केंद्रातील मोदी सरकारने आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता राजपथाचे (Rajpath) नाव बदलून ‘कर्तव्य पथ’ असे दिले जाणार आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेपासून राष्ट्रपती भवनापर्यंतचा संपूर्ण परिसर आता कर्तव्य पथाच्या रुपात ओळखला जाणार आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ सप्टेंबरला सेंट्रल विस्टा पुनर्विकास प्रोजेक्ट अंतर्गत बनवण्यात आलेल्या एका खंडाचे उद्घाटन करणार आहेत. राजपथाचे नाव बदलण्यासाठी नवी दिल्ली नगरपालिका परिषदेने राजपथ आणि सेंट्रल विस्टा लॉनचे नाव बदलून राजपथ करण्यासाठी ७ सप्टेंबरला एक विशेष बैठक बोलावली आहे.
राजपथाचे काय आहे महत्व?
राजपथ भारताच्या अभिमानाचे प्रतीक म्हटले जाते. नवी दिल्लीतील लुटियंस झोनमध्ये राष्ट्रपती भवनापासून इंडिया गेटवरुन नॅशनल स्टेडियम पर्यंत हा रस्ता जातो. संसद भवनापासून नॉर्थ आणि साउथ ब्लॉक याच मार्गावर आहे. २६ जानेवारीला होणारी परेड सुद्धा याच मार्गावर होते. दिल्लीतील राजपथ हा काही कारणांमुळे खास आहे. आता मोदी सरकारकडून या रस्त्याचे नाव बदलून कर्तव्यपथ करणार आहे. त्यानंतर इंडिया गेटवर नेताजींच्या पुतळ्यापासून राष्ट्रपती भवनापर्यंतचा संपूर्ण मार्ग आणि परिसर सुद्धा त्याच नावाने ओळखला जाणार आहे. या मार्गावर प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनावेळी भव्य परेड आणि रॅली काढली जाते.(Rajpath)
कधी बांधला गेला?
या रस्त्याची बांधणी इंग्रजांच्या शासनावेळी झाली होती. राजपथ ब्रिटिश वास्तुकार सर एडविन लुटियंस यांनी डिझाइन केला होता. इंडिया गेट पासून राष्ट्रपती भवनापर्यंत जाणाऱ्या मार्गावर दोन्ही बाजूला गार्डन आहे. तेव्हापासून राष्ट्रपती भवनापासून नव्या शहराचे दृष्य प्रस्तुत करण्यासाठी बनवण्यात आला होता. जो त्या काळी अधिकाऱ्यांचे घर होते. स्वातंत्र्यानंतर त्याला राष्ट्रपती भवन म्हणून ओळखले जाऊ लागले. राजपथाला याआधी किंग्स वे असे म्हटले जात होते. कारण जॉर्ज पंचम यांच्या सन्मानार्थ हे नाव दिले गेले होते. जॉर्ज पंचम यांनीच ब्रिटिश भारताची राजधानी कोलकाता येथून दिल्लीत स्थलांतरित केली होती. त्यावेळी तो राजाचा मार्ग होता. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किंग्स वे चे नाव बदलून राजपथ असे केले गेले.
हे देखील वाचा- महागाई मंदी आणि व्याज दरांमुळे भारताच्या विकासाचा वेग मंदावणार?
गुलामगिरीची मानसिकता दूर करण्याचा उपक्रम
यापूर्वी ज्या मार्गावर पीएम यांचे निवासस्थान आहे त्याचे नाव सुद्धा रेसकोर्स रोड असे बदलून लोक कल्याण मार्ग असे केले गेले होते. यावरुन विरोधांनी सुद्धा खुप गोंधळ केला होता. सरकारचा तर्क असा आहे की, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर सुद्धा गुलामगिरीचे कोणतेही प्रतीक राहिले नाही पाहिजे. सर्वकाही न्यू इंडिया व्हिजनला अधिक मजबूत बनवणारे असले पाहिजे.(Rajpath)
सेंट्रल विस्टाअंतर्गत केली जातेय बांधणी
राजपथाच्या आसपास सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट अंतर्गत काही कामं केली जात आहेत. यामध्ये राजपथाचे सौंदर्यीकरणाव्यतिरिक्त नव्या संसदेची निर्मिती सुद्धा करण्यात येणार आहे. सेंट्रल विस्टा प्रोजेक्टची घोषणा सप्टेंबर २०१९ मध्ये केली होती. दरम्यान, प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहचले होते. त्यानंतर त्याचे काम फेब्रुवारी २०२१ मध्ये सुरु झाले. आता सेंट्रल विस्टा एवेन्यू प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे. येथे ३.९० लाख स्क्वेअर मीटर ग्रीन एरिया आहे. लोकांना फिरण्यासाठी १६.५ किमीचे रस्ते तयार करण्यात आला आहे. येथे फिरणारी लोक शॉपिंग सुद्धा करु शकतात. त्यासाठी ५ वेडिंग झोन असतील. प्रत्येक झोनमध्ये ४-५० वेंडर असतील. येथे पायी चालणाऱ्यांसाठी खास सोय ही केली आहे. या खंडाचा ८ सप्टेंबरला पीएम मोदी उद्घाटन करतील.