Home » अंत्यसंस्कार झाले होते आणि तो जीवंत फिरत होता !

अंत्यसंस्कार झाले होते आणि तो जीवंत फिरत होता !

by Team Gajawaja
0 comment
Pune Crime Story
Share

पुणे जिल्ह्यातलं शेळ पिंपळ गाव रात्रीच्या अंधारात कुत्रे सोडले, तर गावाच्या रस्त्यावर कोणीचं नव्हतं. याच गावातल्या एका घरात सुभाषची बहीण झोपली होती. दोन तीन दिवसांपूर्वी चऱ्होली गावात सुभाषचा ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला होता. सुभाषची बहीण त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून स्वत:च्या गावी परतली होती. रात्रीची वेळ म्हणून घरातले सगळे झोपले होते. तेवढ्यात घराचा दरवाजा वाजला. एवढ्या रात्री कोण आलयं हे पाहण्यासाठी तिने दरवाजा उघडला आणि ती भूत भूत म्हणून ओरडू लागली, कारण दरवाजात सुभाष ऊभा होता. तोच सुभाष, ज्याचा अंत्यसंस्कार तिने स्वत:च्या डोळ्यांनी पाहिला होता. मग सुभाष परत कसा आला? काय आहे सुभाषच्या मृत्यूचं गूढ, जाणून घेऊया. (Pune Crime Story)

१७ डिसेंबर २०२२ सकाळी ६ च्या सुमारास चऱ्होली गावातील शेतात गावकऱ्यांना एक मृतदेह आढळतो. शेतात नांगरणी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये तो मृतदेह अडकलेला होता, ज्याची खूप वाईट अवस्था झाली होती. अडकलेल्या मृतदेहाचं मुंडकंसुद्धा गायब होतं. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले तपासणी केल्यानंतर मृतदेहाच्या कपड्यांवरुन मृतदेहाची ओळख पटली, हा मृतदेह गावातील ५८ वर्षीय शेतकरी सुभाष ऊर्फ केरबा छबन थोरवे याचा होता. ज्या रोटाव्हेटरमध्ये मृतदेह अडकलेला आढळला, तो सुभाषचा होता, जो तो गावातील इतर शेतकऱ्यांनाही भाड्याने देत असे. शेतात नांगरणी करत असताना सुभाष चुकून रोटाव्हेटरवर पडला असावा, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला, नंतर कुठल्यातरी जंगली जनावरांने त्याचं मुंडकं नेल असाव. असाही पोलिसांचा अंदाज होता. घरच्यांनाही तेच वाटलं आणि सुभाषच्या छिन्नविछिन्न मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Crime News)

चार दिवसांनी म्हणजे २२ डिसेंबर २०२२ रोजी इंद्रयाणी नदीच्या तीरावर सुभाष यांची शोकसभा आयोजित केली होती. ही शोकसभा पार पडली आणि २३ डिसेंबरच्या रात्री संपूर्ण चऱ्होली गावात चर्चा सुरू होत्या की, सुभाष जीवंत आहे. ही चर्चा का सुरू होती तर २२ किलोमीटर लांब असलेल्या गावात जिथे सुभाषची बहीण राहते तिथे सुभाष आला होता. सुभाष जीवंत होता मग शेतात सापडलेला मृतदेह कोणाचा होता? पोलिसांना सुभाषची माहिती मिळताच त्यांनी त्याला ताब्यात घेतलं. (Pune Crime Story)

शेतात मृतदेह सापडल्याच्या २ दिवसांनंतर पोलिसांजवळ शेजारच्या गावातील रवींद्र घेंणंद याची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली होती. गावातील CCTV Footages चेक केल्यावर पोलिसांना संपूर्ण स्टोरी कळाली. CCTV मध्ये रवींद्र हा शेवटचा सुभाष सोबत जाताना दिसतं होता, आणि आता अंत्यसंस्कार होऊन जीवंत झालेला सुभाष पोलिसांच्या ताब्यात होता. पोलिसांनी सुभाषची चौकशी केली आणि सत्य समोर आलं. सुभाष च्या पत्नीने २०२० मध्ये आत्महत्या केली होती. पत्नीगेल्यानंतर सुभाषचे दुसऱ्या एका महिलेशी प्रेमसंबंध जुळले. त्याला तिच्या सोबत राहून उरलेलं आयुष्य काढायचं होतं. पण घरी त्याचं एक कुटुंब होतं आणि त्याचं वय ५८ वर्ष होतं, त्यामुळे त्याच्या या दुसऱ्या लग्नाच्या निर्णयाला घरचे नकार देतील हे त्याला ठाऊक होतं. म्हणून त्याने स्वत:ला मृत घोषित करण्याचा प्लॅन आखला. (Crime News)

सुभाषची शेजारच्या धानोरे गावात राहणाऱ्या रवींद्र घेणंद याच्याशी मैत्री होती. रवींद्र घेणंद याला मद्यपानाचं व्यसन होतं. म्हणून १६ डिसेंबर रोजी सुभाष रवींद्रला क्रिकेट मॅच दाखवण्याच्या बहाण्याने ट्रॅक्टरवर बसवून जवळच्या गावात घेऊन गेला. परत आल्यावर सुभाषने रवींद्रसाठी दारूची बाटली विकत घेतली आणि दोघे एका शेतात आले. या शेतात सुभाषला काही दिवसांपूर्वी नांगरणीचं काम मिळालं होतं. सुभाष आणि रवींद्र यांनी रात्री नऊवाजेपर्यंत शेतात नांगरणी केली. यानंतर रवींद्र दारू पिऊन पूर्णपण मद्यधुंद झाला. सुभाष याचं संधीची वाट पाहतं होता. रवींद्रची अवस्था बघून त्याने गवत कापायच्या कोयत्याने रवींद्रवर वार केले आणि त्याचं मुंडकं धडावेगळं केलं. रवींद्रच्या मृतदेहाला स्वत:चे कपडे घालून त्याने तो मृतदेह ट्रॅक्टरच्या रोटावेटरमध्ये अडकवला ट्रॅक्टर सुरू केला. त्यामुळे त्या मृतदेहाची आणखी वाईट अवस्था झाली इतकी की तो कोणाला ओळखायलाच येणार नाही. त्यानंतर कापलेले रवींद्र घेनंदचं मुंडकं आणि तो कोयत्या कोरड्या विहिरीत फेकून दिला. (Pune Crime Story)

=====

हे देखील वाचा :  महाराष्ट्राला हादरवणारं ‘मानवत हत्याकांड’ !

======

एकीकडे रवींद्रच्या मृतदेहावर सुभाष समजून अंत्यसंस्कार केला जातं होता आणि दुसरीकडे सुभाष आपल्या प्रेयसीसोबत पळून जातं होता. पळूनगेल्यानंतर ते दोघं जेजुरीला गेले आणि पुढील तीन दिवस तिथेच राहिले. जेव्हा सुभाषने प्रेयसीला घडलेला सगळा प्रकार सांगितला तेव्हा ती घाबरली आणि तीने घरी जाण्याचा हट्ट धरला. सुभाषकडे आता पर्याय नव्हता. 23 डिसेंबरच्या रात्री त्याने प्रेयसीला तिच्या घरी सोडलं. सुभाषवर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरलं होतं. रोज गावात दिसणारा एखादा साधा माणूस हे असं कृत्य करू शकतो यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. (Crime News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.