चार वर्षांपूर्वी आजच्या दिवशी पुलवामा मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. उरी मध्ये १८ सप्टेंबर २०१६ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याचे २० जवान त्यामध्ये शहीद झाले होते. याच्या अवघ्या दहा दिवसानंतरच भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राइक करत पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत धडा शिकवला होता. अशा प्रकारेच पुलवामा मध्ये १४ फेब्रुवारीला ४० सीआरपीएफ जवान शहीद झाल्याने देशाला फार मोठा धक्का बसला होता. अशातच पाकिस्तानला आता योग्य ते उत्तर द्यावेच लागेल अशी मागणी चहूबाजूने केली जात होती. भारताने यावेळी मात्र केवळ १२ दिवसातच पाकिस्तानचा बदला घेतला. बालाकोट एअर स्ट्राइक मध्ये एअर फोर्सचे लढाऊ विमान पाकिस्तानच्या सीमेत घुसले आणि दहशतवादी कॅम्पांवर हल्ला केला. हा असा हल्ला होता की, ज्याची चर्चा संपूर्ण जगभरात झाली. भारताने लढाऊ विमानांनी केलेल्या हल्ल्यामुळे बालाकोटचा नकाशाच बदलला गेला. (Pulwama Attack Anniversary)
बालाकोट एअर स्ट्राइक करण्यामागील कारण म्हणजे पुलवामा हल्ला. कारण १४ फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. जम्मू-कश्मीर राष्ट्रीय महामार्गावर सीआरपीएफचे जवान आपल्या बसमधून जात होते. याच ताफ्यात ७८ बस होत्या आणि जवळजवळ अडीच हजार सैनिक हे जम्मू वरुन श्रीनगरला जात होता. जेव्हा ताफा पुलवामा येथे पोहचला तेव्हा विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्फोटकांनी भरलेल्या कारने ताफ्यातील बसला धडक दिली.
असे सांगितले जाते की, या कारमध्ये ३५० किलो स्फोटक होती. या धडकीनंतर झालेल्या स्फोटात बसचे तुकडे तुकडे झाले. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवान शहीद झाले. परंतु हल्ल्यानंतर पीएम मोदी यांनी १७ फेब्रुवारीला घोषणा केली होती की याचा बदला जरुर घेतला जाईल.
उरी मध्ये १८ सप्टेंबरला २०१६ रोजी भारतीय सैन्याने ब्रिगेड हेडक्वॉर्टर्सवर हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले होते. १० दिवसानंतरच २८-२९ सप्टेंबरला रात्री १५० कमांडो पीओके मध्ये घुसले. त्यानंतर दहशतवाद्यांनी लॉन्च पॅड उध्वस्त केले. या हल्ल्यात ३८ दहशतवाद्यांना ठार केले. जैश-ए-मोहम्मदने पुलवामाच्या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. घटनेचा सुत्रधार आदिल अहमद डार होता. हल्ल्यात सहभागी असलेल्या सज्जाद भट्ट आणि मुदस्सिर अहमद खान सारख्या दहशतवाज्यांनी सैन्याच्या चकमकीत ठार केले होते. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी जोरदार मागणी केली जाऊ लागली. सीआरपीएफने सुद्धा आपल्या विधानात लिहिले होते की, ना विसरणार ना माफ करणार. (Pulwama Attack Anniversary)
हे देखील वाचा- ‘या’ देशामध्ये होतोय तिबेटी मुलांवर अत्याचार….
१२ दिवसानंतर ती वेळ आलीच. पुलवामा हल्ल्यानंतर पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी कॅम्पांवर हल्ला केला. भारतीय वायुसेनेने लढाऊ विमान पीओकेच्या बालाकोट मध्ये दाखल झाले. २६ फेब्रुवारी २०१९ च्या रात्री तीन वाजता आसपास एअर फोर्सच्या १२ मिराज-२००० लढाऊ विमान एलओसी पार करत बालाकोट मध्ये पोहचले. त्यानंतर एअर स्ट्राइक करत बॉम्ब हल्ले केले. जवळजवळ एक हजार किलो बॉम्ब दहशतवाद्यांच्या ठिकाणावर टाकले गेले. या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचे ३०० दहशतवादी ठार ढाले. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानाकडून मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा ही परत घेतला.