Home » देशात सर्वाधिक काळ राष्ट्रपती राहिलेले ‘राजेंद्र बाबू’

देशात सर्वाधिक काळ राष्ट्रपती राहिलेले ‘राजेंद्र बाबू’

by Team Gajawaja
0 comment
Rajendra Prasad
Share

आधुनिक भारताच्या इतिहासात देशात असे बहुतांश नेते झाले ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी आणि त्यानंतर सुद्धा प्रभाव टाकला. जेथे महात्मा गांधी यांच्यासारखे व्यक्ती आज ही प्रभावी असल्याचे मानले जाते. मात्र त्यांच्या व्यतिरिक्त पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारखे ही काही नेते असे होते ते सुद्धा स्वातंत्र्यपुर्वोत्तर आणि नंतर ही प्रभावी ठरले. अशातच त्यापैकी एक असलेले डॉ. राजेंद्र प्रसाद (Rajendra Prasad) हे देशाचे सर्वाधिक काळ राहिलेले देशाचे राष्ट्रपती होते. त्यांचा रेकॉर्ड आजवर कोणाला ब्रेक करता आलेला नाही.

लहानपणापासुनच अभ्यासाकडे लक्ष
डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा जन्म ३ डिसेंबर १८८४ मध्ये एका कायस्थ परिवारातील बिहारच्या सीवानच्या जीरादेई गावात झाला होता. जो त्या काळी बंगाल प्रेसिडेंसी मध्ये होता. ते लहानपणापासून नेहमीच हुशार विद्यार्थी होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण छपरा आणि नंतर पटना येथे झाले. महाविद्यालयाचे शिक्षण कोलकाता प्रेसिडेंसी कॉलेजमध्ये झाले आणि त्यानंतर १९१५ मध्ये कायद्याची डिग्री एमएलएम पास केल्यानंतर कायद्याच्या विषयातच डॉक्टरेट ही उपाधि मिळवल्यानंतर त्यांना डॉ. राजेंद्र प्रसाद असे म्हणून संबोधले जाऊ लागले.

Rajendra Prasad
Rajendra Prasad

नेहमीच टॉपवर राहिले
राजेंद्र बाबू यांच्या नावाने प्रसिद्ध डॉ. राजेंद्र प्रसाद भारतीय स्वतंत्र्यता आंदोलनात तेवढे प्रत्यक्ष रुपात दिसले नाही पण स्वातंत्र्यानंतरच सामान्य जनतेला त्यांच्या बद्दल कळले. जेव्हा ते संविधानाचे सभेचे निर्मांते नेते म्हणजेच सभेचे अध्यक्ष बनले. लहानपणापासून अभ्यास, पेशाने वकील, वकिलाची डॉक्टरकी अशा सर्वांमध्ये अव्वल राहिले.

कधीच आपला साधेपणा सोडला नाही
राजेंद्र बाबू (Rajendra Prasad) नेहमीच देशाच्या सेवेत राहिले आणि असे वाटते त्यांनी स्वत:ला प्रचारापासून दूर ठेवण्यास यशस्वी झाले.स्वतंत्रता आंदोलनादरम्यान, त्यांनी देशातील दुष्काळ आणि पुरग्रस्तांच्या सेवेमध्ये स्वत: ला झोकून दिले. तसेच देशाचे पहिले राष्ट्रपती झाल्यानंतर सुद्धा त्यांनी आपला साधेपणा सोडला नाही. त्यांच्या या साधेपणाचा नेहमीच सन्मान करण्यात आला. ते राष्ट्रपती झाल्यानंतर सर्वजण हैराण झाले.

हे देखील वाचा- बेनजीर भुट्टो: पाकिस्तानच्या सैन्याविरोधात आवाज उठवणाऱ्या देशाच्या पहिल्या पंतप्रधान

देशाचे यशस्वीपणे प्रतिनिधित्व
भारताच्या राष्ट्रपतींच्या रुपात त्यांनी संविधानाच्या मर्यादांचे अगदी योग्यपणे पालन केले. त्याचसोबत राजकीय रुपात ते पूर्णपणे तटस्थ सुद्धा राहिले. त्यांनी देशाच्या बाहेर ही जेव्हा भारताचे प्रतिनिधित्व केले तेव्हा सर्वांना प्रभाविच केले. ते १९५२ नंतर १९५७ मध्ये पुन्हा राष्ट्रपती म्हणून निवड झाले आणि पुन्हा राष्ट्रपती होणारे ते एकमेव राष्ट्रपती आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.