Home » ‘या’ सुक्या मेव्यात असतात अनेक पोषक तत्वे, अशा प्रकारे सेवन करून मिळवू शकता आरोग्यदायी फायदे

‘या’ सुक्या मेव्यात असतात अनेक पोषक तत्वे, अशा प्रकारे सेवन करून मिळवू शकता आरोग्यदायी फायदे

by Team Gajawaja
0 comment
Raisins benefits सुक्या मेव्याचे फायदे
Share

सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. ते नैसर्गिकरित्या चवीला स्वादिष्ट असतात आणि शरीराला दररोज आवश्यक असणारे विविध पोषक घटक पुरवतात. काही संशोधनांमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, सुका मेवा नियमितपणे खाण्याची सवय अनेक प्रकारच्या गंभीर आरोग्य समस्यांपासून मुक्त होण्यासाठी प्रभावी ठरू शकते. अक्रोड आणि बदाम हे मेंदूसाठी खूप फायदेशीर मानले जातात. तर काजू, पिस्ता इत्यादींमध्ये अशी अनेक जीवनसत्त्वे आढळतात, ज्यामुळे शरीराला चांगले आरोग्य मिळू शकते.

त्याचप्रमाणे मनुके खाणे देखील संशोधनात खूप फायदेशीर असल्याचे म्हटले आहे. विशेषतः जर ते रात्री भिजवून सकाळी खाल्ले, तर त्यापासून जास्तीत जास्त फायदे मिळू शकतात. मनुके हे आवश्यक पोषक, खनिजे आणि उर्जेचा चांगला स्रोत आहे. यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि लोह मुबलक प्रमाणात असते. पचनक्रिया बरोबर ठेवण्यासाठी रोज मनुके खाण्याचे फायदेही सांगण्यात आले आहेत. रोज भिजवलेले मनुके खाण्याची सवय तुमच्या आरोग्यासाठी कशी फायदेशीर ठरू शकते, ते जाणून घेऊया.

वजन नियंत्रणात ठेवण्यात करते मदत

दररोज मनुके खाणे वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी फायदेशीर मानले जाते. शरीरातील उष्मांकांचे प्रमाण राखून तृप्ति वाढवण्यास मदत होते, त्यामुळे जास्त खाण्याची इच्छा होत नाही आणि वजन सहज नियंत्रित करता येते. मनुक्यांमध्ये असणारे फायबरचे प्रमाण यासाठी विशेष फायदेशीर मानले जाते. मनुके खाणे आरोग्यासाठी इतर अनेक प्रकारे देखील फायदेशीर ठरू शकते.

डोळे आणि यकृतासाठी फायदेशीर

भिजवलेले मनुके आणि ते ज्या पाण्यात भिजवलेले असते ते पाणी, दोन्ही यकृतासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यात बायोफ्लाव्होनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात, जे यकृत निरोगी राखण्यासाठी खूप उपयुक्त असतात. रक्त शुद्ध करण्यासाठी आणि यकृत डिटॉक्स करण्यासाठी देखील हे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. भिजवलेले मनुके खाणे यकृताच्या तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी विशेष फायदेशीर मानले जाते. भिजवलेल्या मनुक्यांमध्ये पॉलीफेनोलिक फायटोन्यूट्रिएंट्स असतात, जे डोळ्यांच्या स्नायूंना झीज होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करतात.

=================

हे देखील वाचा – कशा प्रकारे लावावा परफ्यूम? जेणेकरून उन्हाळ्यातही जास्त काळ दरवळेल सुगंध

=================

हिमोग्लोबिनची कमतरता करते दूर  

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अशक्तपणाची समस्या भारतीय महिलांमध्ये सामान्य आहे. हिमोग्लोबिनमुळे शरीरातील लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढते. भिजवलेल्या मनुक्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि व्हिटॅमिन-बी असते, जे ॲनिमियावर मात करण्यास मदत करते. रोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला चांगली चालना मिळते. याचे दररोज सेवन करा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.