Home » Donald Trump : ट्रम्पचा धाक !

Donald Trump : ट्रम्पचा धाक !

by Team Gajawaja
0 comment
Donald Trump
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा धाक किती आहे, याची जाणीव दोन घटनांमधून झाली आहे. त्यातील एक म्हणजे तब्बल 40 वर्षापूर्वी अमेरिकन एजंटची क्रूरपणे हत्या करणा-या ड्रग माफियाला मेक्सिकोनं दडवून ठेवलं होतं. मात्र ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर लगेच या माफियाला मेक्सिकोनं अमेरिकेच्या स्वाधिन केले आहे. दुसरी घटना म्हणजे, अफगाणिस्तानमध्ये 13 अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या एका दहशतवाद्याला पाकिस्ताननं अमेरिकेच्या ताब्यात दिले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होतांना ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्ट हे धोरण ठेवले आहे. शिवाय अमेरिकेच्या शत्रूंना माफ करणार नाही, असेही त्यंनी जाहीर केले आहे. ट्रम्प यांच्या या घोषणेचा परिणाम म्हणून मेक्सिको आणि पाकिस्तानं त्यांच्या देशात दडवून ठेवलेल्या दहशतवाद्यांना अमेरिकेकडे सुपूर्द केले आहे. (Donald Trump)

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होताच मेक्सिकोला पहिली धडकी भरली आहे. कारण मेक्सिकोमधून सर्वाधिक निर्वासीत अमेरिकेत येत असल्याची ओरड ट्रम्प यांनी आपल्या प्रचारादरम्यान केली होती. तसेच मेक्सिकोतून अमेरिकेत ड्रगचा सर्वात मोठा पुरवठा होतो आणि अमेरिकेच्या तरुण पिढीवर त्याचा परिणाम होत असल्याचे ट्रम्प यांनी जाहीरपणे सांगितले होते. याच ट्रम्प यांचा धाक मेक्सिकोनं किती घेतला आहे, याचे एक उदाहऱण नुकतेच घडले आहे. अमेरिकेला जवळपास 40 वर्ष गुंगारा देणा-या ड्रग माफियाला मेक्सिकोनं अमेरिकेच्या ताब्यात दिले आहे. (International News)

या ड्रग माफियावर अमेरिकन एजंटची हत्या केल्याचाही आरोप आहे. ड्रग माफिया, राफेल कॅरो क्विंटेरो हा एफबीआयच्या टॉप-१० वॉन्टेड यादीत होता. अमेरिकन तपास संस्था सीआयएच्या अधिकाऱ्यांना लाच देऊन तो आपले काम करून घेत होता. आता ट्रम्पंनी त्याला मदत करत असलेल्या सर्वच अधिका-यांचा तपास सुरु करत अमेरिकन गुप्तहेर एनरिक किकी कॅमरेना यांना न्याय मिळवून देणार अशी घोषणा केली आहे. क्विंटेरो याच्यावर अमेरिकेने 140 कोटी रुपयांचे बक्षीस होते. 2500 एकरावर गांजाची शेती करणारा क्विंटेरो हा ड्रग माफिया कसा झाला याची मोठी कथा आहे. मेक्सिकोमध्ये जेव्हा कॅरो क्विंटेरोला पकडण्यात आले होते. त्याला 40 वर्षाची शिक्षा झाली. मात्र 28 वर्षानंतर तो तुरुंगातून पळाला. त्यानंतर त्याला दहा वर्षानी अटक करण्यात आली. (Donald Trump)

