कथिक पॉर्न रॅकेट प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राविरुद्ध (Raj Kundra) गुन्हा दाखल केला आहे. कुंद्रा यांच्याविरुद्ध फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (फेमा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गेल्या वर्षी 20 जुलै रोजी या प्रकरणी राज कुंद्राला अटक केली होती. त्याच्यावर एका अॅपद्वारे अश्लील चित्रपट शेअर केल्याचा आरोप होता. कुंद्राला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जामीन मंजूर झाला होता.
ईडीच्या तपासानुसार, फेब्रुवारी 2019 मध्ये राज कुंद्राने आर्म्स प्राइम मीडिया लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली होती आणि हॉटशॉट्स नावाचे अॅप विकसित केले होते. हे Hotshots अॅप राज कुंद्राने केनरिन नावाच्या ब्रिटीश कंपनीला 25 हजार डॉलरमध्ये विकले होते.
या कंपनीचे सीईओ प्रदीप बक्षी हे खरे तर राज कुंद्राचे मेहुणे आहेत. मात्र या हॉटशॉट्स अॅपच्या देखभालीसाठी राज कुंद्राच्या कंपनी विहानने केनरिन कंपनीशी करार केला होता. त्यामुळे या देखभालीसाठी विहान कंपनीच्या 13 बँक खात्यांमध्ये लाखो रुपयांचे व्यवहार झाले.
====
हे देखील वाचा: ‘रानबाजार’ वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित
====
कसे होते उत्पन्न?
हॉटशॉट्स अॅप खरे तर पॉर्न चित्रपटांसाठी एक व्यासपीठ होते. याद्वारे भारतात पॉर्न चित्रपट बनवून हॉटशॉट्स अॅपवर अपलोड केले जात होते. यानंतर ते पाहण्यासाठी सदस्यता विकल्या गेल्या. राज कुंद्राच्या विहान या कंपनीत ग्राहकांच्या माध्यमातून मिळणाऱ्या मोठ्या रकमेचे देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली व्यवहार केले जात होते. अशाप्रकारे पॉर्न फिल्म्समधून मिळणारे पैसे मेंटेनन्सच्या नावावर राज कुंद्राच्या कंपनीच्या खात्यात यूकेमध्ये फिरत असत.
वैयक्तिक बँक खात्यात असे होते पैसे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा आणि त्याची कंपनी विआन यांच्याशी संबंधित सर्व बॅक खात्यांमध्ये पॉर्न चित्रपटांमधून कमाईचे उच्च खंडाचे व्यवहार मिळाले आहेत.
====
हे देखील वाचा: Viral Video: आराध्याला कॅमेरासमोर भरभरून पोझ देताना पाहून ऐश्वर्या भारावली
====
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मेंटेनन्सच्या नावाखाली ब्रिटनमधील कॅनरीन कंपनीकडून राज कुंद्राच्या वियान कंपनीला करोडोंचे व्यवहार झाले आहेत. हे पैसे 13 बँक खात्यांद्वारे ट्रान्सफर करण्यात आले. यानंतर हे पैसे काही सेल कंपन्यांमध्ये वळवले जायचे आणि शेवटी हे पैसे राज कुंद्राच्या वैयक्तिक बँक खात्यात यायचे.