Home » एथलीटच्या खेळातील संघर्ष ते खासदारकीची शपथ, जाणून घ्या पीटी उषा यांचा जीवनप्रवास

एथलीटच्या खेळातील संघर्ष ते खासदारकीची शपथ, जाणून घ्या पीटी उषा यांचा जीवनप्रवास

by Team Gajawaja
0 comment
PT Usha
Share

माजी ऑलम्पिंक ट्रॅक अॅन्ड फिल्ड एथलीट असलेल्या पीटी उषा (PT Usha) यांनी राज्यसभेच्या खासदार पदाची शपथ बुधवारी घेतली. त्यांना राज्यसभा अध्यक्ष वेंकैया नायडू यांनी शपथ दिली. राज्यसभेच्या खासदार पदी शपथ घेतल्यानंतर पीटी उषा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संसदेत भेट ही घेतली. त्यानंतर नरेंद्र मोदींनी सुद्धा ट्विट करत त्यांच्या खासदार पदी निवड झाल्याने शुभेच्छा दिल्या. तर पीटी उषा यांनी १९८४ मध्ये ऑलम्पिंक खेळात चौथे स्थान मिळवले होते. त्यांनी १९८३ मध्ये अर्जुन अवॉर्ड आणि १९८५ मध्ये देशातील सर्वाधिक चौथा मानाचा सन्मान असेलल्या पद्मश्रीने सुद्धा गौरवण्यात आले होते. आता त्या राज्यसभेच्या खासदारपदी बसणार आहेत.

राज्यसभेच्या २४५ पैकी १२ सदस्यांना राष्ट्रपतींच्याद्वारे निवड केली जाते. कला, साहित्य, ज्ञान, खेळ आणि सामाजिक सेवेत विशिष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींना खासदार म्हणून निवडले जाते. या खासदारांकडे राष्ट्रपती निवडणूकीसाठी मतदान करण्याचा अधिकार मात्र नसतो. राज्यसभेच्या या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले पहिले खेळाडू दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर होते.

केरळात राहणाऱ्या पीटी उषा
पीटी उषा यांच्या आयुष्याची सुरुवात ही पय्योली गावात झाली. जे भारताचे दक्षिण राज्य केरळाचा एक किनारी जिल्हा होता. त्यानंतरच्या दिवसात पीटी उषा यांना पय्योली एक्सप्रेसच्या नावाने ओळखले जात होते. पीटी उषा जेव्हा चौथीत शिकत होत्या तेव्हा त्यांनी धावण्यास सुरुवात केली होती.. त्यांचे शारिरिक शिक्षणाच्या शिक्षकांनी त्यांना जिल्ह्यातील तरबेज खेळांडू मुलीसोबत स्पर्धा करण्यास सांगितली. ती मुलगी सुद्धा पीटी उषा यांच्या शाळेत शिकत होती. उषा यांनी तिला सुद्धा धावण्याच्या स्पर्धेत हरवले. पुढील काही वर्षांपर्यंत त्यांनी आपल्या शाळेसाठी जिल्हा स्तरावर स्पर्धा जिंकल्या. परंचु पीटी उषा यांचे खरे करियर तर वयाच्या १३ व्या वर्षात सुरु झाले होते. जेव्हा केरळ सरकारद्वारे मुलींसाठी सुरु करण्यात आलेल्या स्पोर्ट्स विभागात त्यांनी प्रवेश घेतला होता.

हे देखील वाचा-कसा झाला कोल्हापूरच्या ऐश्वर्याचा विम्बल्डनपर्यंतचा प्रवास 

वयाच्या १६ व्या वर्षी पहिल्यांदाच ऑलम्पिंकमध्ये एन्ट्री
१९८० मध्ये फक्त अवघ्या १६ वर्षाच्या पीटी उषा यांनी मॉस्कोमध्ये ग्रीष्मकालीन ऑलम्पिंकमध्ये भाग घेतला होता. चार वर्षानंतर १९८४ मध्ये त्या एका ऑलम्पिंकमधील खेळातील अखेरच्या स्पर्धेपर्यंत पोहचणाऱ्या पहिल्याच भारतीय महिला एथलीट होत्या. पण एका शुल्लक फरकाने उषा यांचे ऑलम्पिंकमधील पदक हातातून निसटले.

PT Usha
PT Usha

यादरम्यान, पीटी उषा (PT Usha) यांच्या खेळातील कामगिरी उत्तम होत नव्हती आणि त्याच वेळी लोकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली होती. हा पीटी उषा यांच्या आयुष्यातील संघर्षाचा कालावधी होता पण त्यांना स्वत:वर विश्वास होता. १९८६ मध्ये सिओल एशियाई खेळात त्यांना चार सुवर्ण पदकं मिळाली होती. ४०० मीटर धावणे, ४०० मीटरची रेस, २०० मीटर आणि चौपट ४०० च्या रेसमध्ये उषा यांना सुवर्ण पदक जिंकले. १०० मीटर रेसमध्ये त्यांना दुसऱ्या क्रमांकावर गौरवण्यात आलेय १९८३ मध्ये त्यांना अर्जुन अवॉर्ड दिला गेला होता. १९८५ मध्ये त्या देशातील सर्वाधिक मोठा सन्मान पद्मश्री दिला गेला.

नवऱ्याने दिला पाठिंबा
१९९१ मधये लग्नाच्या काही दिवसानंतर पीटी उषा यांनी एथलेटिक्सपासून ब्रेक घेतला होता. कारण त्या काळात त्यांनी मुलाला जन्म दिला होता. पीटी उषा यांचे पती श्री निवासन यांना सुद्धा खेळात आवड होती. ते स्वत:सुद्धा एक खेळाडू होते. ते कबड्डी खेळायचे. त्यांनी प्रत्येक कामात उषा यांना प्रोत्साहन दिले. पीटी उषा यांनी खेळाच्या जगातात पुन्हा एन्ट्री केली आणि १९९७ मध्ये आपल्या खेळाच्या करियरला गुडबाय केले. त्यांनी भारतासाठी १०३ आंतरराष्ट्रीय पदक जिंकली आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.