देशातील अरबपती व्यावसायिक राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे वयाच्या ६२ व्या वर्षात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सर्वांना धक्का बसला आहे. तर राकेश झुनझुनवाला यांना भारतातील ‘वॉर्न बफे’ यांच्या रुपात सुद्धा ओळखले जात होते. ज्या कंपनीत ते गुंतवणूक करतात त्या कंपनीचे शेअर्समध्ये खुप चांगली कमाई होत असल्याचे वेळोवेळी दिसून आले होते. तर जाणून घेऊयात राकेश झुनझुनवाला यांच्याबद्दल काही खास गोष्टी.
राकेश झुनझुनवाला यांचा जन्म ५ जुलै १९६० रोजी झाला होता. ते एक चार्टर्ड अकाउंटेंट होते. मुंबईतील एका राजस्थानी परिवारात ते वाढले. त्यांचे वडिल आयकर आयुक्त रुपात काम करत होते. त्यांनी सिडनॅम कॉलेमध्ये डिग्री घेतली आणि त्यानंतर इंस्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटेट्स ऑफ इंडियामध्ये प्रवेश घेतला होता. १४ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांचे निधन झाले.
कोण होते राकेश झुनझुनवाला?
राकेश झुनझुनवाला यांना ‘भारताचे वॉर्न बफे’ किंवा ‘बुल मार्केटचा राजा’ असे म्हटले जात होते. शेअर बाजारातील कमाईमध्ये त्यांचे फार मोठे योगदान होते. त्यांच्यासारखी शेअर मार्केटमधील कमाई करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करायचे. ज्या कंपनीत ते गुंतवणूक करायचे त्या कंपन्यांचे शेअरमध्ये त्यांची उत्तम कमाई करायचे. याच कारणामुळे गुंतवणूकदारांकडून गुंतवणूकीसाठी त्यांच्या निर्णयाची वाट पहायचे. जुलै २०२२ पर्यंत त्यांची जवळजवळ संपत्ती ५.४ बिलियन होती. ते भारतातील ३६वे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती होते.
राकेश झुनझुनवाला यांना शेअर मार्केट कशी निर्माण झाली आवड?
राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांना शेअर मार्केटमध्ये अशावेळी आवड निर्माण झाली जेव्हा त्यांनी आपल्या वडिलांना शेअर मार्केट संदर्भात त्यांच्या मित्रांसोबत चर्चा करताना पाहिले होते. तर राकेश यांना त्यांच्या वडिलांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक संदर्भात मार्गदर्शन केले हे सुद्धा खरं आहे. राकेश झुनझुनवाला जेव्हा कॉलेजमध्ये जाऊ लागले तेव्हापासून त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी १९८५ मध्ये आपल्या ५ हजार रुपयांच्या सेविंगमधून गुंतवणूक केली होती. त्यांची गुंतवणूक आज वाढून ११ हजार कोटी रुपये झाली आहे.
हे देखील वाचा- भाडेकरुंना सुद्धा भरावा लागणार १८ टक्के जीएसटी, जाणून घ्या नियम
नुकतीच सुरु केली होती Akasa Air एअरलाइन्स
राकेश झुनझुनवाला यांनी नुकतीच Akasa Air ही एअरलाइन्स सुरु केली होती. तर ७ ऑगस्टला मुंबई-अहमदाबादच्या मार्गावर आपले पहिले उड्डाण केले होते. केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि परराष्ट्र राज्यमंत्री जनरल वीके सिंह यांनी त्याचे उद्घाटन केले होते. तर भारतातील या नव्या एअरलाइन्सला २२ जुलै रोजी अहमदाबाद, बंगळुरु, मुंबई आणि कोची मध्ये व्यायसायिक उड्डाणांसाठी तिकिट बुकिंग सुरु करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी डीजीसीए कंपनीला एअर ऑपरेटर सर्टिफिकेट दिले गेले होते.