शत्रूंच्या मनात धडकी भरवणारा राफेल विमानांचा ताफा दोन महिन्यांपूर्वी भारताच्या अंबाला एअरबेसवर दाखल झाला. वायू दलात समावेश करण्यापूर्वी राफेल विमानांचे सर्वधर्मीयांकडून पूजन करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत आणि वायुसेनेचे एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांच्या उपस्थितीत राफेल विमाने भारतीय वायू दलात दाखल झाली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांच्या साक्षीने अंबाला एअरबेस येथे राफेल विमानांचा राज्याभिषेक सोहळा झाला. पारंपरिक पद्धतीने ‘सर्वधर्म पूजन’ करण्यात आले. मुस्लीम, शीख आणि ख्रिस्ती धर्मगुरुंनी प्रार्थना केली.
भारतीय वायुदलाला या लढाऊ विमानांमुळे प्रचंड मोठी शक्ती मिळणार आहे. पाच राफेल विमानांनी 27 जुलैला फ्रान्समधून उड्डाण केले होते. फ्रान्स ते भारत या जवळपास 7 हजार किमी प्रवासात त्यांना संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) अल डाफरा एअरबेसवर थांबा देण्यात आला होता. त्यानंतर 29 जुलैला त्यांचे भारताच्या अंबाला एअरबेसवर आगमन झाले.