रेल्वेची तिकिट रद्द केल्यानंतर जीएसटी लागणार काही नाही यावर सध्या चर्चा सुरु आहे. अशातच यावर रेल्वे मंत्रालयाकडून एक स्पष्टीकरण जाहीर करण्यात आले आहे. मंत्रालयाने स्पष्टीकरणात असे म्हटले की, ट्रेनची तिकिट रद्द करण्यासंदर्भातील नियम आणि प्रस्तावात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मंत्रालयाने असे म्हटले की, २३ सप्टेंबर २०१७ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या विधानानुसार, ट्रेनची तिकिट बुकिंग करतेवेळी जो जीएसटी लागू केला जाते तो ट्रेनची तिकिट रद्द करतेवेळी प्रवाशाला रिफंड म्हणून दिला जातो. मंत्रालयाने असे सुद्धा म्हटले, बुकिंग करतेवेळी घेतला जाणारा जीएसटी सुद्धा तिकिटाच्या मुल्यासह परत केला जातो.(Railway ticket cancellation)
रेल्वे मंत्रालयाने का जाहीर केले स्पष्टीकरण
नुकतेच काही रिपोर्ट्स आले होते, त्यात असे सांगण्यात आले होते की, एसी क्लास ट्रेनचे तिकिट रद्द केल्यानंतर ५ टक्के जीएसटी चार्ज वसूल केला जाईल. अशातच एनआयने रेल्वे मंत्रालयाच्या ट्विट वर एक ट्विट करत असे म्हटले की, रेल्वे मंत्रालयाने या जीएसटी शुक्लासंदर्भात स्पष्टीकरण जारी केले आहे.
दरम्यान, प्रत्येक तिकिट रद्द केल्यानंतर रेल्वे विभागाकडून काही कॅसिलेशन चार्ज वसूल केला जातो जो त्याला रिफंड नियमाअंतर्गत लागू असतो. या कॅसिलेशन चार्जवर आता रेल्वे सुद्धा जीएसटी लागू करणार आहे. रेल्वे विभागाच्या मते, हा जीएसटी आर्थिक मंत्रालयाच्या निर्देशनानुसार घेतला जातो. दरम्यान, हा जीएसटी चार्ज फक्त एसी आणि फर्स्ट क्लास तिकिटावरच लागू असतो.
हे देखील वाचा- महामार्गांवरील लाल, हिरवे किंवा पिवळ्या रंगांच्या दगडांचा अर्थ काय? जाणून घ्या अधिक
कोणत्या तिकिटावर किती कॅसिंलेशन चार्ज घेतला जातो?
रेल्वेच्या कॅसिंलेशन नियमाअंतर्गत कंन्फर्म तिकिट ट्रेन सुटल्यानंतर ४८ तासाच्या आतमध्ये रद्द केली जाऊ शकते. एसी फर्स्ट क्लासवर २४० रुपये, एसी टीयर २ वर २०० रुपये, एसी टीयर ३ वर आणि चेयर कारवर १८० रुपये. तर स्लीपर क्लासवर १२० रुपये आणि सेकेंड क्लासच्या तिकिटावर ६० रुपये कॅसिलेशन चार्ज वसूल केला जातो.(Railway ticket cancellation)
तसेच ट्रेन सुटल्याच्या १२ तासाआधी तिकिट रद्द केल्यास तुम्हाला तिकिटीच्या शुल्कामधून २५ टक्के शुल्क वसूल केला जातो. तर ट्रेन सुटल्याच्या ४ तासानंतर जर तिकिट रद्द केल्यास तर ५० टक्के कॅसिलेशन चार्ज वसूल केला जातो.