भारताच्या इतिहासातील काही काळे दिवस म्हणून ज्या दिवसांचा उल्लेख केला जातो त्या दिवसांमधीलच एक दिवस म्हणजे २१ मे १९९१. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची याच दिवशी हत्या करण्यात आली होती. आई इंदिरा गांधींसारखंच राजीव गांधी यांना देखील वीरमरण प्राप्त झालं होतं. देश याही घटनेनं हादरून गेला होता की एका माजी पंतप्रधानांची चक्क बॉम्बस्फोट करून हत्या करण्यात आली होती. सुरक्षा यंत्रणाच पुन्हा एक मोठं अपयश म्हणून या घटनेकडे पाहिलं जात होतं. राजीव गांधी आधीच हिट लिस्टवर असल्याचं इनपुट असताना त्यांना सुरक्षा का पुरवण्यात आली नाही? असे प्रश्न विचारले जात होते. (Top Stories)
मात्र सुरक्षा यंत्रणांनी या अपयशातून बाहेर येत आपली चुणूक दाखवली होती आणि एका पेपरवरून आणि कॅमेऱ्यावरून राजीव गांधींच्या मारेकऱ्यांचा शोध लावला होता. नेमका हा तपास कसा झाला होता? एका क्ल्यू वरून सुरक्षा यंत्रणा राजीव गांधींच्या मारेकऱ्यांपर्यंत कशा पोहचल्या जाणून घेऊ. (Rajiv Gandhi)
२१ मे १९९१ ला राजीव गांधी तामिळनाडुतील श्रीपेरुम्बदूर येथे सभेला पोहचताच एक मोठा स्फोट झाला आणि राजीव गांधींसह १४ लोक मृत्युमुखी पडले आणि ५० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. बॉम्बस्फोट तामिळनाडूत झाला असल्याने तपासाची सुरुवात झाली तमिळनाडूपासूनच. पण काही महत्त्वाच्या क्लूजनी तपासकर्त्यांना नेलं बेंगळुरूकडे… जिथे काही संशयित लपून बसले होते. या केसमध्ये विशेष तपास पथक म्हणजेच SIT नेमली गेली होती आणि त्याचे प्रमुख होते कर्नाटक कॅडरचे आयपीएस अधिकारी डी. आर. कार्तिकेयन.
तपास जसजसा पुढे गेला, तसं LTTE – म्हणजेच लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम या श्रीलंकेतल्या संघटनेचा सहभाग स्पष्ट होत गेला. विशेषतः आत्मघाती बॉम्बस्फोट करण्याची पद्धत. राजीव गांधींचा श्रीलंकेतील तामिळ लोकांचा प्रश्न सोडवण्यात सहभाग यावरून हे जवळपास क्लियर झालं होतं जी यात LTTE चाच सहभाग असणार. त्यानंतर CBI, विशेष कमांडो फोर्सेस अशा अनेक केंद्रीय यंत्रणा या तपासात सामील झाल्या. या कटाचा मास्टरमाइंड होता शिवारसन, LTTE चा राजकीय विंग प्रमुख. (Top Stories)
मात्र हत्येला तीन महिने उलटले तरी तो फरारच होता. हजारो फोन कॉल्स, शेकडो चिठ्ठ्या, हजारो पत्रं – माहिती मिळवण्यासाठी देशभरातून लोकांनी मदत केली. पण काहीच उपयोग होत नव्हता. मग अचानक एक दिवस कर्नाटकाच्या मंड्या जिल्ह्यातील मुथथी नावाच्या एका गावात काही लोक संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली.स्थानिक पोलीस – सी. के. नागराज आणि मुत्थुराया यांनी या ठिकाणी छापा टाकला. पण त्यावेळी तिथे एक धक्कादायक घटना घडली. पोलिसांचा छापा पडायच्या आत यातील काही संशयितांनी सायनाईड खाल्लं, काही तिथेच मृत्युमुखी पडले. पण त्याचवेळी पोलिसांनी या ठिकाणी एक छोटासा कागदाचा तुकडा मिळवला – त्यावर लिहिलं होतं: “अंजनप्पा – पुट्टेनहळी” आणि हाच तुकडा पुढे इतका महत्त्वाचा ठरला की त्यावरून उलगडलं एक मोठं गूढ! (Rajiv Gandhi)
या सायनाइड खाल्लेला काही संशयितांना वाचवण्यात पोलिसांना यश आलं. यातील काही LTTE सदस्यांनी पुढे कबुली दिली की ते LTTE चे सदस्य आहेत. सोबतच CBI ला समजलं की HAL – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये एक LTTE समर्थक काम करत होता.. या व्यक्तीनं राजीव गांधींच्या हत्येनंतर पेढे वाटले होते! महत्वाचं म्हणजे ही HAL भारत सरकारची एक कंपनी आहे. याचं चौकशी केल्यानंतर समोर आलं की HAL कंपनीच्या परिसरात काही LTTE सदस्य वास्तव्यास होते.
