सध्या माध्यमांमध्ये, सोशल मीडियावर, टीव्हीवर फक्त आणि फक्त अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाबद्दलच दिसत आहे. येत्या १२ जुलै ला ही जोडी लग्न बंधनात अडकत आहे. त्याआधी त्यांच्या लग्नाचे विविध समारंभ चालू आहेत. या सर्व कार्यक्रमांचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होताना दिसत आहे. (Radhika Merchants Flower Dupatta)
मागील अनेक महिन्यांपासून त्यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. अनंत आणि राधिका यांच्या लग्नाआधी प्री वेडिंगचे अनेक कार्यक्रम झाले. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या अर्थात मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नाच्या चर्चांची खूपच लक्ष वेधून घेतले आहे. अनंत आणि राधिका यांचे मेहेंदी, संगीत हे कार्यक्रम तुफान गाजले आणि मोठ्या जल्लोषात संपन्न झाले. या सर्व सेलिब्रेशनमध्ये बॉलिवूड देखील हजर होते.
नुकताच अनंत आणि राधिका यांच्या हळदीचा समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र या सगळ्या फोटोंमध्ये लक्ष वेधून घेतले ते राधिकाच्या लूकने आणि तिच्या ज्वेलरीने. राधिकाने तिच्या हळदी कार्यक्रमासाठी पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. त्यावर तिने फुलांचे अतिशय सुंदर, नाजूक आणि आकर्षक असे दागिने घातले होते. तिचा हा लूक सध्या खूपच गाजत असून, ट्रेंड होताना दिसत आहे.
राधिका मर्चंटने तिच्या हळदीसाठी सेलिब्रिटी फॅशन डिझायनर अनामिका खन्नाने खास डिझाइन केलेला पिवळा रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्याची खास बाब म्हणजे त्यावर असलेला दुपट्टा. राधिकाच्या लेहेंग्यावरील दुपट्टा हा कापडाचा नाही तर ताज्या सुंदर फुलांचा होता. राधिकाच्या या लेहेंग्यावरील फोटो समोर आल्यानंतर तिच्या या दुपट्ट्याबद्दल अनेकांनाच कुतूहल वाटत होते.
राधिका या हळदी समारंभात घातलेल्या लेहेंग्यावरील दुपट्टा हा मोगरा आणि झेंडूच्या फुलांनी तयार करण्यात आला होता. राधिकाच्या या दुपट्ट्यात एकूण ९० हून अधिक झेंडूच्या तर शेकडो मोगऱ्याच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. तिचा हा दुपट्टा फ्लोरल आर्ट डिझाईन स्टुडियो ने डिझाइन केला असून, तो तयार करायला २४ तासांचा कालावधी लागल्याचे सांगण्यात येत आहे. या दुपट्ट्याची किनार झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आली असून, मधला पूर्ण भाग मोगऱ्याच्या फुलांपासून तयार करण्यात आला आहे.
======
हे देखील वाचा : मॉन्सूनमध्ये साडीत आकर्षक दिसण्यासाठी टिप्स
======
या दुपट्ट्यासोबत राधिकाने फुलांनी तयार करण्यात आलेले दागिने घातले होते. तिच्या या लूकमध्ये फुलांच्या कळ्यांपासून तयार करण्यात आलेला चोकर आणि लांब हार त्यावर मॅचिंग कानातले दोन्ही हातांमध्ये फुलांच्या बांगड्या आदी दागिन्यांचा समावेश आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी स्टायलिस्ट असलेल्या रिया कपूरच्या टीमने राधिकाच्या या संपूर्ण स्टायलिंगवर काम केले होते.
दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे १२ जुलै रोजी मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पारंपारिक हिंदू पद्धतीने लग्न बंधनात अडकणार आहेत. शनिवारी १३ जुलैला शुभाशीर्वाद देण्याचा कार्यक्रम होईल. तर रविवारी १४ जुलैला लग्नाच्या रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.