तुमच्या घरी येणाऱ्या गॅस सिलिंडवर तुम्हाला आता एक क्युआर कोड दिसून येणार आहे. कारण सरकारने या संदर्भातील एक मोठी घोषणा केली आहे. कारण असे करण्यामागील मुख्य उद्देश हाच आहे की, गॅस सिलिंडरचा होणारा काळाबाजार. आता लवकरच लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) वर क्यूआर कोड दिला असणार आहे. या क्यूआर कोडच्या माध्यमातून तुम्ही तो स्कॅन केल्यानंतर त्या संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. हा कोड सिलिंडरच्या आधार कार्ड प्रमाणेच काम करणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी असे म्हटले की, घरगुती गॅस सिलिंडरला रेग्युलेट करण्यास मदत होणार आहे. पुरी यांनी असे ही म्हटले की, हा एक क्रांतिकारी बदल असणार आहे कारण आता ग्राहकांना एलपीजी सिलिंडर ट्रॅक ही करता येणार आहे. (QR Code on LPG)
सध्याच्या गॅस सिलिंडरवर क्यूआर कोड लावला जाईल. तर नव्या सिलिंडरवर तो आधीपासूनच दिला जाईल. पहिल्या टप्प्यात २० हजार एलपीजी सिलिंडरवर क्यूआर कोड लावला गेला आहे. क्यूआर कोड एक प्रकारचा बारकोड असून तो कोणत्याही डिजिटल डिवाइसच्या माध्यमातून अगदी सहज वाचता येऊ शकतो. पुढील तीन महिन्यांमध्ये सर्व १.२ किलोग्रॅमच्या घरगुती एलपीजी सिलिंडरवर क्यूआर कोड लावला जाणार आहे. तर सर्व जुन्या एलपीजी सिलिंडरवर स्पेशल स्टिकर लावला जाईल.

क्यूआर कोडचा कसा वापर कराल?
-तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून गॅस सिलिंडरवर लावण्यात आलेला क्यूआर कोड स्कॅन करु शकता.
-स्कॅन केल्यानंतर स्क्रिनवर डिस्प्ले दिसेल, जो तुम्हाला या गोष्टीची माहिती देईल की हा सिलिंडर कोणत्या प्लांटमधून भरला गेला आहे.
-तुमच्या स्क्रिनवर हे सुद्धा दिसेल, सिलिंडरचा डिस्ट्रिब्युटर कोण आहे आणि कोठून फिरुन फिरुन आला आहे.
-सिलिंडर केव्हा-कधी काढला आणि त्याचा डिलिव्हरी करणारा व्यक्ती कोण आहे हे सुद्धआ ग्राहकाला कळणार आहे.
-तुमच्या स्क्रिनवर प्लांट ते घरापर्यंतचा सिलिंडरचा प्रवास तुम्हाला दिसू शकणार आहे. (QR Code on LPG)
-त्याचसोबत गॅस सिलिंडरची एक्सपायरी डेट सुद्धा पाहता येणार आहे.
हे देखील वाचा- रुग्णवाहिकेला रुग्णापर्यंत पोहचण्यास उशिर झाल्यास भरावा लागणार १ लाखांचा दंड
सिलिंडरवरील क्यूआर कोडचे फायदे काय?
-गॅस सिलिंडरवर क्यूआर कोडच्या मदतीने ग्राहकांना तो कुठे उपलब्ध आहे हे कळणार आहे.
-याच्या मदतीने ग्राहकांना सिलिंडरचे वजन, एक्सपायरी तारीख सारखी माहिती सुद्धा मिळणार आहे.
-क्यूआर कोडच्या मदतीने ग्राहकांना हे सुद्धा कळणार आहे की, गॅस सिलिंडर कोठून भरला गेला आहे.
-ग्राहकांना सर्वसामान्यपणे आपला गॅस सिलिंडरचा डिस्ट्रिब्युटर कोण आहे हे कळण्यास समस्या येते. पण क्यूआर कोडच्या माध्यमातून त्यांना हे कळणार आहे की, त्यांचा डिस्ट्रिब्युटर कोण आहे.
-गॅस सिलिंडर तुमच्या घरी पोहचल्यानंतर व्यक्तीला सर्वाधिक मोठी चिंता असते की, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा लीकेज तर नाही ना. असे झाल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. क्यूआर कोड यामध्ये मोठी मदत करणार आहे. याच्या माध्यमातून ग्राहकाला कळणार आहे की, खरंच गॅस सिलिंडरवर सेफ्टी टेस्ट करण्यात आलेली आहे की नाही.