पोलिसांनी रेड टाकण्याचा विचार केला, पण त्यांच्याकडे AK-47 आणि ग्रेनेड्स असल्याची माहिती असल्यामुळे प्रत्यक्ष कारवाई थांबवण्यात आली. मात्र पोलिसांनी आपला तपास चालूच ठेवला. CBI च्या निर्देशानुसार आता J. P. नगरचे सब-इन्स्पेक्टर नरसिंह मूर्ती यांनी पुढील तपास हाती घेतला. ते पोलीस होते, पण या तपासासाठी त्यांनी गवळीचा वेश घेतला! “अंजनप्पा – पुट्टेनहळी” हा क्ल्यू घेऊन ते बेंगलोरमधील पुट्टेनहळी भागात गवळी बनून फिरू लागले. तिथे त्यांना अंजनप्पा नावाच्या बँक कर्मचाऱ्याची माहिती मिळाली. (Top Stories)
त्याने सांगितलं की, त्याच्या घरात काही लोक भाड्याने राहायला आले होते, पण हत्येनंतर अचानक निघून गेले. पोलिसांनी पुढे अजून तपास केल्यानंतर अजून माहिती पुढे आली की रंगनाथ नावाच्या माणसाने त्या लोकांना घर मिळवून दिलं होतं. त्यानंतर हे अंजनाप्पा कडे राहणारी लोकं शिफ्ट होताना आपलं सामानही बरोबर घेऊन गेले होते. त्यामुळे मग मूर्तीनी आजूबाजूच्या वाहन चालकांकडे चौकशी केली. तेव्हा मूर्तींनी एका गुड्स व्हॅन चालकाकडून कळलं की लोकांचे सामान विजयनगरमधील एका चर्चमध्ये नेलं गेलं होतं. तेथील काही धर्मगुरु व भक्त LTTE समर्थक होते. (Rajiv Gandhi)
मिसेस मृदुला या चर्चच्या कर्मचारीने सांगितलं की, शिवारसन आणि इतर काही सदस्य इथे होते. शिवारसन हे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनाही आता तपास योग्य दिशेनं जात असल्याची खात्री पटली. तेथूनच म्हणजे या चर्चमधूनच पुढची माहिती मिळाली, ते लोक आता बंगलोरच्या कोननकुंटे भागात राहत आहेत. 18 ऑगस्ट १९९१ रोजी, पोलिसांनी कोननकुंटेमधील घराचा सॉफ्ट सर्व्हेन्स सुरू केला. २४ तास पोलीस न जेवता न हलता अगदी सावधपणे या घराच्या हालचाली बघत राहिले. ता संशयितांकडे शस्त्र असल्याने सोबतच मागचा सायनाइड खाऊन जीभ देण्याचा प्रकार पाहता पोलीस सावधपने पावलं टाकत होते.
===============
हे देखील वाचा : Nescafé Coffee Success Story : नेसकॅफेच्या कॉफीची या व्यक्तीने केली सुरुवात, वाचा यशाची कथा
===============
मात्र दुसऱ्या एक विचित्र घटना घडली. पाऊस धो धो पडत असल्याने ज्या घरावर पोलीस लक्ष ठेऊन होते त्याच्याच बाजूला एक ट्रक चिखलात अडकला होता. एक पोलीस त्या ट्रकला मदत करण्यास पुढे आला. आणि त्या घरातल्या संशयितांनी हेच नोटीस केलं. आणि त्यांनी पोलिसांवर अंधाधुंद फायरिंग चालू केली. यात काही पोलिसही जखमी झाले. त्यानंतर रात्री उशिरा स्पेशल कमांडो फोर्स आली आणि त्यांनीही कारवाई केली. पोलिसांनी घरात प्रवेश केला. पण पुन्हा तेच भयावह चित्र. आतल्या सर्व LTTE सदस्यांनी सायनाईड घेतलं होतं. सिवारसनने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. हत्येतले काही आरोपी आता संपले होते मात्र प्रकरण आता जवळपास निकाली निघालं होतं. १९९८ मध्ये CBI ने या प्रकरणात २६ जणांवर आरोपपत्र दाखल केलं. (Rajiv Gandhi)
पुढे १९९९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ४ आरोपींच्या मृत्युदंडाला मंजुरी दिली ज्यांची नावं होती नलिनी श्रीहरन, तिचा नवरा श्रीहरन उर्फ मुरुगन, पेरारिवेलन, आणि संथन.नंतर नलिनीला सोनिया गांधींच्या हस्तक्षेपाने फाशीऐवजी जन्मठेप झाली. धक्कदायक म्हणजे पुढे २०२२ मध्ये नलिनी, श्रीहरन आणि इतर आरोपींची सुटका झाली. ते घर जिथं सिवारसन आणि त्याच्या टीमनं आश्रय घेतला होता ते कोननकुंटेतील ठिकाण पुढे पोलीस स्टेशनमध्ये बदललं आणि नंतर शाळेसाठी ते जागा भाड्याने दिली गेली.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics