Home » नेहमी ट्रोल होणाऱ्या ‘रागा’चे नेटकऱ्यांनी का केले एवढे कौतुक…?

नेहमी ट्रोल होणाऱ्या ‘रागा’चे नेटकऱ्यांनी का केले एवढे कौतुक…?

by Correspondent
0 comment
Rahul Gandhi | K Facts
Share

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावात राजकारणी काही मागे हटायला तयार नाहीत. प्रचार रॅली, सभा, सभेतील माणसं हे काही थांबायचं नाव घेत नाही. त्यात कोरोनारुग्णांचा वाढता आकडा पाहून सामान्यांच्या आणि गरिबांच्या नाकीनऊ आले आहेत. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राहूल गांधी यांनी ट्विट करून समजदारीची भुमीका घेतली आहे.

देशात करोनामुळे वाढती रुग्णसंख्या पाहता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या सर्व प्रचारसभा रद्द केल्या आहेत. त्यांनी ट्वीट करून याची माहिती दिली. राहुल गांधी यांनी या ट्वीटमधून सर्व राजकीय नेत्यांना सल्ला दिला आहे. करोनाच्या स्थितीत मोठ्या प्रचारसभा घेण्याचा परिणाम काय होईल, याचा विचार नेत्यांनी करावा, असं राहुल गांधी म्हणाले. प्रचारसभा रद्द करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी काही वेळापूर्वीच पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या एका प्रचारसभेला झालेली गर्दी पाहून त्यांनी नेत्यांना इशारा दिला. एवढी गर्दी आपण प्रथमच बघितली, असं राहुल गांधी म्हणाले. करोना रुग्ण आणि त्याने होणारे मृत्युही आज पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने बघितले, असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. सरकार करोनाने निर्माण झालेली स्थिती नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला.

अशातच संमिश्र भावना जनतेमध्ये उमटताना दिसत आहेत. यावर भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणतात “तुम्ही बंगालच्या पिक्चरमध्ये तरी होतात का?” वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना या संकटाची अखेर जाणीव झाली आहे. जनता दलाने (संयुक्त) दिल्ली आणि पाटण्यातील आपली मुख्यालये बंद केली. पश्चिम बंगालमध्ये मतदानाचे तीन टप्पे राहिले असून त्यात भाजपच्या काही राष्ट्रीय नेत्यांच्या होणाऱ्या प्रचारसभा कमी करण्याचा विचार पक्षाचे नेतृत्व करीत आहे. मात्र, अजून निर्णय जाहीर झालेला नाही.

या सगळ्यात राहुल गांधींवर मात्र सामान्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. सोशल मिडीयाच्या आधारे अनेक नेटकरी राहूल गांधीचे विशेष कौतुक करताना आपल्याला पहायला मिळत आहेत. तर काहीजण यामागे राजकीय हेतू असल्याचे सांगत आहेत. असो… पण चांगल्या गोष्टीसाठी पुढाकार घेतला जातोय एवढं नक्की.


शब्दांकन – शामल भंडारे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.