Home » रेल्वेचे तिकिट असे करा दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर

रेल्वेचे तिकिट असे करा दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर

भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना अशी सुविधा देतात त्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असते. अशातच एक नियम म्हणजे तिकिट ट्रांसफर करण्यासंदर्भातील.

by Team Gajawaja
0 comment
Railway ticket transfer
Share

भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना अशी सुविधा देतात त्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असते. अशातच एक नियम म्हणजे तिकिट ट्रांसफर करण्यासंदर्भातील. तुम्ही तुमचे कंफर्म तिकिट एखाद्या नावे सुद्धा ट्रांसफर करु शकता. रेल्वे तुम्हाला तिकिट ट्रांसफर करण्याची सुविधा देते. म्हणजेच तुमच्या कंम्फर्म तिकिटावर दुसऱ्यांना प्रवास करता येईल. या बद्दल रेल्वेने ट्विट करत माहिती सुद्धा दिली आहे.(Railway ticket transfer )

रेल्वे तिकिट कसे ट्रांन्सफर करण्याबद्दल त्यांनी असे म्हटले की, लोक आपल्या घरातील मंडळींच्या नावे तिकिट ट्रांसफर करु शकतात. जर तुमच्याकडे कंन्फर्म तिकिट आहे आणि तुम्ही प्रवास करु शकत नसाल तर तुम्ही ते तिकिट परिवारातील एखाद्या सदस्याच्या नावावर ट्रांसफर करु शकता.

कसे बदलाल तिकिट पॅसेंजरचे नाव
तुम्ही तिकिट काउंटर अथवा ऑनलाईन बुकिंग केले असेल. अशातच जेव्हा नाव बदलायचे असेल तेव्हा तुम्हाला रेल्वे तिकिट काउंटरवर जावे लागणार आहे. यासाठी तिकिटाचे प्रिंट आउट आणि ज्याच्या नावे तिकिट जारी करायची आहे त्याचा मूळ आयडी एका फोटो कॉपीसह काउंटवर घेऊन जावे लागणार आहे. त्यानंतर ऑनलाइन किंवा काउंटरवरुन तिकिटाचे नाव बदलले जाईल.

वेटिंग किंवा RAC वर मिळणार नाही सुविधा
यासाठी तुम्हाला पॅसेंजरच्या नावात बदल करावा लागे. आयआरसीटीसी प्रवाशांना ही सुविधा देते की, ते आपल्या तिकिटांवरील पॅसेंजरचे नाव बदलू शकतात. मात्र हा बदल केवळ तिकिटावर एकदाच केला जाऊ शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की, तुमची तिकिट कंम्फर्म असावी. वेटिंग किंवा आरएसी तिकिट तुम्ही ट्रांसफर करु शकत नाहीत.

प्रवासाच्या २४ तासांआधी बदलता येईल नाव
तिकिटावरील प्रवासाचे नाव बदलायचे असेल तर तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागेल. लक्षात ठेवा की, ट्रेनच्या डिपार्चरपूर्वी २४ तास आधी रिजर्वेशन काउंटवर प्रवाशाचे नाव बदलता येईल.त्यानंतर ही सुविधा बंद केली जाते. तुम्ही कंम्फर्म तिकिटावर आपली आई, वडिल, बहिण किंवा पत्नीचे नाव देऊ शकता. (Railway ticket transfer)

हेही वाचा- व्हिजाशिवाय भारतीयांना करता येणार 75 देशांचा प्रवास

बोर्डिंग स्थानकात ही बदल करु शकता
या व्यतिरिक्त तुम्ही आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरुन बोर्डिंग स्थानकात बदल करु शकता. यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर जाऊन आपले अकाउंट लॉग इन करावे लागेल. त्यानंतर तुम्ही आपल्या बोर्डिंग स्थानकाचे नाव बदलू शकता. भारतीय रेल्वेचे तिकिट जर तुम्ही ऑफलाईन बुक केले असेल तर तुम्हाला तसे करता येत नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.