Home » शुद्ध तूप असे ओळखा

शुद्ध तूप असे ओळखा

तूप आपल्या संपूर्ण आरोग्यासह केस आणि त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. प्रत्येक वयातील व्यक्तीसाठी तूप हे औषधाप्रमाणे काम करते. 

by Team Gajawaja
0 comment
Purity of ghee
Share

तूप आपल्या संपूर्ण आरोग्यासह केस आणि त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. प्रत्येक वयातील व्यक्तीसाठी तूप हे औषधाप्रमाणे काम करते.  यामुळेच बहुतांश घरात शुद्ध तूप वापरले जाते. मात्र तुम्ही जेव्हा शुद्ध तूपाची ऑनलाईन ऑर्डर करता तेव्हा ते शुद्ध आहे की नाही हे पटकन कळून येत नाही. असे तूप वापरणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते. अशातच शुद्ध तूप आणि भेसळयुक्त तूपामधील फरक ओळखता आला पाहिजे. (Purity of ghee)

भेसळयुक्त तूप हे अगदी स्वस्त असते. त्याची किंमत ही अधिक नसते. मात्र व्यापारी याच्या माध्यमातून अधिक नफा कमावू पाहतात.  खरंतर भेसळयुक्त तूप सुद्धा तुम्हा शुद्ध तूपाप्रमाणेच दिसेल. मात्र त्याचा आरोग्यावर उलट परिणाम होईल. शुद्ध तूप अत्यंत महाग विक्री केले जात असल्याने काही व्यापारी त्यात वनस्पती तूप, बटाटा, हाइड्रोजेनेटेड तेल किंवा नारळाच्या तेलाची भेसळ करतात. अशातच तुम्ही पुढील काही ट्रिक्स वापरुन शुद्ध आणि भेसळयुक्त तूपामधील फरक ओळखू शकता.

Purity of ghee

Purity of ghee

मीठ
तुमच्याकडील तूप हे शुद्ध आहे की भेसळयुक्त ते ओळखून पाहण्यासाठी मीठ घ्या. यासाठी एका भांड्यात एक चमचा तूप घ्या. त्यात आता अर्धा चमचा मीठ आणि हाइड्रोक्लोरिक अॅसिड मिक्स करा.जवळजळ 20 मिनिटांसाठी त्याला तसेच ठेवा. जर या दरम्यान रंग बदलला गेला तर ते तूप भेसळयुक्त आहे. खरंतर शुद्ध तूपाचा रंग कधीच बदल नाही.

पाणी
शुद्ध तूप ओळखण्यासाठी पाण्याची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्ही एका ग्लासात पाणी घ्या आणि त्यात तूप टाका. जर तूप पाण्यावर तरंगत असेल तर ते शुद्ध तूप आहे. मात्र भेसळयुक्त तूप असल्यास ते पाण्याखाली बुडेल.

हातावर ठेवून पहा
शुद्ध तूप तपासून पाहण्याची आणखी एक ट्रिक म्हणजे तुम्ही हातावर ठेवून ते पाहून शकता. ही अगदी सोप्पी ट्रिक आहे.यासाठी थोडसं तूप आपल्या हातावर काही सेकंद ठेवा. जर तूप विरघळले तर ते शुद्ध तूप आहे. मात्र बनावट तूप हे तसेच राहिल. (Purity of ghee)

हेही वाचा- लिंबू आणि त्याच्या सालापेक्षा ही जास्त गुणकारी आहेत त्याची पाने, जाणून घ्या फायदे

रंगावरुन ओळखा
तूपाचा रंग पाहून तुम्ही ते शुद्ध आहे की भेसळयुक्त आहे ते पहा. यासाठी एक चमचा तूप एका भांड्यात काढून ते गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. तूप गरम होताना त्याचा रंग हलका ब्राउन दिसायला लागला तर ते शुद्ध तूप आहे असे समजा. मात्र भेसळयुक्त तूपाचा रंग हा पिवळाच राहिल.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.