Home » Rakhi Sawant : डोनाल्ड पाप्पांनी राखी सावंतसाठी बांधला चक्क बंगला, अभिनेत्रीचा अजब दावा

Rakhi Sawant : डोनाल्ड पाप्पांनी राखी सावंतसाठी बांधला चक्क बंगला, अभिनेत्रीचा अजब दावा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Rakhi Sawant
Share

मनोरंजनविश्वातील ड्रामा क्वीन म्हणून राखी सावंतची ओळख आहे. राखी सावंत म्हणजे नुसता बोलायची कधी आणि बोलायचा भात. हिंदी मनोरंजनविश्वामधे राखीने आपल्या अभिनय आणि डान्सपेक्षा जास्त ओळख स्वतःच्या जबरदस्त बोलण्यातून मिळवली आहे. आधी राखी तिच्या आयटम सॉंग्समुळे गाजायची, मात्र हळूहळू तिची ओळख बदलली आणि ती तिच्या वादांमुळे, विचित्र वक्तव्यांमुळे गाजू लागली. आज तर राखी बोलणार आणि ती गाजणार अशी परिस्थिती आहे. मध्ये गायब झालेली राखी आता पुन्हा गाजू लागली. सध्या राखीच्या बोलण्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव आल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (Bollywood News)

सध्या राखीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राखीने तर अजब गजब दावे करण्याचे सर्वच रेकॉर्ड तोडले आहे. या व्हिडिओमध्ये तिने तिथे ट्रम्पला आपले वडील बनवले आहे. व्हिडीओमध्ये राखी सावंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल बोलत आहे. राखी म्हणतेय की, माझ्या डोनाल्ड पप्पांनी माझ्यासाठी बंगला बांधलाय. राखी सावंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये राखी म्हणतेय की, “धन्यवाद… पप्पा डोनाल्ड ट्रम्प… माझे डोनाल्ड बाबा माझ्यासाठी सर्व काही करतात. त्यांनी अमेरिकेत माझ्यासाठी एक मोठा बंगला बांधलाय…” राखी बोलत असतानाच कुणीतरी मधे काहीतरी कमेंट करतं. तर राखी म्हणते, “बंगलोर नाही, तर एक बंगला…” (Top Marathi Headline)

या व्हायरल व्हिडीओमध्ये राखी सावंत पुढे म्हणाली की, “मी लंडनला जातेय. अमेरिकेला जातेय… पप्पा डोनाल्ड ट्रम्प यानी माझी फेवरेट कार दिली आहे. ट्रम्प माझे पप्पा आहे…” राखीच्या व्हिडीओवर युजर्स तीव्र प्रतिक्रिया देत आहेत आणि तान्या मित्तलचं नाव घेऊन टीका करत आहेत. अनेकजण असंही म्हणतात की, राखी या व्हिडीओद्वारे तान्या मित्तलला ट्रोल करतेय. एका युजरनं कमेंट केलीय की, “तान्या मित्तल प्रो” तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय की, “राखी ट्रम्प अमेरिकेच्या पुढच्या राष्ट्रपती…” आणखी एकानं लिहिलंय की, “ती तान्या मित्तलपासून इंस्पायर आहे…” (Marathi Latest News)

राखी सावंतची तुलना आणि बडेजावचा आव मिळवणाऱ्या आणि बिग बॉसमुळे गाजणाऱ्या तान्या मित्तलशी केली जात आहे. तान्या देखील सध्या बिग बॉस १९ च्या घरात सदस्य म्हणून गेली आहे. या घरामध्ये ती सतत तिच्या श्रीमंतीचा तिच्या आलिशान अशा जीवन शैलीचा उल्लेख करताना दिसते. तिच्या या बोलण्यामुळेच ती सध्या सोशल मीडियावर चमकताना आणि लोकांच्या हास्याचा विषय बनताना दिसत आहे. अलीकडेच, राखी सावंतने खुलासा केला की ती “बिग बॉस १९” च्या घरात प्रवेश करत आहे. तसेच तिने चाहत्यांना वोट करा असे देखील सांगितले आहे. आता खरंच राखी बिग बॉसच्या घरात जाऊन बिग बॉसची लोकप्रियता आणि टीआरपी वाढवणार की नाही हे पाहावे लागेल. (Top Trending News)

==========

Georgia Meloni : जॉर्जिया मेलोनी आणि सिगारेट !

==========

दरम्यान राखी आणि तिच्या पूर्व पतीसोबतचे विवाहाचे वाद मिटले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी अभिनेत्री राखी सावंत आणि तिचा माझी पती आदिल दुर्राणी यांनी एकमेकांविरुद्ध दाखल केलेले FIR रद्द केले आहेत .त्या दोघांमधील वाद सामंजस्याने सोडवला आहे . FIR रद्द होताच राखीने पहिली प्रतिक्रिया दिली असून, ‘भारत माता की जय मोदी सरकार की जय… मेरे डॅडी डोनाल्ड ट्रम्प की जय ..बाय’ असं म्हणत ती कारमधून निघून गेली. मधल्या काही काळापासून राखी सावंत दुबईमध्ये राहत होती. त्यामुळेच ती जास्त लाइमलाईट्मधे नव्हते. मात्र आता आल्या आल्या लगेच राखी प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.