साल १९७३ राजस्थान, पंजाब आणि हरियाणा या राज्यांच्या काही भागांमध्ये एका अनोळखी माणसाची दहशत पसरली होती. चड्डी बन्यांंन गॅंग, मंकीमॅन सारखंच लोकांनी तेव्हा त्याला नाव दिलं कनपटीमार. कारण तो माणसांच्या कानाखाली हातोड्याने वार करून मारायचा. कनपटीमार हा रात्रीचाच हत्या करायचा. या हत्या तो लोकांच्या डोळ्यात मृत्यूची भीती बघण्यासाठी, त्यांच्या किंचाळया ऐकण्यासाठी तो या हत्या करायचा. त्याला लोकांना मारताना मज्जा यायची. हा सीरियल किलर रात्री रस्त्यावर चादर गुंडाळून बसायचा जेणे करून लोकं त्याला ओळखणार नाहीत. त्याने आतापर्यंत ७० जणांची हत्या केली होती. त्या काळात भयंकर किलरची एवढी भीती होती की, जर कुणी चादर पांघरून रस्त्यावर झोपलं असेल तर लोकं स्वत:चा रस्ता बदलत होती. कोण होता हा सीरियल किलर त्याला पोलिसांनी कसं पकडलं जाणून घेऊया. (Rajasthan)
सत्तरच्या दशकात राजस्थानमध्ये एकामागोमाग हत्यांच्या घटना समोर येऊ लागल्या. कधी एका जिल्ह्यात तर कधी दुसऱ्या जिल्ह्यात लोकांची हत्या होतं होती. सुरुवातीला पोलिसांना या हत्यांच काही Connection आहे असं वाटतं नव्हतं. पण हत्यांची संख्या वाढू लागली, तेव्हा हे लक्षात आलं की जितक्या हत्यां झाल्या त्या सर्व एकाच प्रकारे केल्या जात होत्या. ज्यांच्या हत्या झाल्या त्यांचे कानाच्या खाली गंभीर जखमा असायच्या. या घटना त्या काळातल्या आहेत जेव्हा फॉरेन्सिक सायन्ससारख्या गोष्टी दुर्मिळ होत्या. या हत्या कोणी केल्या आहेत. या बद्दल पोलिसांकडे कोणतीच माहिती सुद्धा नव्हती. फक्त एवढं माहिती होतं की, तो कनपटीमार सीरियल किलर रात्रीचा अंगाभोवती चादर गुंडाळून फिरायचा. बाकी कोणतीच माहिती त्या सीरियल किलर बद्दल पोलिसांना नव्हती. अशातच १९७३ मध्ये राजस्थानच्या श्रीगंगानगर भागातून सादुलशहर पोलिसांना सकाळी पाच साडे पाच वाजता एक फोन आला. शहरातल्या गुरुद्वाऱ्यात तीन जणांची हत्या झाली होती. गुरुदवाऱ्याचे सेवक आणि त्यांच्या दोन मुलांची हत्या झाली होती. पोलिसांनी जेव्हा त्यांचे मृतदेहाची तपासणी केली तेव्हा त्यांना दिसलं की, त्यांच्या कानाच्या खालच्या बाजूला एका जड वस्तूने वार केले होते. पोलिसांना काळालं की या हत्या त्याच कनपटीमाराने केल्या आहेत. (Crime Story)
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. खूप चौकशी केल्यानंतर पोलिसांना एक पुरावा मिळाला, हत्येच्या दिवशी एक चादर गुंडाळलेला व्यक्ती सादुलशहर रेल्वे स्टेशनकडे जाताना रेल्वे ट्रॅकवर चालताना दिसला होता. पोलिसांनी सादुलशहर रेल्वे स्टेशनवर विचारपुस केली. इथे असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, तडके सादुलशहरहून बठिंडासाठी एका व्यक्तीने तिकीट काढल होतं. पोलिस बठिंडाला पोहोचल्यावर कळालं की, तिथूनही तशाच व्यक्तीने सादुलशहराच एक तिकीट काढलं होतं. पोलिसांना संशय होता की हा जो माणूस होता तो तोच कनपटीमारा खुनी होता. पण तो दिसतो कसा हे कोणालाच माहीत नव्हतं. मग पोलिसांनी तिच जुनी पध्दत वापरली. कनपटीमाराच्या हल्ल्या पासून बाचावलेल्या लोकांना पोलिसांनी बोलावलं. त्यातल्या एकाने कनपटीमाराचा चेहरा पहिला होता. जेव्हा त्याने त्या माणसावर हल्ला केला तेव्हा त्याची चादर खाली पडली होती. पोलिसांनी या माणसाच्या मदतीने कनपटीमाराचं एक चित्र काढून घेतलं. (Rajasthan)
