बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्या आयुष्याशी संबंधित बहुतांश असे काही किस्से आणि कथा आहेत ज्यांबद्दल फार कमी जणांना माहिती आहे. अशातच त्यांच्या लाइफमधील एक किस्सा म्हणजे तो त्यांच्या करियर संदर्भातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काका म्हणजेच राजेश खन्ना हे चमत्कारावर खुप विश्वास ठेवायचे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील असा एक चमत्कार आहे जो खरंच सत्यात उतरला. हा चमत्कार त्यांच्या बंगल्या संदर्भातील आहे.
ही कथा १९६० च्या दशकातील आहे. मुंबईतील कार्टर रोडवर त्यावेळी अत्यंत कमी बंगले होते. त्या दरम्यान, नौशाद सहाब यांनी येथील एक बंगला खरेदी केला होता. त्याचे नाव ‘आशियाना’ असे होते. नौशाद सहाब यांच्या बंगल्याच्याच बाजूला एक दोन मजली बंगला होता ज्याला लोक बहुतांशवेळा भूत बंगला म्हणायचे. त्या दिवसात राजेंद्र कुमर यांची फिल्म इंडस्ट्रीमध्ये खुप मोठे नाव होते आणि त्याचवेळी ते एका बंगल्याच्या शोधात होते. असे म्हटले जाते की, राजेंद्र कुमार यांच्या एका मित्रानेच त्यांना त्या बंगल्याबद्दल सांगितले होते. राजेंद्र यांना हा बंगला खुप आवडला होता पण तो खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्याच मुश्किल वेळेत राजेंद्र यांनी आपल्या काळातील प्रसिद्ध फिल्म मेकर बीआर चोपडा यांच्याशी संपर्क केला. त्यांचा सिनेमा ‘कानून’ सोबत अन्य दोन सिनेमे करण्यासाठी त्यांनी होकार दिला. राजेंद्र कुमार यांची एकच अट होती की, चोपडा साहेबांनी त्यांना पैसे अॅडवान्स द्यावेत. जेणेकरुन त्यांना तो बंगला खरेदी करता येईल. बीआर चोपडा यांनी ती अट मान्य केली आणि त्यांना पैसे अॅडवान्समध्ये दिले.
बीआर चोपडा साहेबांनी दिलेल्या पैशांनी राजेंद्र कुमार यांनी ६० हजार रुपयांत तो बंगला खरेदी केला. त्यानंतर त्या बंगल्यात पूजा केल्यानंतर त्याला ‘डिंपल’ असे नाव दिले. राजेंद्र कुमार त्या बंगल्यात राहू लागले. तेथे गेल्यानंतर राजेंद्र कुमार यांचे नशीबच पालटले. असे सांगितले जाते की, राजेंद्र कुमार यांचे सिनेमे काही आठवड्यांपर्यंत सिनेमागृहांमध्ये लागून राहिलेले असायचे. हे सर्वकाही राजेंद्र कुमार त्या बंगल्यात शिफ्ट झाल्यानंतर सुरु झाले होते.
हे देखील वाचा- मोठी बहिण स्टार आणि आईसुद्धा अभिनेत्री, तरीही डांन्सबार मध्ये काम करुन चालवले घर
काही वर्षानंतर राजेंद्र कुमार यांनी मुंबईत आणखी एक बंगला खरेदी केला. त्याचे ही नाव त्यांनी डिंपल असे ठेवले. नवा बंगला घेतल्यानंतर त्यांना आधीचा बंगला विक्री करुयात असे वाटत होते. याबद्दल जेव्हा राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांना कळले तेव्हा त्यांनी तो खरेदी करण्याचा विचार केला. त्यामुळेच त्यांनी कोणत्याही वेळेचा विलंब न करता त्यांनी १९६९ मध्ये तो बंगला ३.५ लाखांत राजेंद्र कुमार यांच्याकडून खरेदी केला त्यानंतर असेच झाले जशी राजेश खन्ना यांना अपेक्षा होती. रातोरात बंगल्याचे नाव त्यांनी ‘आशीर्वाद’ ठेवले. ऐवढेच नव्हे तर बॉलिवूड मधील पहिल्या सुपरस्टार मान ही त्यांना याच बंगल्यात राहण्यासाठी आल्यानंतर मिळाला होता. हा बंगला त्यांच्यासाठी खुप नशीबवान ठरला होता. मात्र २०१२ मध्ये राजेश खन्ना यांचे निधन झाले. २०१४ मध्ये काकांच्या दोन्ही मुली रिंकी खन्ना आणि ट्विंकल खन्ना यांनी हा बंगला ऑलकार्गो लॉजिस्टिकचे संस्थापन आणि अध्यक्ष शशि किरण शेट्टी यांना ९० कोटी रुपयांना विक्री केला. त्यानंतर बंगल्याच्या नव्या मालकांनी तेथे ४ मजली इमारत उभारणीसाठी तो बंगला पाडला.