रमणाविरुद्ध लढत होते. पती राणा सांगा यांच्या मृत्यूनंतर मेवाडची कमान राणी कर्णावती हिने सांभाळली होती. चितौडची राणी कर्णावती हीने गुजरातच्या सुलतान बहादूर शाह याच्या आक्रमणापासून आपले राज्य सुरक्षित व्हावे यासाठी सम्राट हुमायूंला एक पत्र पाठवले आणि त्या पत्रासोबत एक राखी पाठवून रक्षा करण्याची विनंती केली. (Top Stories)

=========

Shravan Somvar: १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक पूर्वाभिमुख घृष्णेश्वर महादेव मंदिर

=========

हुमायूंने राखीचा स्वीकार केला आणि राणी कर्णावतीची रक्षा करण्यासाठी तो चितौडला रवाना झाले. परंतु त्यांना पोहचण्यासाठी उशीर झाला आणि राणीने आपल्या सन्मानासाठी पेटत्या ज्वाळेत उडी घेतली. परंतु राजा हुमायूंच्या सेनेने चितौडला शाहपासून सोडवले आणि राणीचा पुत्र विक्रमजीत सिंह याच्या हाती चितौडचे राज्य सोपवले. (Social News)

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.