Home » विशालकाय अजगराने चक्क ५४ वर्षीय महिलेला जीवंत गिळले

विशालकाय अजगराने चक्क ५४ वर्षीय महिलेला जीवंत गिळले

by Team Gajawaja
0 comment
Python Swallowed Women
Share

इंडोनेशियात एका वृद्ध महिलेला विशालकाय अजगराने चक्क जीवंत गिळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रिपोर्ट्सनुसार, ५४ वर्षीय महिला जंगलात रबर मिळवण्यासाठी गेली होती. जवळजवळ २ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेला जेव्हा स्थानिक लोकांनी शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी एक २२ फूट लांब अजगराला पाहिले असता त्याचे पोट फुगले होते. अशातच लोकांना संशय आला आणि त्यांनी अजगराचे पोट कापले असता त्यांना महिलेच्या मृतदेहाचे काही अवशेष मिळाले. सोशल मीडियात हे अत्यंत खतरनाक प्रकरण आता चर्चेचा विषय बनले असून त्याचे फोटो सुद्धा सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहेत. (Python Swallowed Women)

मिरर.को. युके च्या रिपोर्ट्सनुसार, वृद्ध महिलेच्या गावातील प्रमुखांनी असे म्हटले की, असे मानले जातेय अजगर महिलेला प्रथम चावला आणि त्यानंतर तिचा श्वास बंद व्हावा म्हणून तिला चहूबाजूने घेरले. त्यानंतर महिलेला अत्यंत विचित्र पद्धतीने त्याने गिळले. सोशल मीडियात अजगराचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यामध्ये त्याचे पोट हे फुगलेले स्पष्टपणे दिसून येतेय. काही क्लिप्समध्ये असे दिसते की, स्थानिक लोक अजगराचे पोट फाडत असून त्यामधून महिलेचा मृतदेह बाहेर काढत आहेत.

Python Swallowed Women
Python Swallowed Women

अधिकाऱ्यांनी म्हटले की, झाडांमधून रबर काढण्यासाठी महिला आपल्या घरातून निघाली होती. मात्र त्यानंतर ती घरी परतलीच नाही. अशातच परिवाराने ती बेपत्ता झाल्याची तक्रार स्थानिक अधिकाऱ्यांना दिली. महिलेचा तपास सुरु केला.तेव्हा त्यांना पोट फुगलेला एक अजगर दिसला असता त्यांनी अजगराचे पोट चिरुन तिला बाहेर काढले. गावाच्या प्रमुखांनी असे सांगितले की, अजगराने तिला गिळताना कोणीही पाहिले नाही. कारण ती जंगलात एकटीच गेली होती. गावात विशालकाय अजगराला पाहिल्यानंतर आता भीतीचे वातावरण गावकऱ्यांमध्ये निर्माण झाले आहे. तर इंडोनेशिया आणि दक्षिण पूर्व एशियातील अन्य काही ठिकाणी अजगर मोठ्या संख्येने आढळून येतात. आपली शिकार अजगर हे दातांनी पकडतात आणि नंतर त्यांना पूर्णपणे गिळण्यसाठी त्यांचा श्वास रोखून मारुन टाकतात. (Python Swallowed Women)

हे देखील वाचा- कुत्रा घरी पाळायचा आहे तर परवाना लागणारच, ‘या’ सरकारने काढले नियम

गेल्याच महिन्यात भारतात जौनपूरात नीलगाईच्या बाळाला अजगराने गिळल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेबद्दल माहिती मिळताच गावातील लोकांनी अजगराला रश्शीने बांधून मुख्य मार्गापर्यंत आणले होते. नीलगाईच्या बाळाला अजगराच्या तोंडातून बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न केला. त्या अजगराची लांबी जवळजवळ चौदा फूट होती.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.