जगातील सर्वाधिक उंच इमारत म्हणून कुतुब मीनारला ओखळले जाते. ही इमारत इंडो-इस्लामिक आर्किटेक्टचरचा सर्वोत्कृष्ट नमूना आहे. दरम्यान, अलीकडच्या काळात कुतुब मीनार संदर्भात काही रहस्य आणि वाद सुरु झाले आहेत. अशातच बहुतांश लोकांना जाणून घ्यायचे असते की, याचे नाव कुतुब मीनार कसे ठेवले गेले? पण या बद्दल इतिहासकारांमध्ये वाद आहे. (Qutub Minar Door)
काही इतिहासकारांचे असे मानणे आहे की, याचे नाव कुतुबुद्दीन ऐबकच्या नावावरुन पडले, जे भारतातील प्रथम मुस्लिम शासक होते. तर काही इतिसाहकार असे मानतात की, याचे नावा ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी यांच्या सन्मानार्थ कुतुब मीनार पडले. जे बगदादचे एक संत होते आणि त्यांना इल्तुमतिमश खुप अधिक सन्मान द्यायचे. कुतुब मीनारच्या आसपास काही ऐतिसाह आणि भव्य इमारते ही आहेत. त्यांची गणना युनिस्को वर्ल्ड हेरिटेज साइट्स मध्ये केली जाते. परंतु कुतुब मीनार बद्दल काही गोष्टी ऐकतो तेव्हा त्याची माहिती मिळतेच. पण त्याचा दरवाजा नेहमी का बंद असतो हे तुम्हाला माहिती आहे का? याच बद्दल आपण जाणून घेऊयात.
कुतुब मीनारचा इतिहास
कुतुब मीनारची निर्मिती ११९९ ते १२२० दरम्यान झाले होते. ते बनवण्याची सुरुवात कुतुबुद्दीन-ऐबकने केली होती. त्यानंतर उत्तराधिकारी इल्तुतमिशने पूर्ण केले. दरम्यान, तेव्हा कुतुब मीनारचा दरवाजा खुला होता. तो पाहण्यासाठी लोक आतमध्ये जायचे. परंतु काही काळानंतर लोकांचे आतमध्ये येणेजाणे बंद झाले. यामागे काही कारणं होती. दरम्यान, कुतुब मीनारच्या आसपास काही गोष्टी तयार केल्या आहेत जसे कुव्वत-उल-इस्लाम मस्जिद, अलाई दरवाजा, इल्तुतमिश याची कबर, अलाई मीनार, अलाउद्दीनचा मदरसा आणि कबर, इमान जमीनची कबर आणि सेंडरसनचा सन डायल असे.

कुतुब मीनार बद्दल अधिक
कुतुब मीनारची उंची ७२.५ मीटर आहे. यामध्ये जवळजवळ ३७९ पायऱ्या आहेत. ज्या आपल्याला मीनारच्या टोकावर घेऊन जातात. खालच्या बाजूने पाहिल्यास ही इमारत १४.३२ मीटर आहे. जी वरुन २.७५ मीटर आहे. या इमारतीवर करण्यात आलेले कलाकौशल्य खुप सुंदर आहे की, दूरदूरवरुन लोक पाहण्यासाठी ते येतात. त्याचसोबत येथील कुतुब कॉम्प्लेक्समध्ये १० मिनिटांचा सिनेमा ही दाखवला जातो. त्यामध्ये इमारतीच्या काही खास गोष्टी सांगितल्या जातात.(Qutub Minar Door)
बंद दरवाज्यामागील काय आहे रहस्य
सन १९७४ ची गोष्ट आहे, जेव्हा कुतुब मीनार मध्ये सामान्य लोकांना एन्ट्रीसाठी परवानगी होती. पण ४ डिसेंबर १९८१ मध्ये लोकांसोबत एक मोठी दुर्घटना घडली. त्यामध्ये आतमध्ये मोठा गोंधळ झाला आणि त्यात ४५ लोकांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर कुतुब मीनारचा दरवाजा बंद केला होता.
हे देखील वाचा- जगातील सर्वात लांब जलमार्गे ‘गंगा विलास क्रूझ होणार
कुतुब मीनारच्या दरवाज्याला काय म्हटले जाते?
कुतुब मीनारवर बनवण्यात आलेल्या दरवाज्याला एक नाव सुद्धा दिले गेले आहे. ज्याला अलाई द्वार असे ही म्हटले जाते. अलाई दरवाजा, कुतुब मीनारचा प्रवेश द्वार दिल्ली सल्तनतचे अला-उददीन खिलजी यांच्याद्वारे निर्माण करण्यात आला होता. या दरवाज्यातून कुतुब मीनारच्या परिसरासह अन्य परिसर ही जोडले गेले. ज्याच्या आतमध्ये जाऊन काही गोष्टी पाहता येतात.