भारतीय रेल्वेला लाइफलाइन असे म्हटले जाते.इंडियन रेल्वे एशियातील सर्वाधिक दुसरे मोठे रेल्वे नेटवर्क आहे.देशात जवळजवळ २१६७ पॅसेंजर ट्रेन चालवल्या जातात. याच्या माध्यमातून दररोज २३ लाख लोक प्रवास करतात. भारतीय रेल्वे संदर्भातील काही माहिती आणि संकेतांचे काही अर्थ असतात. त्याबद्दल बहुतांश लोक गोंधळतात. त्यापैकीच एक म्हणजे एक्स अक्षराचे निशाण. काही रेल्वे प्रवाशांनी पाहिले असेल की, रेल्वेच्या अखेरच्या डब्ब्यामागे X असे लिहिलेले असते. पण वास्तवात त्याचा अर्थ काय होतो? रेल्वे मंत्रालयाने याच बद्दल अधिक माहिती दिली आहे. (Railway Symbol)
रेल्वे मंत्रालयाने अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये पिवळ्या रंगात X चिन्ह दाखवले गेले आहे. त्यानुसार ट्रेन कोणत्याही कोचला मागे ठेवून पुढे जात नाही. चिन्ह असेल तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ही पुष्टी करण्यास मदत होते की, ट्रेन कोणत्याही कोचला मागे ठेवत पुढे जात नाही आहे. म्हणजेच एक्स निशाण म्हणजे संपूर्ण ट्रेन सुरक्षित पद्धतीने पुढे जात आहे.
मंत्रालयाने पोस्टसग कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, तुम्हाला माहिती आहे का की, ट्रेनच्या अखेरच्या डब्ब्यावर एक्स अक्षर काढले असेल तर ट्रेन कोणत्याही कोचला मागे न सोडता पुढे गेली आहे. ही माहिती दिल्यानंतर पोस्ट दोन लाख लोकांनी पाहिली आहे. तसेच एका युजरने कमेंट्स केली की, मला नेहमीच वाटायचे की हेच असंच लिहिले जाते.
एका दुसऱ्या व्यक्तीने म्हटले की, एलवी म्हणजेच लास्ट व्हेकल बोर्ड दिवसाच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी चमकतो. त्याच्या टेल लॅम्पचा अर्थ असा आहे की, ट्रेन पूर्णपणे आलेली आहे. दिवसाच्या वेळी एलवी बोर्ड आणि रात्रीच्या वेळी टेल लॅम्प लावणे गार्डचे कर्तव्य आहे. म्हणजेच प्रवासी घेऊन जाणारी ट्रेन अथवा मालगाडी दोघांसाठी योग्य आहे. तिसऱ्या व्यक्तीने म्हटले, मला असे वाटले की वेक्टर प्रतिनिधित्व आहे. जेव्हा एक वेक्टर आपल्याकडे येतो तेव्हा या डॉट द्वारे दर्शवले जाते. (Railway Symbol)
हे देखील वाचा- स्थानकात पोहचण्यापूर्वी रेल्वे का थांबवली जाते?
या व्यतिरिक्त रेल्वेला विविध बोगी असतात आणि प्रत्येकाची सुविधा ही वेगवेगळी असते. त्यानुसार ही त्याच्या तिकिटाचे दर असतात. सामान्य श्रेणी जेथे तुम्ही अगदी कमी खर्चात प्रवास करु शकता. तर वीआयपी आणि अन्य प्रकारच्या सुविधांसाठी थोडे अधिक शुल्क मोजावे लागतात. जेव्हा आपण रेल्वेची तिकिट काढतो तेव्हा तिकिटावर कोच आणि त्याची श्रेणी लिहिलेली असते.