Home » राजपाल यादव यांची करोडोंची संपत्ती जप्त

राजपाल यादव यांची करोडोंची संपत्ती जप्त

by Jyotsna Kulkarni
0 comment
Rajpal Yadav
Share

बॉलिवूडमध्ये अतिशय प्रतिभावान कलाकार आहेत. यातच असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका खूपच कमी अगदी नाहींच्या बरोबर निभावल्या असतील. मात्र सहायक भूमिकांमधून या कलाकारांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. प्रेक्षकांवर आणि सिनेजगतावर त्यांनी आपल्या प्रतिभेने अधिराज्य गाजवले आहे. असाच एक अभिनेता म्हणजे राजपाल यादव.

हिंदी सिने जगतातील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध विनोदी अभिनेता म्हणून राजपाल यादवला ओळखले जाते. बॉलिवूडमधील जवळपास सर्वच विनोदी चित्रपटांमध्ये राजपाल लहान मोठ्या भूमिका निभावताना दिसतात. त्यांना ओळखत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ उक्ती राजपाल यांना अगदी बरोबर लागू होते. नेहमी आपल्या चित्रपटांमुळे आणि अभिनयामुळे चर्चेत असलेले राजपाल सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत.

सध्या राजपाल हे त्यांच्यावर आलेल्या एका संकटामुळे प्रकाशझोतात आले आहे. प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार ११ ऑगस्ट अर्थात रविवारी राजपाल यांची करोडोंची मालमत्ता बँकेने जप्त केली आहे. बँकेने कारवाई करत त्यांची संपूर्ण मालमत्ता सील केली असून तेथे बँकेचा बोर्डही लावला आहे.

Rajpal Yadav

जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण :

राजपाल यादव आणि त्यांची पत्नी असलेल्या राधा यादव यांनी २०१२ साली ‘अता पता लापता’ हा सिनेमा तयार केला. यात राजपाल मुख्य भूमिकेत होते. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती त्यांची पत्नी राधा यादव यांनी केली होती. चित्रपटात पैसे गुंतवण्यासाठी राजपाल यादव आणि त्यांच्या पत्नीने सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून जवळपास 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र दुर्दैवाने हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच बिझनेसमॅन असलेल्या एमजी अग्रवाल यांनी राजपाल यादव यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली.

दरम्यान एमजी अग्रवाल यांनी राजपलने त्यांच्याकडून 5 कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला. राजपाल यांनी अग्रवाल यांच्या मुरली प्रोजेक्ट कंपनीसोबत करार केला होता. असे असूनही जेव्हा राजपाल यादव स्वतंत्रपणे चित्रपट प्रदर्शित करत असल्याचे त्यांना समजले तेव्हा त्यांनी त्यांचे पैसे परत मागितले. राजपाल यादवने त्यांना एक चेक दिला जो बाऊन्स झाला. अनेक वादानंतर हा चित्रपट २ नोव्हेंबर २०१२ रोजी प्रदर्शित झाला. करोडोंमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वाईटरित्या फ्लॉप झाला आणि केवळ ३८ लाख रुपये कमवू शकला. चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल यादव यांना २०१८ साली तुरुंगात देखील जावे लागले होते. सुमारे ३ महिने ते तुरुंगात होते.

=======

हे देखील वाचा : तेजश्री प्रधानचे ग्लॅमरस फोटोशूट

======

दरम्यान राजपाल यादव यांची उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमधील संपत्ती बँकेकडून जप्त करण्यात आली असल्याची माहिती आहे. बँकेने त्याची करोडोंची संपत्ती जप्त केली आहे. राजपाल यांनी वेळेवर कर्जाची रक्कम न भरल्याने ही जागा जप्त करण्यात माहिती आहे. राजपाल यादव यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स शाखेतून मोठे कर्ज घेतले होते. त्या बदल्यात राजपाल यादव यांनी वडील नौरंग यादव यांच्या नावावर असलेली जमीन बँकेत हमी म्हणून ठेवली होती. मात्र ही रक्कम न भरल्याने त्या जमिनीला जप्त करण्यात आले आहे.

बॅंकेच्या टीमने गोपनीय पद्धतीने रविवारी ११ ऑगस्ट रोजी राजपाल यांच्या मालमत्तेवर बॅनर लावला आहे. त्यावर सदर मालमत्ता सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबईची आहे आणि त्यावर कोणत्याही प्रकारची खरेदी-विक्री करू नये असे लिहिलेले आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.