Home » राजस्थान मधील ‘या’ गावात ७०० वर्षांपासून उभारलेच नाही दुमजली घर, नक्की काय आहे कारण?

राजस्थान मधील ‘या’ गावात ७०० वर्षांपासून उभारलेच नाही दुमजली घर, नक्की काय आहे कारण?

by Team Gajawaja
0 comment
Rajasthan Village Secret
Share

भारतात विविध जाती-धर्माची लोक रहतात आणि प्रत्येक समाजाच्या आपल्या आपल्या रुढी-परंपरा आहेत. त्यानुसार लोक त्याचे पालन करतात.अशातच राजस्थान मधील असे एक गाव आहे जेथे आजवर एक ही घर हे दुमजली नाही. येथे राहणाऱ्या लोकांना दुमजली घर बांधण्यास भीती वाटते. मात्र नक्की असे कोणते कारण आहे की, लोक ऐवढी घर बांधण्यासंदर्भात घाबरली आहेत ते पण गेल्या ७०० वर्षांपासून? जाणून घेऊयात याच बद्दल अधिक.(Rajasthan Village Secret)

राजस्थान मधील चुरु मध्ये सरदारशहर विधानसभेच्या उडसर गावात गेल्या ७०० वर्षांपासून ते आजवर एक ही दुमजली घर बांधण्यात आलेले नाही. येथील लोकांचे असे मानणे आहे की, गावाला श्राप दिला गेला आहे. ज्यामुळे ते लोक घाबरतात आणि जरी दुमजली घर बांधल्यास त्यांच्या परिवारावर संकट येईल असे त्यांना वाटते. गावातील लोकांचे असे म्हणणे आहे की, या गावाला श्राप देऊन ७०० वर्ष झाली आहेत. त्यामुळेच आम्ही कोणीही दुमजली घर बांधलेले नाही.

Rajasthan Village Secret
Rajasthan Village Secret

या व्यतिरिक्त लोकांचे असे ही म्हणणे आहे की, ७०० वर्षांपूर्वी या गावात भोमिया नावाचा एक व्यक्ती राहत होता. त्याच दरम्यान एकदा गावात चोर आले आणि ते गुरु चोरु लागले. तेव्हा भोमिया गुरांचा बचाव करण्यासाठी चोरांशी एकटा लढला. याच कारणामुळे चोरट्यांनी त्याला खुप मारहाण केली आणि तो त्यामध्ये गंभीर जखमी झाला. त्यानंतर भोमिया आपल्या सासरी गेला आणि घराच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन लपला. तेथे त्याचा पाठलाग करत चोर आले आणि त्याच्या सासरच्या मंडळींना मारहाण करु लागले.

हे पाहून भोमिया पुन्हा त्यांच्याशी लढू लागला आणि चोरांनी त्याचवेळी त्याचा गळा कापला. असे करुन सुद्धा भोमिया लढत होता. आपल्या गावाच्या सीमेजवळ गेला आणि त्याचे धड त्या ठिकाणी जाऊन पडले जेथे त्याचे मंदिर लोकांनी उभारले आहे. (Rajasthan Village Secret)

हे देखील वाचा- १३०० वर्षांपूर्वी समुद्रात बुडाले होते जहाज, आता मौल्यवान सामान आले पाण्याबाहेर

यामुळे भोमियाच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीने गावकऱ्यांना श्राप दिला की, जर गावात एखाद्याने गावात दुमजली घर बांधले तर त्याच्यावर संकट येईल. माहितीनुसार, त्या दिवसानंतर उडसर गावात कोणीही दुमजली घर बांधलेले नाही. दरम्यान, या घटनेसंदर्भात आणि मान्यतेबद्दल कोणतेही पुरावे नाहीत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.