या कॅरो क्विंटेरोच्या नावानं पोलीसही घाबरत असत. राफेल कॅरो क्विंटेरो याचा जन्म 24 ऑक्टोबर 1952 रोजी मेक्सिकोतील सिनालोआ प्रांतातील बदीरागुआटो येथे झाला. हा परिसर मेक्सिकोच्या कुख्यात ड्रग्ज माफियांचा बालेकिल्ला आहे. येथेच कुख्यात तस्कर एल चापो याचाही वावर होता. याच वातावरणात मोठ्या झालेल्या क्विंटेरोनं, अर्नेस्टो फोन्सेका कॅरिलो आणि मिगुएल एंजेल फेलिक्स गॅलार्डो या दोन ड्रग माफियांसह गांजा विकायला सुरुवात केली. त्यासाठी त्यानं गांजीची लागवडही केली. मेक्सिकोतील चिहुआहुआ येथे 2500 एकरचे गांजाचे शेतच त्यानं विकसित केले. या शेताची किंमत 8 अब्ज डॉलर्स होती. या शेतीमुळे क्विंटेरोचे नाव सर्वात मोठा गांजा व्यापारी म्हणून झाली. त्यानं एक मोठी टोळी तयार केली. ही टोळी अमेरिकेत गांजा आणि हेरॉइनची तस्करी करायची. नंतर, या क्विंटेरोने कोकेन तस्करीही करायला सुरुवात केली. 1980 मध्ये अमेरिकन ड्रग एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशनने, क्विंटेरोवर कारवाईची सुरुवात केली. अमेरिकन गुप्तहेर एनरिक किकी कॅमरेना, यानं क्विंटेरोचे नेटवर्क उध्वस्त करण्याचे काम सुरु केले. (International News)

कॅमरेना याला क्विंटेरोच्या शेताची माहिती मिळाली आणि त्यानं हे शेतही उद्ध्वस्त केले. हा क्विंटेरोच्या साम्राज्याला मोठा धक्का होता. त्यानं अमेरिकन गुप्तहेर कॅमरेनाचे अपहरण करुन त्याची क्रूरपणे हत्या केली आणि त्याचा देह मिचोआकन राज्यात पुरला. या सर्वात क्विंटेरोला सीआयएच्या अधिका-यांनीच मदत केल्याचाही आरोप आहे. या सर्व प्रकरणानंतर अमेरिकनं क्विंटेरोला पकडण्यासाठी ऑपरेशन लेयेंडा सुरू केले. तत्कालीन अमेरिकन सरकारने मेक्सिकोवर दबाव आणला. या दबावाखाली, मेक्सिकोने एप्रिल १९८५ मध्ये कोस्टा रिकामध्ये क्विंटेरोला अटक केली. त्याला 40 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. मात्र मेक्सिकोनं त्याला 2013 साल सोडून दिले. अमेरिकेनं यावर नाराजी व्यक्त केली. पण तोपर्यंत क्विंटेरो पळून गेला होता. (Donald Trump)

===============

हे देखील वाचा : America : अमेरिकेत पुन्हा आगीचे तांडव !

Masan Holi : वाराणसीच्या मसान होळीसाठी मोठी गर्दी !

===============

2022 मध्ये याच क्विंटेरोला शेतामध्ये पोलिसांच्या शिकारी कुत्र्यांनी पकडले. तेव्हा तो 72 वर्षाचा होता. तेव्हापासून मेक्सिकोच्या तुरुंगात असलेला क्विंटेरो आता अमेरिकेच्या ताब्यात आला आहे. आता ट्रम्प यांनी क्विंटेरोला मदत करणा-या सीआयए अधिका-यांचाही शोध घेण्याची सूचना केल्यामुळे अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांची दहशत किती आहे, हे सांगणारी दुसरी घटना पाकिस्तानी दहशतवादयाची आहे. 2021 मध्ये काबूलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 13 अमेरिकन सैनिक मारले गेले होते. यात एका मोठ्या दहशतवाद्याचा हात होता. हा दहशतवादी पाकिस्तानमध्ये लपून बसला होता. या दहशतवाद्याला अमेरिकेनं शोधलं असून पाकिस्तानने त्याचा ताबा अमेरिकेकडे दिला आहे. या दहशतवाद्याचे नाव अद्याप उघड झाले नाही, मात्र यामुळे ट्रम्प यांच्या नावाची दहशत किती आहे, हे स्पष्ट झाले आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.