भारतीय कोहिनूर आणि आफ्रिकन हिऱ्यानंतर आता एकेकाळी लाहोरहून ब्रिटनमध्ये पोहोचलेल्या हिऱ्याची चर्चा सुरू झाली आहे. लंडनमधील राजा चार्ल्सच्या राज्याभिषेकाच्या वेळी राणी झालेली पत्नी म्हणजेच कॅमिलाने परिधान केलेल्या नेकलेसमध्ये हाच हिरा वापरला होता . राणीच्या त्या हाराने साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. याला ‘कोरोनेशन नेकलेस’ म्हटले जाते. कॅमिलाने राज्याभिषेकाच्या वेळी तो घातला होता. हा नेकलेस जवळजवळ १६५ वर्ष जूना आहे. याला गर्राडने क्वीन विक्टोरियासाठी डिझाइन केले होते. त्यानंतर प्रत्येक क्वीनच्या राज्याभिषेकावेळी तिने घातला होता.कॅमिलाने हिच परंपरा पुढे सुरु ठेवत ६ मे रोजी आपल्या गळ्यात घातला होता. शेवटचा हा नेकलेस क्वीन एलिजाबेथ द्वितीय यांनी १९५३ मध्ये घातला होता. (Queen Camila Coronation)
कॅमिलाचा कोरोनेशन नेकलेस अतिशय मौल्यवान हे. यामध्ये २५ हिरे होते. त्याचसोबत त्यात २२.४८ कॅरेटच्या डायमंडचे पेंडेंट सुद्धा आहे. यामध्ये लावण्यात आलेला हिरा लाहौर डायमंडच्या नावाने ओळखला जातो. याच्या इतिहासावर एक नजर टाकली तरीही काही खास गोष्टी समोर येतात.
रॉयल हिस्टोरियन असे म्हणतात की, जेव्हा क्वीन विक्टोरियाला तो आपल्या वडिलांकडून वारसा म्हणून मिळाला तेव्हा हनोवेरिय ताज तिचे काका राजा अन्सर्ट अगस्ट फर्स्ट रॉयल कलेक्शन यांचे असे म्हणणे आहे की, हा नेकलेस बनवण्यासाठी त्यावेळी ६७२८ रुपयांचा खर्च आला होता. यामध्ये २८ हिरे होत. पण त्यानंतर तीन हिरे त्यामधून काढले गेले पहिला क्विनच्या बॅचसाठी तर दुसरा तलवारीसाठी वापरला गेला. हेच कारण आहे की त्यावर आता २५ हिरे आहेत.
नेकलेस बनवण्यासाठी लाहौरच्या २२.४८ कॅरेटच्या हिऱ्याची निवड केली गेली. जो पंजाब प्रांतातील लाहौरच्या खजिन्यातून आणला गेला होता. काही इतिहासकारांचे असे मानणे आहे की, तो १८५१ मध्ये क्वीन विक्टोरिया हिला गिफ्ट करण्यात आला होता. तर काही असे म्हणताता तो चोरला होता. किंग अल्बर्टने १८५८ मध्ये जेव्हा लाहौर किल्ल्यावर आक्रमण केले तेव्हा यावर ही ताबा मिळवला. हेच कारण आहे की, लाहौरत्या डायमंड बद्दल इतिहासकारांचे वेगवेगळे मतं आहे. (Queen Camila Coronation)
हेही वाचा- ‘तुम्ही राक्षसाला जन्म दिलांय’ पुतीन यांच्या आईवडिलांना पत्र
इतिहासकारांचे असे म्हणणे आहे की, हा नेकलेस क्वीन विक्टोरियाचा फार आवडीचा नेकलेस होता. तिने काही खास क्षणांवेळी तो घातला होता. तेव्हापासून तो शाही परिवारातील महिलांच्या आवडीचा दागिना बनला आहे. क्वीन अलेक्जेंड्रा शाही परिवारातील पहिली अशी एक महिला होती जिने तो १९०२ मध्ये राज्याभिषेकावेळी पहिल्यांदा घातला होता तेव्हापासून तो वापरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर १९११ मध्ये क्वीन मैरी आणि १९३७ मध्ये क्वीन मदर एलिजाबेथ यांनी घातला होता. १९५१ मध्ये क्वीन एलिजाबेथ यांनी राज्याभिषेकावेळी घातला होता. या व्यतिरिक्त काही खास क्षणांवेळी ही तो त्यांनी घातला होता. पण ६ मे रोजी जेव्हा कॅमेला क्विन कंसॉर्ट झालीतेव्हा पुन्हा हा नेकलेस चर्चेत आला. सोशल मीडियात याचे फोटो सुद्धा व्हायरल झाले आहेत.’