प्रत्येकालाच सोन्याचे दागिने बनवण्याची आणि घालण्याची आवड असते. कोणताही सण असो तेव्हा आवर्जुन सोन्याचे दागिने घातले जातात. भारतीय परंपरेनुसार सोन्याच्या दागिन्यांना खासकरुन सणांचा वेळी फार महत्व आहे. लग्न असो किंवा एखादा सण त्यावेळी सोन्याची खरेदी केली जाते. मात्र जेव्हा आपण सोन्याची खरेदी करतो तेव्हा आपल्याला दुकानात 23, 24 कॅरेट अशा प्रकारचे दागिने असतात. परंतु खरं सोनं नक्की कसे ओळखायचे असा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात निर्माण होतो. कारण सध्या शुद्ध सोन्यात भेसळ केल्याच्या काही तक्रारी या नागरिकांकडून केल्या जातात. मात्र बनावट सोने विक्री करणे हे कायद्याने गुन्हा असला तरीही ते विकले जातात. तर अशा गोष्टींना बळी पडण्यापूर्वी शुद्ध सोनं कसं ओळखायचे याबद्दलच्या काही सोप्प्या ट्रिक्स येथे जाणून घ्या.(Pure gold test)
-चुंबकाचा वापर करा
खरंतर सोने हे चुंबकीय धातू नाही आहे. त्यामुळे खऱ्या सोन्याची पारख करायची असेल तर चुंबकीय टेस्ट तुमच्या नक्कीच कामी येईल. तुम्हाला दागिने विकणाऱ्या व्यक्तीवर संशय येत असेल तर चुंबक हे सोन्याच्या दागिन्याजवळ घेऊन जा. अशावेळी जर तुमचे सोन्याचे दागिने हलके सुद्धा त्याच्याकडे आकर्षित झाल्यास समजून जा त्यामध्ये भेसळ करण्यात आली आहे.
-नाइट्रिक अॅसिडचा वापर
सोन्यावर हलका नाइट्रिक अॅसिडचा वापर करुन पहा. असे केल्यानंतर सोने हिरवे पडले तर लगेच समजून जा की त्यात भेसळ केली आहे. कारण शुद्ध सोन्यावर जरी नाइट्रिक अॅसिड टाकले असता त्याचा रंग बदलत नाही.
-पाण्याचा वापर
शुद्ध सोन्याची पारख करण्याचा अत्यंत सोप्पा मार्ग म्हणजे पाण्याचा वापर. तुमचा सोन्याचा एखादा दागिना त्यात टाकून ठेवा आणि थोड्यावेळाने पाण्याकडे पहा. जर दागिना तरंगताना दिसल्यास त्यात थोडीतरी भेसळ असल्याचे दिसून येईल. कारण शुद्ध सोनं कधीच तरंगत नाही. या व्यतिरिक्त सोन्याला कधीच जंग पकडत नाही.(Pure gold test)
हे देखील वाचा- स्वतःच्याच करोडोंच्या मालमत्तेची माहिती महिलेला नव्हती; घर विकणार होती, तेव्हाच सापडला दडलेला खजिना
-सिरामिक भांडे
सिरामिकच्या भांड्याच्या माध्यमातून तुम्ही शुद्ध सोनं ओळखू शकता. त्यासाठी तुमचा दागिना त्यावर घासून पहा. जर भांड्यावर काळा डाग पडल्यास तर बनावट सोने असल्याचे समजा. याउलट जर हलका सोनेरी रंग दिसल्यास ते शुद्ध सोनं असल्याचे समजा.
-हॉलमार्क तपासा
एखाद्या सोन्याच्या दुकानात तुम्ही दागिने खरेदी करण्यासाठी गेलात तर त्यावरील हॉलमार्क जरुर तपासा. कारण त्यावर शुद्ध सोन्यासंदर्भातील माहिती दिलेली असते.
-दागिन्याच्या रंगावर लक्ष द्या
22 कॅरेटचे सोन्याचा रंग अधिक पिवळसर असतो. तर 18 कॅरेट हे पिवळं धम्मक आणि 18 कॅरेटपेक्षा कमी असलेल्या सोन्याचा रंग फिकट पिवळा असतो. अशातच तुम्ही दागिने खरेदी करण्यापूर्वी त्याचा रंगाकडे सुद्धा आवश्यक लक्ष द्या.
तर अशा प्रकारे तुम्हाल शुद्ध सोन्याची पारख करता येईल. या व्यतिरिक्त नेहमीच अधिकृत सोन्याच्या दागिन्याच्या दुकानांतून खरेदी करा. कारण सोनं हे खुप महाग असल्याने आपली फसवणूक झाल्यास आपण त्यासाठी दिलेले पैसे सुद्धा बुडतील.