Home » Thackeray : ठाकरे बंधूंच्या भव्य मेळाव्याला मराठी कलाकारांची हजेरी

Thackeray : ठाकरे बंधूंच्या भव्य मेळाव्याला मराठी कलाकारांची हजेरी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Thackeray
Share

आज मुंबईमधील वरळी येथील एनएससीआय डोममध्ये ठाकरे बंधूंचा भव्य विजयी मेळावा संपन्न झाला. राज्यातील महायुती सरकारने पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी ही तिसरी भाषा सक्तीची करण्याचा सरकारी आदेश जारी केला होता. विरोधी पक्ष आणि मराठी संघटनांनी हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत या आदेशाचा तीव्र निषेध नोंदवला. या दबावानंतर सरकारने देखील हा आदेश मागे घेतला. हा आदेश मागे घेतल्यानंतर याचा विजय साजरा करण्यासाठी आज ठाकरे बंधूनी भव्य विजयी मेळावा घेतला. या मेळाव्याला शिवसेना (उबाठा गट) आणि मनसेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य माणूस हजर होते. मात्र यासोबतच या मेळाव्याला काही मराठी कलाकार देखील उपस्थित होते. (Thackeray)

या विजयी मेळाव्यासाठी अभिनेता भरत जाधव, मराठीसोबतच हिंदीमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारा सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री तेजस्विनी पंडीत, चिन्मयी सुमित या कलाकारांनी हजेरी लावली आहे. सर्व महाराष्ट्रासोबतच कलाकरांना देखील बऱ्याच वर्षांनी ठाकरे बंधूंना एकत्र पाहण्याची संधी चुकवायची नसल्याने त्यांनी देखील या मेळाव्याला उपस्थिती लावली होती. या कलाकारांनी उपस्थिती लावली आणि कलाकारांनी माध्यमांसोबत संवाद देखील साधला. (Todays Marathi Headline)

या मेळाव्याबाबत अभिनेता भरत जाधवने सांगितलं की, “आपल्याच राज्यात राहून आपण अपमानित होतो, ही चुकीची गोष्ट आहे. प्रत्येकजण स्वत:चे मत व्यक्त करतो. मराठी माणसाने जगायला हवे. मराठीपणा जपायला हवा. असं नाही की मी हिंदीच्या विरोधात आहे. पण हिंदी सक्तीची नसावी याचा मी विरोध करतो.” (Top Marathi Headline)

अभिनेता सिद्धार्थ जाधव म्हणाला, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्हीही नेत्यांना एकत्र पाहणं ही गोष्ट उत्सुक करणारी आहे. हा अनुभव आणि ही एनर्जी छान आहे आणि तिच अनुभवण्यासाठी मी इथे आलोय. याच गोष्टीची मराठी माणूस वाट बघतोय. आज फक्त ऐकायचंय साहेबांना!” (Marathi Trending News)

तर तेजस्विनी पंडितने सांगितले की, “मराठी भाषेसाठीच आज आपण एकत्र आलेलो आहोत. मराठी भाषेचा जो विजय झालाय जी वज्रमूठ मराठी माणसाने दाखवली त्यासाठीच आपण एकत्र आलो आहोत. जी संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे त्यासाठीच आलेलो आहोत. अजून खूप मराठी माणसांनी जोडले गेले पाहिजे.” (Marathi News)

अभिनेत्री चिन्मयी सुमीत म्हणाली की, “राज ठाकरे- उद्धव ठाकरे हे दोन महत्वाचे नेते त्यासाठी काही करु इच्छितात ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. त्यांनी जे जाहीर आवाहन केले आहे, त्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आम्हाला निमंत्रित केले गेले नाही. यानिमित्ताने मराठी लोक एकत्र आलेले आहेत, हा सहभाग खूप महत्वाचा आहे.” (Marathi Latest News)

==========

हे देखील वाचा : Raj and Uddhav Thackeray : राज आणि उद्धव ठाकरे यांचा ‘विजयी मेळावा’

Thackeray Melava : विजयी मेळाव्याच्या निमित्ताने राज आणि उद्धव ठाकरे १९ वर्षांनी एकत्र

==========

मात्र या मेळाव्याला मोजकेच कलाकार उपस्थित होते. यावर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने संताप व्यक्त केला. यावर तिने सांगिले की, “इतरवेळी जेव्हा मदत लागते तेव्हा शिवतीर्थाचा दरवाजा ठोठावला जातो. पण जेव्हा मराठीच्या प्रश्नासाठी एकत्र येण्याची वेळ येते, तेव्हा काही कलाकार समोर का येत नाहीत? एक कलावंत म्हणून मलाही हा प्रश्न पडतो.” दरम्यान या मेळाव्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी भविष्यात त्यांच्या युतीचे देखील संकेत दिले आहे. (Social Updates)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.