राजीव गांधी उर्फ राजीव रतन गांधी यांचा जन्म २० ऑगस्ट १९४४ ला मुंबई येथे झाला. फिरोज गांधी व इंदिरा गांधी यांचे सुपुत्र राजीव गांधी. भारताचे ७ वे प्रधानमंत्री १९८४ ते १९८९.. त्यांची आजी ‘कमला गांधीच्या’ नावावरून त्यांचे नाव राजीव ठेवण्यात आले. कारण असे कि, कमला म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मीचे सिंहासन कमळ म्हणजे राजीव…
आपल्या मोठ्या भावासोबत राजीव गांधी यांनी प्राथमिक शिक्षण ड्युन स्कूल,दे हरादून येथे पूर्ण केले त्यानंतर, Trinity College मध्ये त्यांचे शिक्षण झाले व पुढील शिक्षणा करिता ते Cambride Imperial Collge लंडन येथे गेले. पुढे शिक्षण पुर्ण झाल्यावर राजीव गांधी यांचा राजकारणात प्रवेश झाला तो इंदिरा गांधींमुळे.
राजकारणात येण्यापूर्वी ते इंडीयन एअरलाईन्समध्ये वैमानिक म्हणून कार्यरत होते. दिल्ली- जयपूर- आग्रा या हवाई मर्गाचे ते पायलट होते. वेगात कार चालवण्याची हौस असणारे राजीव गांधी विमान मात्र अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चालवायचे. सुरुवातीला ते डाकोटा विमान उडवायचे. नंतर मात्र बोईंग उडवू लागले. ते जेव्हा-जेव्हा पायलट सीटवर असायचे आपलं पहिलं नाव सांगून प्रवाशांचं स्वागत करायचे. त्यांच्या कॅप्टन्सनादेखील त्यांचं पूर्ण नाव सांगू नये, अशा सूचना होत्या. त्याकाळी त्यांना पायलट म्हणून ५००० रुपये पगार होता. त्या काळात हे चांगलं वेतन होतं.
संजय गांधी यांच्या निधनानंतर १९८० मध्ये राजीव राजकारणात सक्रिय झाले. राजीव व सोनिया (Sonia Gandhi) दोघांचा राजकारणात येण्यास विरोध होताच, तशी जाहीर व्यक्तव्ये राजीव गांधीनी (Rajiv Gandhi) केली होती तरी पुढे विचार बदलून सन १९८१ मध्ये त्यांनी अमेठी येथून लोकसभा निवडणूक लढवली. त्यांनी लोकदलचे उमेदवार शरद यादव यांचा २ लाख मताधिक्याने पराभव केला. लवकरच ते आईचे प्रमुख सल्लागार तसेच युवक कॉंग्रेसचे प्रमुख बनले. मात्र, काही काळातच इंदिरा गांधींच्या सुरक्षारक्षकानेच इंदिरा गांधींची (Indira Gandhi) हत्या केली. त्यावेळी राजीव गांधी पश्चिम बंगालमध्ये होते. हवाई दलाच्या ज्या विमानाने राजीव गांधी दिल्लीला परतले त्या विमानात त्यांच्यासोबत पुढे दिल्लीच्या मुख्यमंत्री झालेल्या शीला दीक्षित यादेखील होत्या.
शीला दीक्षित यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, “विमान उडाल्यानंतर राजीव गांधी लगेच कॉकपीटमध्ये पायलटकडे गेले. तिथून आल्यावर त्यांनी आम्हाला विमानाच्या मागच्या बाजूला बोलावून सांगितलं की इंदिरा गांधींनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांनी आम्हाला विचारलं की अशा परिस्थितीत काय करतात?” “प्रणव मुखर्जींनी सांगितलं की पूर्वीपासून ही परंपरा आहे की सर्वात वरिष्ठ मंत्र्याला पंतप्रधानपदाची शपथ दिली जाते आणि त्यानंतर पंतप्रधानाची निवड होते. मात्र, माझे सासरे उमाशंकर दीक्षित म्हणाले की ते पंतप्रधान होण्याची जोखीम उचलणार नाही. राजीव गांधी यांनाच पंतप्रधानपदी बसवण्यात येईल.” १९८४ मध्ये पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींची हत्या झाली. तो दिवस राजीव गांधींच्या जीवनात “टर्निंग पॉइंट” ठरला
१९८४ मध्ये इंदिरा हत्येनंतर राजीव यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. आईच्या मृत्यूनंतर राजीव गांधी यांनी कॉंग्रेसला सर्वात मोठा विजय मिळवून दिला. ५४२ पैकी ४११ जागेवर कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले. निवडणूक प्रचारात त्यांनी २५० सभा घेतल्या व त्याचे अंतर पृथ्वीच्या अर्धी परिक्रमा होईल एवढे होते. १९८४ मध्ये राजीव यांच्या नेतृत्वखाली झालेल्या निवडणुकीत कॅाग्रेसने बहुमताने विजय मिळवला.
राजीव गांधींनी बलशाली आणि स्वयंपूर्ण देशाचे स्वप्न बघितले. कोट्यवधी गरिबांच्या जीवनात नवचैतन्य आणण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि रोजगार याला त्यांनी प्राधान्य दिले. कृषिप्रधान देश हा औद्योगिक देश म्हणून ओळखला जावा यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड प्रत्येक निर्णयाला त्यांनी दिली. टेलिकॉम क्षेत्रातील ख्यातनाम सॅम पित्रोदा यांना त्यांनी आवर्जुन अमेरिकेहून बोलाविले आणि त्यांच्या मदतीने दूरसंचार क्षेत्रात भारताचा पाया त्यांनी पक्का रोवला. देशातील हजारो शहरे, गावे, अगदी खेडीदेखील दूरसंचार साखळीत गुंफली गेली आणि देशात लाखो तरुणांना “एसटीडी’ व “आयएसडी’ बूथद्वारे रोजगार मिळाला.
इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या धक्क्यातून सावरत कॉंग्रेस पक्षाने राजीव गांधींना देशाचे ६ वे पंतप्रधान बनविले, तो दिवस होता ३१ ऑक्टोबर १९८४. त्यानंतर खऱ्या अर्थाने ‘राजीव युग’ सुरू झाले. दुर्दैवाने ते फार वर्षे टिकले नाही. ते या देशाचे दुर्दैवच मानावे लागेल. मात्र स्वतंत्र्यानंतर फार कमी काळात राजीव गांधींनी भारताला नवसंजिवनी मिळवून दिली हे कुणीही अमान्य करु शकणार नाही.
शब्दांकन – शामल भंडारे.