भारताच्या चारही दिशांना रेल्वेनं एकमेकांना जोडलं आहे. भारतीय रेल्वे ही जगातील चौथी सर्वात मोठी रेल्वे सेवा आहे. देशातील सर्व राज्यांना जोडणा-या भारतीय रेल्वेमध्ये दररोज सुमारे 23.1 दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. याशिवाय यातून रोज 3.3 दशलक्ष टन मालाची वाहतूक करण्यात येते. त्यामुळेच भारतात रेल्वे सेवेला देशाची जीवनरेखा म्हणून गौरवले जाते. याच रेल्वेची भारतात किती रल्वे स्थानकं आहेत, हे जाणून घेण्यासारखे आहे. भारतात जवळपास 8800 रेल्वे स्थानकांची नोंद असली तरी यामध्ये दर महिन्याला भर पडत आहे, ही गौरवाची गोष्ट आहे. आज भारतातील खेड्या पाड्यांना जोडणा-या या भारतीय रेल्वेच्या प्रत्येक स्थानकामागे एक कथा आहे. मात्र भारतीय रेल्वेच्या 160 वर्षात असेही एक रेल्वे स्थानक आहे, ज्याचे अद्याप नावच ठेवलेले नाही. या रेल्वे स्थानकात रेल्वे येते आणि जाते. प्रवाशी उतरतात आणि तिथून रेल्वेत चढतातही, मात्र आपण कुठल्या रेल्वे स्थानकात उतरलो आहोत, हे बघण्यासाठी त्यांनी फलकाकडे बघितले तर तिथे पिवळ्या रंगाची कोरी पाटी दिसते. (Raina And Rainagar)
एखादा नवखा प्रवाशी गोंधळतो. अरे…ये स्टेशन का नाम क्या है…असे तो विचारतो. मग तेथील जुने जाणते प्रवासी त्याची अडचण समजून घेतात, आणि त्याला या रेल्वे स्थानकाची जनमानसात प्रचलित असणारी दोन नावं सांगतात, रैना आणि रायनगर ! यातील त्याला हवं ते नाव तो प्रवासी घेतो आणि पुढे चालू लागतो. अर्थातच या रेल्वे स्थानकाला दोन नावं आहेत, आणि त्यातील कुठले बरोबर आहे, हा वाद एवढा वाढला की रेल्वे प्रशासनानं त्यापुढे हात जोडले आणि रेल्वे स्थानकात नाव लिहिल्या जाणा-या फलकावर फक्त पिवळा रंग मारुन ठेवला आहे. ही गोष्ट आहे, पश्चिम बंगालमधील बर्धमान जिल्ह्यात असलेल्या एका रेल्वे स्थानकाची. या रेल्वे स्थानकाला रैना-रायनगर असे नाव आहे. मात्र त्यापैकी नेमकं कुठलं नाव करायचं हा वाद एवढा विकोपाला गेला आहे, की 2008 पासून हे रेल्वेस्थानक बिनानावाचं रेल्वे स्थानक झालं आहे. आता त्याची तशीच ओळख झाली आहे. (Social News)
या रेल्वे स्थानकाला नाव नसलं तरी या स्थानकावर रोज गाड्या थांबतात आणि हजारो प्रवाशाची येथून ने-आण होत आहे. हे स्टेशन बर्दवान शहरापासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे येथे प्रवाशांची संख्याही मोठी असते. या नावाच्या वादाचं कारण येथील गावांमध्ये आहे. रैना आणि रायनगर या गावामधील वादाचा परिणाम थेट रेल्वे स्थानकावर झाला आहे. रैना गावातील लोकांनी त्यांच्या जमिनीवर या स्टेशनच्या बांधकामाला विरोध केला होता. मात्र रेल्वेस्थानक बांधल्यावर या स्थानकाला रेल्वे प्रशासनानं रायनगर असे त्याचे नाव ठेवले. परंतु स्थानिक नागरिकांना या नावालाही आक्षेप घेतला आणि नाव बदलण्याची विनंती रेल्वेला केली. रैना गावातील लोकांनी स्टेशनचे नाव रायनगर न ठेवता रैना ठेवण्याची मागणी केली आहे. हे स्टेशन रैना गावात असल्याने त्याचे नावही रैना स्टेशन असावे. अशी तेथील स्थानिकांची भूमिका आहे. या वादामुळे स्टेशनचे नावही ठेवण्यात आले नाही. तेव्हापासूनच हे सर्व प्रकरण न्यायालयात गेले. 2008 पासून या वादावर कोणताही तोडगा काढलेला नाही. आता 17 वर्ष झाली तरी या रेल्वे स्थानकाची नावाची पाटी कोरीच आहे. (Raina And Rainagar)
==============
हे देखील वाचा : Donald Trump : ऑर्डर टू डिपोर्ट
Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !
===============
या रेल्वे स्थानकावर बांकुरा-मसाग्राम पॅसेंजर ट्रेन दिवसातून सहा वेळा थांबते. त्यातील नवख्या प्रवाशांना प्रथम रेल्वे स्थानक कुठले आहे, हे समजत नाही. त्यांचा गोंधळ उडतो. स्थानिक प्रवाशी मग त्यांच्या सोयीचे नाव या प्रवाशांना सांगतात. या नाव नसलेल्या रेल्वे स्थानकाबद्दल अनेक गंमतीशीर गोष्टीही आहेत. येथे रविवारी सुट्टी असते. कारण या रेल्वे स्थानकावर रविवारी कुठलीही ट्रेन येत नाही. तेव्हा या स्टेशनचे मास्तर तिकिटे खरेदी करण्यासाठी बर्दवान शहरात जातात. या तिकिटांवर रेल्वे प्रशासनानं 2008 मध्ये दिलेले जुने नाव रायनगर असेच छापलेले असते. आता या रैना गावातील स्थानिकही या बिन नावाच्या रेल्वे स्थानकामुळे हैराण झाले आहेत. त्यांनी यासंदर्भात अनेक अर्ज जिल्हा न्यायालयात केले आहेत. मात्र न्यायालयानं त्यांचे अर्ज फेटाळून लावल्याची माहिती आहे. (Social News)
सई बने