प्रोटीन हे आपल्या शरिरात जवळजवळ संपूर्ण भागांमध्येआढळणारे एक आवश्यक पोषक तत्व आहे. प्रोटीन आपल्या शरिरातील हाडं आणि स्नायू मजबूत ठेवतात. यामुळे हिमोग्लोबिन तयार होते, जे तुमच्या संपूर्ण शरिरात ऑक्सिजनचा पुरवठा करते. हे एंजाइम नावाचे रसायन सुद्धा तयार करते. ज्यामुळे आपल्या शरिरातील अवयवयांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कामांच्या प्रतिक्रियांचे कारण बनते. प्रोटीन आपल्या शरिरातील पेशी तयार करण्यास फार गरजेच्या आहेत. तज्ञांच्या मते, निरोगी राहण्यासाठी एका व्यक्तीला प्रति दिन २५-३० ग्रॅम प्रोटीनची गरज असते. लोकांच्या शरिराच्या आकारानुसार प्रोटीनचे प्रमाण कमी अधिक असू शकते. सर्व लोकांना प्रोटीन हे खाण्यापिण्यातून मिळत असतात. (Protein Deficiency Symptoms)
सर्वसामान्यपणे असे मानले जाते की, जी लोक नॉन-व्हेज खातात त्यांना पुरेश्या प्रमाणात प्रोटीन मिळते. पण शाहकारी लोकांना प्रोटीनच्या कमतरतेची समस्या उद्भवते. आता प्रश्न असा उपस्थितीत राहतो की, एखाद्या व्यक्तिच्या शरिरात प्रोटीनची कमतरता असेल तर ते कसे ओळखायचे? एका रिपोर्टनुसार जेव्हा कधी एखाद्या व्यक्तीला शरिरासाठी पुरेश्या प्रमाणात प्रोटीन मिळत नाही तेव्हा शरिरातील विविध ठिकाणी त्याची लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं सर्वसामान्य असतात. पण बहुतांश लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. असे करणे धोकादायक ठरु शकते.
प्रोटीनच्या कमतरतेचे संकेत
-प्रोटीनच्या कमतरतेमुळे हात, पाय आणि पोटावर सूज येऊ लागते. या समस्येला एडीमा असे सुद्धा म्हटले जाते
-प्रोटीनच्या कमतरतेचा परिणाम मानसिक आरोग्यावर ही होतो. तसेच प्रोटीनच्या कमतरतेमुळे तुम्ही निराश अथवा आक्रमव स्वाभावाचे होता
-शरिरात प्रोटीनची कमतरता असेल तर तुमचे केस पातळ होतात. त्वचा ड्राय होतो आणि नखांवर रेषा येतात
-हे पोषक तत्व पुरेशा प्रमाणात न मिळाल्यास हाडं कमजोर होतात आणि तुम्हाला थकवा जाणवतो
-ज्या लोकांमध्ये प्रोटीनची कमतरता असते त्यांच्या शरिरावरच्या जखमा बऱ्या होण्यास वेळ लागतो आणि रक्त अधिक वाहत राहते (Protein Deficiency Symptoms)
हे देखील वाचा- तुम्हाला ‘हा’ त्रास असेल तर नक्की कढीपत्त्याचा करा वापर…
अशा पद्धतीने प्रोटीनची कमतरता पूर्ण करा
मीट, चिकन, मासे आणि अंड्यात पुरेश्या प्रमाणात प्रोटीन असते. या व्यतिरिक्त डेरी प्रोडक्ट्स, फळं, भाज्या, धान्य हे सुद्धा प्रोटीनचे उत्तम स्रोत मानले जातात. जर तुमच्या शरिरात प्रोटीनच्या कमतरतेची लक्षण दिसून येत असतील तर तुम्ही प्रोटीनयुक्त फूड्स खावेत. या व्यतिरिक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने काही सप्लीमेंट्स सुद्धा घेऊ शकता. पण स्वत: च्या मर्जीने सप्लीमेंट्स अजिबात घेऊ नका. अथवा मोठी समस्या उद्भवू शकते.