Pumpkin Hair Mask : केस लांबसडक आणि हेल्दी असे बहुतांश महिलांना वाटते. यासाठी वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंटही केल्या जातात. पण केसांची योग्य काळजी घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी हेअर केअर रुटीन फॉलो करावे असा सल्ला दिला जातो. केसांच्या आरोग्यासाठी काही प्रकारचे व्हिटॅमिन, मिनिरल्स आणि अँटीऑक्सिडेंट्सची गरज असते. जे तुम्हाला अन्नपदार्थांमधून मिळू शकतात. पण लांबसडक केसांसाठी तुम्ही भोपळ्याचा वापर करू शकता.
भोपळ्यामद्ये व्हिटॅमिन ए असते जे तुमच्या केसांच्या मुळांना हेल्दी ठेवण्यास मदत करतात. याशिवाय सीबम उत्पादनाला मॅनेज करत केस हेल्दी ठेवण्यास मदत करते. याशिवाय भोपळ्यामधील व्हिटॅमिन ई एक उत्तम अँटी-ऑक्सिडेंट्स असून जे केसांच्या फॉलिकल्सला नुकसान पोहोचवण्यापासून दूर ठेवतात. याशिवाय भोपळ्यात लोहाचा उत्तम स्रोत असतो. जे केसांच्या रोम छिद्रांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यासह केसांच्या वाढीसाठी मदत करते. भोपळ्यात झिंक, पोटॅशिअम, फॉलोट आणि बीटा-कॅरेटीन असे गुणधर्मही असतात. याचा तुम्ही हेअर केअर रुटीनमध्ये समावेश केल्यास केसांना अधिक फायदा होऊ शकतो. जाणून घेऊया भोपळ्याचा केसांसाठी कसा वापर करू शकता याबद्दल अधिक…
भोपळ्याचा हेअर मास्क
साहित्य
-एक कप किसलेला भोपळा
-दोन चमचे नारळाचे तेल
-एक चमचा मध
असा करा वापर
-सर्वप्रथम किसलेला भोपळा, नारळाचे तेल एका वाटीत व्यवस्थितीत मिक्स करुन घ्या
-मिश्रण केसांसह मूळांनाही ओलसर केसांवर लावा
-केस ऑवर कॅपने झाका आणि जवळजवळ 30 मिनिटे राहू द्या
-नेहमीप्रमाणे केस कोमट पाणी आणि शॅम्पूने व्यवस्थितीत धुवावेत
भोपळ्यापासून कंडिशनर
साहित्य
-एक कप किसलेला भोपळा
-दोन चमचे दही
-एक चमचा मध
असा करा वापर
-सर्वप्रथम किसलेला भोपळा, दही आणि मध व्यवस्थितीत मिक्स करा
-आता शॅम्पू केल्यानंतर मिश्रण केसांना व्यवस्थितीत लावा
-10-15 मिनिटांनी केसांवर मिश्रण ठेवल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा
भोपळा आणि केळ्याचा वापर
भोपळा आणि केळ्याच्या मास्कमुळे केसांना चमक येणे, मजबूत होण्यासह हेल्दी राहतात. यापासूनचा हेअर मास्क पुढीलप्रमाणे तयार करा.
साहित्य
-अर्धा कप किसलेला भोपळा
-एक पिकलेले केळ
-एक चमचा मध
-एक चमचा ऑलिव्ह ऑइल (Pumpkin Hair Mask)
असा करा वापर
-एका बाउलमध्ये सर्व सामग्री व्यवस्थितीत मिक्स करुन घ्या
-मिश्रण घट्ट नसावे हे लक्षात ठेवा
-ओलसर केसांवर हेअर मास्क अर्धा तास लावून ठेवा
-केस व्यवस्थितीत धुवा आणि पुन्हा शॅम्पू व कंडिशनरचा वापर करत पुन्हा स्वच्छ करा