Home » छापेमारी आणि सर्वे मधील फरक काय?

छापेमारी आणि सर्वे मधील फरक काय?

by Team Gajawaja
0 comment
Raid vs Survey
Share

मुंबई आणि दिल्लीत ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC) च्या कार्यालयांवर आयकर विभागाकडून नुकताच तपास केला गेला. बीबीसीचे असे म्हणणे आहे की, हा एक सर्वे आहे. तर सोशल मीडियात याला आयकर विभागाकडून छापेमारी केली गेल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आयकर विभागाकडून सातत्याने तपास केला जात आहे. बीबीसीच्या कर्मचाऱ्यांना असे सांगितले गेले होते की, पुढील नोटीस पर्यंत वर्क फ्रॉम होम करावे. सुत्रांच्या मते, हा सर्वे ट्रांसफर प्राइसिंगचे आरोप आणि इंटरनॅशनल टॅक्स मध्ये गडबड झाल्या प्रकरणी केला जात आहे. (Raid vs Survey)

यावर विरोधी पक्षाने विरोध केला. काँग्रेसने असे म्हटले की, सर्वात प्रथम मोदी सरकारने बीबीच्या डॉक्युमेंट्रीवर बंदी घातली आणि त्याचाच बदला घेण्यासाठी ही कारवाई केली जात आहे. सुत्रांच्यानुसार, इनकम टॅक्स विभागाने बीबीसीला एक पत्र दिले आहे. त्यामध्ये तीन दिवसांचा सर्वे करण्याची परवानी मिळाली आहे असे म्हटले आहे. अशातच जाणून घेऊयात सर्वे आणि छापेमारी मधील नक्की फरक काय?

IT डिपार्टमेंटचा सर्वे म्हणजे काय?
जेव्हा आयकर विभागाची टीम एखाद्या घरी, कार्यालयात किंवा अन्य ठिकाणी जाऊन तेथे अघोषित उत्पन्न, संपत्ती किंवा मुद्दाम लपवण्यात आलेल्यी संपत्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो त्याला सर्वे असे म्हटले जाते. याचा मुख्य उद्देश माहिती एकत्रित करणे. आयकर विभागाला आयटी अॅक्टच्या कलम १३३ए च्या माध्यमातून सर्वे करण्याचे अधिकार दिले गेले आहेत. त्याचसोबत आयकर विभाग हा सुद्धा तपास करतो की, एखादा व्यक्ती किंवा कंपनी आपल्या बॅलेंन्स शीट ही व्यवस्थित मेनटेन करत आहेत की नाही.

छापेमारी आणि सर्वे मध्ये काय फरक?
नियमांनुसार,आयकर छापेमारी आणि सर्वे यामध्ये फार मोठा फरक आहे. सर्वे म्हणजे केवळ माहिती एकत्रित करणे. तर छापेमारी म्हणजे अघोषित संपत्तीची माहिती एकत्रित करण्यासह त्याचसोबत ट्रांजेक्शन संबंधित पुरावे आणि अघोषित संपत्ती सुद्धा शोधून काढली जाते. यामध्ये फरक असा सुद्धा आहे की, आयकर विभाग जर सर्वे करत असेल तर कामकाजाचे तास म्हणजेच ९ ते ६ किंवा १० ते ७ दरम्यान ही केले जाईल. तर छापेमारी कोणत्याही स्थितीत केली जाऊ शकते. (Raid vs Survey)

हे देखील वाचा- दहशतवादी हल्ल्यानंतर एखादी अतिरेकी संघटना जबाबदारी का घेते? काय होतो फायदा?

छापेमारीत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना रोखल्यास ते दरवाजे खिडक्या तोडून कार्यालय किंवा घरात घुसू शकतात. तर सर्वेमध्ये असे केले जात नाही. सर्वे केवळ व्यावसायिक कार्यालयांसंबंधित केला जातो. छापेमारी ही घर, दुकान, गोदाम किंवा कोणत्याही ठिकाणी केली जाते. यापूर्वी कागदपत्र जप्त करण्याचे अधिकार नव्हते. मात्र आता नव्या नियमांनुसार आयकर विभागाचे अधिकारी असे करु शकतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.