पंजाबपासून राजस्थानपर्यंत या कनपटीमाराचीच चर्चा होती. त्याने फक्त एका राज्यात नाही तर तीन तीन राज्यांमध्ये हत्या केल्या होत्या. म्हणून त्याला पकडण अवघड जातं होतं. पोलीस आता सुमसान रस्त्यांवर पहारा द्यायला सुरुवात केली होती. अनेक रात्री वर्ष उलटून गेले पण त्या कनपटीमाराचा पत्ता लागला नाही. मग १९७९ मध्ये एका रात्री जयपूरच्या सुमसान भागात पोलिस गस्तीवर असताना. त्यांना एक माणूस झाडामागे लपलेला दिसला. ज्याने चादर पांघरली होती. पोलिसांना सुरुवातीला वाटलं त्यांचाच कोणीतरी सहकारी आहे. पोलिसांनी काही वेळ वाट पाहिली. झाडामागे लपलेली व्यक्ती जेव्हा बाहेर आली, तेव्हा पोलिसांनी लगेच त्याला पकडलं. मात्र, हा कनपटीमार किलर असेल असं वाटत नव्हतं कारण तो २५ वर्षांचा एक तरुण होता. त्याला चौकशीसाठी पोलिस स्टेशनला नेण्यात आलं. त्या तरुणाचं नाव शंकरिया होतं. (Crime Story)
========
हे देखील वाचा : पक्ष्यांची विष्ठा विकून हा देश बनला सर्वात श्रीमंत देश !
========
पोलिसांनी त्याला विचारलं की सगळीकडे कनपटीमाराची भीती पसरली आहे. ५० पेक्षा जास्त हत्या झाल्या आहेत. अशात तू एवढ्या रात्री कुठे फिरत होता? पोलिसांना त्याच्यावर संशय आला होता. मात्र त्याच्याजवळ कोणतंही हत्यार सापडले नाही. शंकरियाकडून पोलिसांना असा कोणताही हातोडा सापडला नाही. बरेच दिवस पोलिस शंकरियाची चौकशी करत राहिले? पण तो अस्पष्ट उत्तरं देतं होता. या चौकशीमुळे शंकरिया अस्वस्थ झाला. पोलिसांनी त्याला पुन्हा विचारलं त्या ५० पेक्षा जास्त हत्या तू केल्या आहेत का?. त्यावर शंकरियाने उत्तर दिलं. ५० नाही ७० जणांना मारलं आहे. मीच आहे तो कनपटीमार. 25 वर्षांचा सडपातळ, देखणा मुलगा हे करू शकतो याची पोलिसांना अजूनही खात्री नव्हती. पोलिसांनी त्याला हातोड्याबाबत विचारणा केली. शंकरिया पोलिसांना त्या ठिकाणी घेऊन गेला जिथे त्याने हातोडा लपवला होता. पोलिसांनी त्याच्या आई-वडिलांना त्याच्या रुटीनबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तो दिवसभर घरीच असायचा. पण कधी कधी तो मित्रांना भेटायला रात्री उशिरा बाहेर जायचा. शंकरियाला ७० पैकी ५० हत्यांची तारीख सुद्धा लक्षात होती. शंकरिया ने केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याला फाशीची शिक्षा झाली. जेव्हा त्याला फाशी देण्यात आली तेव्हा तो केवळ २७ वर्षांचा होता. फाशी देण्याच्या काही दिवसांपूर्वी शंकरिया म्हणाला होता. ‘मी विनाकारण खून केले. कोणीही माझ्यासारखं व्हावं अशी माझी इच्छा नाही.”नंतर बरीच वर्ष कनपटीमारची भीती लोकांमध्ये बरीच वर्ष राहिली. (Crime Story)