Home » Purple Day : जाणून घ्या काय आहे एपिलेप्सी आजार

Purple Day : जाणून घ्या काय आहे एपिलेप्सी आजार

by Jyotsna Kulkarni
0 comment
Purple Day
Share

आपण जर आपल्या आजूबाजूला बघितले तर अनेक विविध प्रकारचे गंभीर आजार पाहायला मिळतील. प्रत्येक आजाराचे स्वरूप हे वेगवेगळे असते. मात्र त्या सर्व आजारांची गंभीरता एकसारखीच असते. आजच्या घडीला सर्वात जास्त पाहायला मिळणार आणि ऐकायला मिळणार आजार म्हणजे ‘एपिलेप्सी’ अर्थात ‘अपस्मार’. एपिलेप्सी हा मेंदूशी संबंधित एक गंभीर आजार आहे. आजच्या घडीला जगभरात असंख्य लोकं या आजाराने ग्रस्त आहेत. (Purple Day)

अतिशय मोठा आणि गंभीर आजार असलेल्या एपिलेप्सी या आजाराबाबत आजही अनेक लोकांमध्ये अनभिज्ञता दिसून येते. यामुळेच या आजाराच्या जनजागृतीसाठी दरवर्षी २६ मार्च हा दिवस ‘पर्पल डे’ म्हणून साजरा करण्यात येतो. या आजाराला आपल्या सध्या सोप्या भाषेत फिट येणे, आकडी, मिरगी आदी नावांनी ओळखले जाते. २००८ साली कॅनडाच्या कॅसिडी मेगन या मुलीने या आजाराबद्दल लोकांना जागरूक करण्यास सुरुवात केली. लोकांमध्ये एपिलेप्सी आजाराबद्दल असलेल्या सर्व प्रश्नांना उत्तर देणे आणि त्यांच्या शंका दूर करत या आजाराबद्दल त्यांना सजक करण्याचे काम तिने केले. (Epilepsy Disease)

जगभरात जवळपास १३४ हून अधिक देशांमध्ये हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. जगभरात ५ कोटी लोक या आजाराने ग्रस्त आहेत, त्यापैकी १ कोटी रुग्ण भारतात आहेत. जागतिक पातळीवर दर १ लाख लोकसंख्येमागे ४९ लोकांना हा आजार होतो, तर भारतात हा दर १३९ प्रति लाख आहे. यावरूनच आपल्या लक्षात येईल की, भारतामध्ये हा आजार झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे यासाठी लोकांना या आजाराबद्दल माहिती असणे आवश्यक झाले आहे. (Marathi Top News)

==============

हे देखील वाचा : Navratri : चैत्र नवरात्रीची तयारी !

===============

Purple Day

एपिलेप्सी हा आजार कधीही कोणालाही होऊ शकतो. यातही साधारणपणे मुले आणि तरुणांना या आजाराची शक्यता अधिक जास्त असते. हा आजार असलेल्या व्यक्तीला झटके येऊ लागतात. हे झटके तसे किरकोळ कमी प्रमाणात असले तरी, कधीकधी ते गंभीर देखील असू शकतात. औषधांच्या मदतीने हा आजार बऱ्याच प्रमाणात नियंत्रित केला जातो. एपिलेप्टिक झटके कधी येतील हे सांगता येत नसले तरी कधी दिवसातून अनेक वेळा किंवा वर्षातून काही वेळा येऊ शकतात. या दरम्यान पीडित व्यक्ती पडू शकते किंवा जखमी होऊ शकते. (Latest Marathi News)

एपिलेप्सी म्हणजे काय?
एपिलेप्सी ही एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. यात मेंदूवर दीर्घकालीन परिणाम होतात. ज्यामुळे रुग्णाला कोणतीही पूर्वकल्पना न मिळता अचानक झटका येतो. हे झटके सौम्य ते तीव्र स्वरूपाचे असू शकतात. फिट्स आल्यानंतर व्यक्तीला काहीच कळत नाही आणि काही काळासाठी व्यक्तीचे शरीर हे अचेतन स्वरूपात जाते. (Top Stories)

एपिलेप्सीची लक्षणे
१) शुद्ध हरपणे
२) स्नायूंचा ताठरपणा
३) अचानक जमिनीवर कोसळणे
४) हाता- पायांना मुंग्या येणे
५) डोळे, कान, चव यांच्या ज्ञानेंद्रियांवर परिणाम होणे
६) भीती वाटणे, मूड बदलने
७) दात घट्ट करणे किंवा जीभ चावणे

==============

हे देखील वाचा : Gudipadwa : चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात ‘गुढीपाडवा’

===============

एपिलेप्सीच्या बहुतकरून केसेसमध्ये कोणतेही विशिष्ट कारण दिसून येत नाही. पण तरीही त्याची काही सामान्य कारणे असू शकतात जसे की, अपघातामुळे डोक्याला दुखापत, ब्रेन स्ट्रोक आणि ट्यूमर, मेंदूचा संसर्ग, जन्मापासून असामान्यता, एन्सेफलायटीस आणि मेनिंजायटीस सारखे संक्रमण, एचआयव्ही, एड्स, ड्रग्ज दारूस, सिगारेटचे सेवन, अपुरी झोप, ताप, तणाव, वेळी अवेळी जेवणे, जेवण स्किप करणे आदी कारणांमुळे एपिलेप्सी होण्याची शक्यता असू शकते. त्यासाठी कायम आपली जीवनशैली उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करावा.(Social News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.